दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गौतम अदानींची छप्परफाड कमाई; तासाला कमावले इतके हजार कोटी!
शेअर बाजारात दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गौतम अदानी यांना लक्ष्मी दर्शन झाले आहे. अदानी समूहाच्या 10 पैकी 9 कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. कमाईत अदानी ग्रीन एनर्जीच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. तर इतर 9 कंपन्यांचे मार्केट कॅपमध्ये एकूण 12,295 कोटी रुपयांची वाढ दिसून आली. अदानी विल्मरच्या मार्केट कॅपमध्ये या समूहाला मोठे नुकसान सहन करावा लागले आहे. अदानी समूहातील या कंपन्यांना मोठा फायदा झाला तर या कंपन्यांना फटका बसला आहे.
अदानी समूहातील कंपन्यांची कामगिरी
अदानी इंटरप्राइजेजच्या मार्केट कॅपमध्ये 201.99 कोटी रुपयांची भर पडली. त्यानंतर कंपनीच्या मार्केट कॅप 3,40,096.66 कोटी रुपयांहून वाढवून 3,40,298.65 कोटी रुपये झाले आहे. अदानी पोर्ट अँड एसईझेडचे मार्केट कॅप 3,747.85 कोटी रुपयांनी वाढले. त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 2,97,386.32 कोटी रुपयांहून वाढून 3,01,134.17 कोटी रुपये झाले आहे.
अदानी पॉवरचे मार्केट कॅप 1,581.35 कोटी रुपयांनी वाढले. या अपडेटनंतर कंपनीचे मार्केट कॅप 2,28,658.62 कोटी रुपयांहून वाढून 2,30,239.97 कोटी रुपये झाले आहे. अदानी एनर्जी सोल्यूशन्सच्या मार्केट कॅपमध्ये 102.11 कोटी रुपयांची भर पडली. आता कंपनीचे मार्केट कॅप 1,17,209.15 कोटी रुपयांहून वाढून 1,17,311.26 कोटी रुपये झाले आहे.
अदानी ग्रीन एनर्जीचे मार्केट कॅप 5,369.88 कोटींनी वाढले. कंपनीचे मार्केट कॅप 2,53,128.38 कोटी रुपयांहून वाढून 2,58,498.26 कोटी रुपये झाले आहे. अदानी टोटल गॅसच्या मार्केट कॅपमध्ये 505.92 कोटींची भर पडली. या घाडमोडींमुळे मार्केट कॅप 79,032.35 कोटींहून वाढून 79,538.27 कोटीच्या घरात पोहचले आहे. अदानी समूहातील अजून एक कंपनी अदानी विल्मरच्या मार्केट कॅपमध्ये घसरण दिसून आली. या कंपनीला 279.43 कोटी रुपयांचा फटका बसला. यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 44,981.88 कोटी रुपयांहून, 44,702.45 कोटींवर घसरले आहे.
अदानी समूहातील सीमेंट कंपनी एससी लिमिटेडच्या मार्केट कॅपमध्ये 156.81 कोटींची भर पडली. कंपनीचे मार्केट कॅप 43,562.88 कोटींहून वाढून 43,719.69 कोटी इतके झाले आहे. अदानी समूहातील सिमेंट कंपनी अंबुजा सिंमेटचे मार्केट कॅप 615.79 कोटी रुपयांनी वाढले. कंपनीचे मार्केट कॅप 1,42,959.68 कोटी रुपयांहून वाढून 1,43,575.47 कोटी रुपये झाले. तर अदानी समूहातील एनडीटीव्हीचे मार्केट कॅप 12.9 कोटी रुपयांनी वाढले. यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 1,084.40 कोटी रुपयांनी वाढून 1,097.30 कोटी रुपये झाले.