शेअर आहे की रॉकेट..! 11 महिन्यात तब्बल 3800 टक्के परतावा; गुंतवणूकदार मालामाल!
गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म अधिक परतावा मिळावा. यासाठी नेहमीच चांगल्या शेअरच्या शोधात असतात. मात्र, आता एक शेअर असा आहे. ज्याने आपल्या ११ महिन्यांच्या काळात गुंतवणूकदारांना तब्बल 3800 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. ज्यामुळे सध्या या शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारा चांगलेच मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काय नाव आहे या शेअरचे?
बोंदाडा इंजिनीअरिंग असे या शेअर्सचे नाव असून, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना ११ महिन्यात 3800 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) कंपनीचे शेअर्स 2966.50 रुपयांवर बंद झाले. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 75 रुपये होती. दरम्यान, बोंदाडा इंजिनिअरिंगच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 3049.70 रुपये तर नीचांकी पातळी 142.50 रुपये आहे.
हेही वाचा : तब्बल… 84.16 कोटी रुपये पगार, कोण आहेत विजय कुमार; ज्यांची सर्वदूर होतीये चर्चा!
75 रुपयांचा शेअर पोहचला 3000 रुपयांवर
शेअर बाजारात कंपनीचा आयपीओ सादर झाला. त्यावेळी बोंदाडा इंजिनिअरिंगच्या शेअरची किंमत केवळ 75 रुपये होती. कंपनीचा आयपीओ मागील वर्षी 18 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 या कालावधीत खुला झाला होता. बोंदाडा इंजिनिअरिंगचा शेअर्स 30 ऑगस्ट 2023 रोजी 142.50 रुपये किमतीसह शेअर बाजारात लिस्टिंग झाला. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ होत आहे.
अलीकडेच अर्थात चालू आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 26 जुलै 2024 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंगचे शेअर्स 2966.50 रुपयांवर पोहोचले आहेत. अर्थात कंपनीचे शेअर्स 75 रुपयांच्या आयपीओ किमतीच्या तुलनेत, सध्याच्या घडीला 3800 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. दरम्यान, बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे बाजार भांडवल 6408 कोटी रुपये आहे.
आतापर्यंत 611 टक्क्यांपर्यंत उसळी
बोंदाडा इंजिनिअरिंगच्या शेअर्सने यावर्षी आतापर्यंत 611 टक्क्यांनी झेप घेतली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 417.10 रुपयांवर होते. जो 26 जुलै 2024 रोजी 2966.50 रुपयांवर बंद झाला आहे. तसेच, लिस्टिंगच्या दिवसापासून कंपनीच्या शेअर्समध्ये 1883 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 149.62 रुपयांवरून 2966.50 रुपयांपर्यंत वाढले आहेत. बोंदाडा इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये गेल्या 6 महिन्यांत 343 टक्क्यांनी वाढ झाली आहे.