
Income Tax Return
ITR भरणं आता एकदम सोपं झालंय. फक्त सात सोप्या Steps मध्ये आता तुम्ही तुमचा ITR भरू शकता. अजूनही बऱ्याच जणांना Income Tax Return भरायचा म्हटला कि अगदी घाम फुटतो. मग तो कसा भरायचा, Form कुठून आणायचा, काय करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात आणि त्या नंतर काय होतं की, आपण बऱ्याचदा दीड ते दोन हजार रुपये घालून दुसऱ्यांकडे ITR Form भरून घेतो.
आता Income Tax Portal वरील नवीन सुविधांमुळे हे अगदी सोपं झालंय. सगळ्यात पहिले आपण Login आणि सुरुवात कशी करायची हे जाणून घेऊया. तुमचे PAN अथवा Aadhar Card वापरून तुम्ही आयकर विभागाच्या www dot income tax dot government dot in या Portal वर जाऊन Login करा. या नंतर तुम्ही E File मध्ये जा आणि
File Income Tax Return वर Click करा.
तुमचे Assessment Year कोणते आहे ते निवडा .
त्यानंतर Mode Online निवडा.
HDFC Life कडून ₹४,५९६ कोटींचा विक्रमी बोनस जाहीर; २२ लाखांहून अधिक पॉलिसीधारकांना लाभ
आता तुम्ही जर ITR One करणार असाल तर त्यासाठी कशा पद्धतीने निवड करायची हे देखील जाणून घेऊया. तुमचे वार्षिक उत्पन्न जर पन्नास लाखाच्या वर असेल आणि मिळणारे उत्पन्न हे पगार, घराचे भाडे किंवा बँकेतून येणाऱ्या व्याजातून असेल तर तुम्ही ITR One हा पर्याय निवडायला हवा. यासाठी तुम्हाला Form Sixteen आणि बँकेचे Statement ही दोन्ही कागदपत्र असणं आवश्यक आहे. आता Form मध्ये नक्की काय भरायचं आहे हे देखील आपण जाणून घेऊया. सर्वात आधी तुमचं नाव, PAN आणि पत्ता तपासा. त्यानंतर तुमचे सर्व बँकेचे खाते हे Pre Validated असावे याची खात्री करून घ्या. जेणेकरून सर्व पैसे हे खात्यात जमा होतील. तुम्हाला मिळणारं वेतन, घरभाडं आणि व्याज उत्पन्नाची माहिती भरा. याशिवाय आता नवा बदल करण्यात आला असून एक लाख पंचवीस हजारापर्यंतचे Shares आणि Mutual Fund मधून झालेला नफाही तुम्ही दाखवू शकता.
New Tax Regime वर तुम्ही पन्नास हजाराच्या Standard Deduction चा लाभही घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नव्या कर प्रणालीत तुम्हाला LIC, PPF वर सूट मिळणार नाही. पण NPS मधील सरकारी योगदानावर नक्की सवलत मिळेल. आता यातून Refund कसा मिळणार आहे हे देखील आपण समजून घेऊया. Portal आपोआपच तुमच्या Tax ची गणना करणार आहे. जर तुमचा TDS जास्त कापला गेलाय तर तुम्हाला तो Refund मध्ये मिळेल. जर तुमचा कर भरायचा बाकी असेल तर Online भरून चलन तक्षशील तुम्ही Update करावा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे Return भरल्यानंतर तुमचं काम संपत नाही. तर साधारणतः तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचा Aadhar OTP वापरून E Verify करणं गरजेचं आहे. आम्ही सांगितलेल्या या सोप्या पद्धतीने तुम्ही ITR File करा आणि निर्धास्त राहा.