(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
EPFO Change Update: आता फटाफट होईल काम… 7 कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी, EPFO करणार ‘हा’ मोठा बदल
या महागाईवाढीमध्ये इंधन क्षेत्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. ‘इंधन आणि ऊर्जा’ म्हणजेच Fuel & Power या श्रेणीतील महागाई मार्च महिन्यातील १.०५ टक्क्यांवरून गगनाला भिडत आहेत. एप्रिलमध्ये २४.७१ टक्क्यांवर पोहोचली. दरम्यान, कच्च्या तेलाच्या म्हणजेच Crude Oil घाऊक महागाईची नोंद ८८ टक्क्यांहून अधिक करण्यात आली.
पेट्रोलच्या किमतींमध्ये ३२.४० टक्के आणि डिझेलच्या किमतींमध्ये २५.१९ टक्के झालेली वाढ यामुळे महागाईचा दबाव आणखीच तीव्र झाला आहे. तसेच, LPG च्या किमतींमध्येही १०.९२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की, सामान्य जनतेवर महागाईचे ओझे सातत्याने वाढतच चालले आहे.
इराणमधील संकट आणि आखाती देशांमधील वाढता तणाव यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ, या आकडेवारीमध्ये थेट प्रतिबिंबित झाली आहे. ‘प्राथमिक वस्तू’ गटातील महागाई मार्च महिन्यातील ६.३६ टक्क्यांवरून वाढून एप्रिलमध्ये ९.१७ टक्क्यांवर पोहोचली. त्याचप्रमाणे, ‘उत्पादित वस्तू’ गटातील महागाई ३.३९ टक्क्यांवरून वाढून ४.६२ टक्क्यांवर गेली आहे.
‘कोअर WPI’ जो अन्न आणि इंधन वगळता इतर सर्व वस्तूंच्या महागाईचे मोजमाप करतो. तो ५ टक्क्यांवर पोहोचला असून, हा गेल्या ४३ महिन्यांतील उच्चांक ठरला आहे. मार्च महिन्यात हा आकडा ३.७ टक्के इतका होता. मात्र, यातील एक दिलासादायक बाब म्हणजे, अन्नपदार्थ लक्षणीयरीत्या महाग झालेले नाहीत; अन्नधान्यांच्या महागाईत केवळ किरकोळ वाढ झाली असून, ती मार्चमधील १.८५ टक्क्यांवरून २.३१ टक्क्यांवर गेली आहे. शिवाय, कांदे आणि बटाटे यांच्या घाऊक किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत अजूनही बऱ्याच कमी आहेत. DPIIT च्या माहितीनुसार, मे महिन्याची WPI आकडेवारी १५ जून रोजी जाहीर केली जाणार आहे.
MSP Hike : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात मोठी वाढ






