Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाईच्या दूध दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ; दूध संघांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय!

राज्यातील गाईच्या दूध दरात प्रति लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज पुणे येथे दूध संघांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता दूध उत्पादक संघांकडून नवीन दुध अनुदान धोरणानुसार शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास मदत होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 13, 2024 | 08:13 PM
गाईच्या दूध दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ; दूध संघांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय!

गाईच्या दूध दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ; दूध संघांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय!

Follow Us
Follow Us:

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उन्हाळ्यात गाईच्या दुधाच्या मोठी घसरण झाली होती. ज्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्कील झाले होते. मात्र, गेल्या महिनाभरात देशातील आघाडीच्या दूध संघांकडून दूध दरात वाढ करण्यात आली आहे. अशातच आता पुणे येथे आज (ता.१३) झालेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या बैठकीत गाईच्या दूध दरात प्रति लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रति लिटर दुधासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. तर शेतकऱ्यांना मात्र या निर्णयामुळे फायदा होणार आहे.

काय आहे नवीन दर?

आज झालेल्या दूध संघांच्या बैठकीनंतर आता राज्यात गाईचे दुध ५६ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होणार आहे. यापूर्वी गाईच्या दुधाला राज्यभरात ५४ रुपये प्रति लिटर इतका दर मिळत होता. राज्य सरकारने गाईच्या दुधासाठी अनुदान धोरण जाहीर केले आहे. १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आलेल्या या धोरणामुळे दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ ही सर्व संघांना स्वतः द्यावी लागणार आहे. तीन रुपयांची खरेदी दरात वाढ झालेली असली तरीही विक्री दरात मात्र दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे या बैठकीत सांगण्यात आले आहे.

सर्व दूध संघांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

पुणे येथील जिल्हा दूध संघाच्या (कात्रज डेअरी) कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला राज्यातील विविध सहकारी व खाजगी संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने चितळे डेअरी, पराग मिल्क, गोविंद दूध, नेचर डिलाईट, उर्जा, राजहंस, संतकृपा, एसआर थोरात, कात्रज, गोदावरी, अनंत, सोनाई, अक्षरा मिल्क, सुयोग मिल्क आदी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील दूध वितरणाची स्थिती

दरम्यान, राज्यभरात दररोज एकूण ६५ ते ७० लाख लिटर दुधाची विक्री होते. तर कल्याणकारी दूध संघाच्या माध्यमांतून ४० ते ४२ लाख लिटर दूध विक्री होते. त्यामुळे आता गायीच्या पिशवीबंद नव्या दूधाचा दरात २ रुपयांनी वाढ झाल्याने दूध उत्पादक संघांना याचा मोठा फायदा होणार आहे. तर दूध उत्पादक संघांना देखील शेतकऱ्यांना त्यांचे अनुदानाचे पैसे वितरित करण्यात मदत होणार आहे.

Web Title: Increase in cow milk price by rs 2 per litre decision in the meeting of milk unions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 08:13 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Milk Prices

संबंधित बातम्या

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
1

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश
2

Veer Dam Water Release: इंदापूर तालुक्यातील १० गावांना मोठा दिलासा! वीर धरणातून शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे आदेश

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
3

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.