Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Sugarcane Price: सांगलीत ‘भारती शुगर’कडून प्रतिटन ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर

Sangli Sugarcane Price : विशेष म्हणजे, साखरेचे दर समाधानकारक राहिल्यास हंगामापूर्वी ठरलेल्या पहिल्या उचलीव्यतिरिक्त आणखी २०० रुपये प्रतिटन देण्याची तयारीही कारखान्याने दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 16, 2026 | 11:15 AM
Sangli Sugarcane Price 2026, Bharati Sugar Rate 3800, Sangli News, Agriculture News, Sugarcane Price,

Sangli Sugarcane Price 2026, Bharati Sugar Rate 3800, Sangli News, Agriculture News, Sugarcane Price,

Follow Us
Follow Us:
  • हंगामाच्या सुरुवातीलाच प्रतिटन ३,८०० रुपये पहिली उचल
  • पहिल्या उचलीव्यतिरिक्त आणखी २०० रुपये प्रतिटन जादा दर देण्याची तयारी
  • भारती शुगरने सर्वात आधी दर जाहीर करून बाजी मारली
Sangali Sugarcane Price : ऊसदराच्या प्रश्नावरून सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली कोंडी अखेर फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऊसदराच्या पहिल्या उचलीवरून शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारती शुगरने प्रतिटन ३ हजार ८०० रुपये पहिली उचल जाहीर करून ऊसदराच्या चर्चेला नवी दिशा दिली आहे. कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील अन्य साखर कारखानदारांवरही दर जाहीर करण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.

ऊस गाळप हंगाम सुरू होत असताना पहिली उचल किती मिळणार, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराच्या तुलनेत सांगलीतील कारखानदार कोणती भूमिका घेतात, याबाबतही उत्सुकता होती. अशा परिस्थितीत भारती शुगरने ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर करत आघाडी घेतली आहे.

Sugarcane Price Protest: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल, हेक्टरी १ लाख दुष्काळी मदतीची मागणी

विशेष म्हणजे, साखरेचे दर समाधानकारक राहिल्यास हंगामापूर्वी ठरलेल्या पहिल्या उचलीव्यतिरिक्त आणखी २०० रुपये प्रतिटन देण्याची तयारीही कारखान्याने दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

सांगली जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी कारखानदारांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सातत्याने होत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनीही दराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर भारती शुगरची घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केलेले दर आणि सांगलीतील साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता अन्य कारखानदार आता काय भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. भारती शुगरने जाहीर केलेल्या दराचा किती कारखानदार आदर्श घेतात आणि ऊसदराची स्पर्धा सुरू होते का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Satara CJP Protest: साताऱ्यात सीजेपी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची आणि SIR रद्द करण्याची

आता इतर कारखानदारांची कसोटी!

भारती शुगरने ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर केल्याने जिल्ह्यातील अन्य कारखानदारांसमोर दर जाहीर करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असून, ऊसदराच्या मुद्द्यावर आता केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष निर्णयांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सांगली जिल्ह्यातील कोणत्या साखर कारखान्याने सर्वात आधी ऊसदर जाहीर केला आहे?

    Ans: सांगली जिल्ह्यातील 'भारती शुगर' कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी प्रतिटन ३,८०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे.

  • Que: भारती शुगरने शेतकऱ्यांना आणखी कोणती आश्वासक घोषणा केली आहे?

    Ans: कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी स्पष्ट केले आहे की, बाजारपेठेत साखरेचे दर समाधानकारक राहिल्यास पहिल्या उचलीव्यतिरिक्त प्रतिटन आणखी २०० रुपये जादा दर दिला जाईल.

  • Que: या निर्णयाचा जिल्ह्यातील साखर उद्योगावर काय परिणाम होणार आहे?

    Ans: भारती शुगरने ३,८०० रुपयांची पहिली उचल जाहीर केल्यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली असून, आता इतर साखर कारखान्यांवरही तातडीने दर जाहीर करण्यासाठी दबाव वाढला आहे.

Web Title: Sangli sugarcane price bharati sugar announces 3800 first installment as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Agriculture News
  • sangli news

संबंधित बातम्या

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी
1

Sangli News: पाण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! कोरड्या तलावात १००१ दिवे लावून साजरी केली काळी दिवाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.