Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजपासून दूध दरात पुन्हा वाढ; वाचा… प्रति लिटरमागे किती झालीये दरवाढ!

देशातील आघाडीची दूध सहकारी संस्था कर्नाटक मिल्क फेडरेशनकडून (केएमएफ) दूध दरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. केएमएफच्या माहितीनुसार दूध दरात प्रति लिटरमागे प्रामुख्याने २ रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 25, 2024 | 02:30 PM
आजपासून दूध दरात पुन्हा वाढ

आजपासून दूध दरात पुन्हा वाढ

Follow Us
Follow Us:

गेल्या काही दिवसांपासून दूध दर काहीसे घसरलेले होते. मात्र, आता देशभरातील अनेक दूध संघांकडून दूध दरात वाढ केली जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मदर डेअरीकडून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली होती. तर अमूलने देखील आपल्या दूध दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. अशातच आता दक्षिण भारतातील सर्वात मोठा दूध संघ असलेल्या कर्नाटक मिल्क फेडरेशनकडून आजपासून आपल्या दूध दरात वाढ करण्यात आली आहे.

किती झालीये दूध दरात वाढ?

कर्नाटक मिल्क फेडरेशनकडून (केएमएफ) नंदिनी या ब्रँड नावाने दूध, दही, तूप, लोणी, आईस्क्रीम, चॉकलेट आणि मिठाई यांची विक्री केली जाते. कर्नाटक मिल्क फेडरेशन दूध दरात वाढ करण्याची घोषणा करताना म्हटले आहे की, केएमएफच्या दूध दरात २ रुपयांनी वाढ करण्यात येत आहे. ज्यामुळे आता केएमएफचे दूध प्रति लिटर ४२ रुपयांऐवजी ४४ रुपयांना विकले जाणार आहे. याशिवाय फेडरेशन स्पष्ट केले आहे की, दूध दरात झालेली ही वाढ, पॅकेटमध्ये अतिरिक्त ५० मिली दूध दिले जात असल्याने करण्यात आली आहे.

परिणामी आता नंदिनी ब्रँडचे दूध विकत घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक पॅकेटमागे ५० मिली दूध अतिरिक्त मिळणार आहे. अर्थात ५०० मिलीच्या दूध पॅकेटमध्ये आता ५५० मिली दूध मिळणार आहे. मात्र, त्यासाठी ग्राहकांना वाढीव दोन रुपये मोजावे लागणार आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा तर ग्राहकांना मात्र वाढीव पैसे मोजावे लागणार आहे.

असे आहेत कर्नाटक मिल्क फेडरेशनचे नवीन दर?

– ब्लू पॅकेट दूध (टोन्ड मिल्क) : ४२ रुपयांवरून ४४ रुपयांपर्यंत वाढले आहे.
– ब्लू पॅकेट दूध (होमोजेनाइज्ड टोन्ड दूध) : 43 रुपयांवरून 45 रुपयांपर्यंत वाढले आहे.
– ऑरेंज पॅकेट दूध (होमोजेनाइज्ड गायीचे दूध) : 46 रुपयांवरून 48 रुपयांपर्यंत वाढले आहे.
– ऑरेंज पॅकेट स्पेशल दूध : ४८ रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत वाढले आहे.
– शुभम दूध : ४८ रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत वाढले आहे.
– समृद्धी दूध : ५१ रुपयांवरून ५३ रुपयांपर्यंत वाढले आहे.
– शुभम (होमोजीनाइज्ड टोन्ड दूध) : 49 रुपयांवरून 51 रुपयांपर्यंत वाढले आहे.
– शुभम गोल्ड मिल्क : ४९ रुपयांवरून ५१ रुपयांपर्यंत वाढले आहे.
– शुभम डबल-टोन्ड दूध : 41 रुपयांवरून 43 रुपयांपर्यंत वाढले आहे.

दक्षिणेकडील सर्वात मोठा सहकारी दूध उत्पादक संघ

कर्नाटक मिल्क फेडरेशन हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा सहकारी दूध उत्पादक संघ आहे. जो कर्नाटक सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून चालवला जातो. केएमएफच्या 12 हजाराहून अधिक दुग्ध सहकारी संस्था कार्यरत आहेत. ज्याद्वारे एकूण 22.5 लाखांहून अधिक दूध उत्पादक जोडले गेले आहेत. केएमएफ प्रामुख्याने दूध, दही, तूप, लोणी, आईस्क्रीम, चॉकलेट्स आणि मिठाईची नंदिनी या ब्रँड नावाने विक्री करतो. एका अहवालानुसार, हा संघ 98.17 लाख लिटर दुधाच्या खरेदीसह लवकरच एक कोटी लिटरचा आकडा पार करू शकतो.

Web Title: Increase in milk price again from today read per liter price increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 02:24 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Business News
  • Milk Prices

संबंधित बातम्या

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू
1

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा
2

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’!  HCAH अन् QMS चा मोठा निर्णय
3

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’! HCAH अन् QMS चा मोठा निर्णय

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
4

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.