Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ; 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील घडामोडींना आलाय वेग!

नॅशनल काऊन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी नुकतेच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली होती. वाढती महागाई पाहता हे पाऊल उचलणे खूप गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 18, 2024 | 09:09 PM
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ; 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील घडामोडींना आलाय वेग!

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ; 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील घडामोडींना आलाय वेग!

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चांना आता वेग आला आहे. यातील फिटमेंट फॅक्टर हा पगार आणि पेन्शनच्या संशोधनाचा मुख्य आधार आहे. विशेषकरुन या फिटमेंट फॅक्टरवर जोरदार वाद होऊ लागले आहेत. नॅशनल काऊन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी नुकतेच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली होती. वाढती महागाई पाहता हे पाऊल उचलणे खूप गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहे.

हे देखील वाचा – चांदीची चमक वाढणार; दरात 125000 रुपये प्रति किलोपर्यंत वाढ होण्याची शक्यता!

काय आहे फिटमेंट फॅक्टर?

फिटमेंट फॅक्टर असा गुणांक आहे. ज्याच्या माध्यमातून पगार आणि पेन्शनमध्ये संशोधन केले जाते. सातव्या वेतन आयोगाने 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरचा सल्ला दिला होता. ज्यामुळे किमान पगार 7 हजारने वाढून 17 हजार 990 झाला होता. आता आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.86 ठेवण्याचा सल्ला दिला होता. ही मागणी मान्य झाली असती तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 51 हजार 451 पर्यंत होऊ शकतो.

हे देखील वाचा – महाराष्ट्र, झारखंडमधील करदात्यांना सूट मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

पगारात कितीने होणार वाढ?

जर आठव्या वेतन आयोगामध्ये 2.86 चे फिटमेंट फॅक्टर लागू झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सध्याचा किमान पगार 17 हजार 990 ने वाढून 51 हजार 451 इतका होऊ शकतो. वाढती महागाई आणि आयुष्य पाहता ही वाढ महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी अशाही काही अफवा आहेत की, किमान वेतन 34 हजार ते 35 हजार पर्यंत असू शकते. पण शिव गोपाल मिश्रा यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. याला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले आहे.

हे देखील वाचा – सीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता; 18 टक्क्यांपर्यंत घसरले ‘या’ गॅस कंपन्यांचे शेअर्स!

आठवा वेतन आयोग केव्हा?

केंद्र सरकारकडून आतापर्यंत आठव्या वेतन आयोगासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 2026 मध्ये यासाठी समिती बनेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. वाढती महागाई आणि आयुष्याचा खर्च पाहता सरकार वेळेत न्याय संगत निर्णय घेईल, अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.

Web Title: Increase in salary of central employees the 8th pay commission developments are gaining momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 09:09 PM

Topics:  

  • 8th pay commission

संबंधित बातम्या

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना निराशा, वेतन आयोगाची अंमलबजावणी 2028 पर्यंत लांबणार?
1

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना निराशा, वेतन आयोगाची अंमलबजावणी 2028 पर्यंत लांबणार?

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, महागाई भत्ता आणि आठवा वेतन आयोगात होणार ‘इतकी’ वाढ!
2

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, महागाई भत्ता आणि आठवा वेतन आयोगात होणार ‘इतकी’ वाढ!

मध्यमवर्गीयांनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीला मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट
3

मध्यमवर्गीयांनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीला मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापासून ते महागाई भत्त्यापर्यंत…, दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना २ मोठ्या भेटवस्तू!
4

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापासून ते महागाई भत्त्यापर्यंत…, दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना २ मोठ्या भेटवस्तू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.