(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
वृत्तानुसार, भारतीय रिफायनरींनी गेल्या दोन महिन्यांत रशियाला अंदाजे १० लाख बॅरल पेट्रोलचा पुरवठा केला गेला आहे. असे मानले जाते की, हे इंधन रशियाकडून आयात केलेल्या कच्च्या तेलापासून तयार केले गेलं आहे.
खरं तर, युक्रेनने अनेक रशियन तेल डेपो, टर्मिनल आणि रिफायनरींना लक्ष्य करून वारंवार ड्रोन हल्ले केले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये हल्ल्यांमुळे रशियाच्या देशांतर्गत इंधन उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे ाणि त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम त्यांच्याकडून आयात करणाऱ्या देशांवरही झाला आहे. पेट्रोलचा तीव्र तुटवडा मोठ्याप्रमाणावर निर्माण झाला आहे. देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यांचा समतोल साधण्यासाठी रशियाला पेट्रोल आयात करावे लागले आहे. त्यामुळे स्वतः बादशाह असलेल्या क्षेत्रासाठीच रशियाला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत आहे.
रशियावर उभी राहिलेली ही परिस्थिती पाहता. एक मित्र राष्ट्र म्हणून भारताला त्याच्यासाठी उभं राहणं सहाजिकच आहे. ऊर्जा विश्लेषक व्होर्टेक्साच्या मते, रशियाची सागरी पेट्रोल आयात ऑगस्टमध्ये विक्रमी उच्चांकावर पोहोचली, जी दररोज अंदाजे १,२५,००० बॅरल इतकी होती. व्यापार सूत्रांच्या मते, भारतीय रिफायनरींनी जुलै आणि ऑगस्ट दरम्यान रशियाला अंदाजे १० लाख बॅरल पेट्रोल पाठवले आहे. हा पुरवठा प्रामुख्याने गुजरातमधील वडीनार रिफायनरीमधून झाला आहे. पण ही रिफायनरी नायरा एनर्जीकडून चालवली जात आहे ज्यामध्ये रशियन कंपनी रोसनेफ्टची भागीदारी आहे.
रशियाकडे कच्च्या तेलाचे मोठे साठे आहेत, पण त्याच्या शुद्धीकरण क्षमतेवरील हल्ल्यांमुळे यासगळ्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नुकसान झालेल्या रिफायनरींची दुरुस्ती करण्यास वेळ लागत आहे, कारण अनेकांना विशेष उपकरणांची आवश्यकता असते. हल्ल्यांच्या सततच्या धोक्यामुळे काही रिफायनरींना पूर्ण क्षमतेने काम करणे कठीण होत आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून रशियाला पर्याय शोधणं गरजेचं होतं. त्यामुळे रशियाला आपल्या देशांतर्गत इंधनाची गरज भागवण्यासाठी भारतातून पेट्रोल आयात करण्यास भाग पडत आहे.
BRICS Digital Payment : 11 देशांमध्ये होणार थेट डिजिटल व्यवहार! ब्रिक्स परिषदेत भारताची मोठी योजना






