कधीकाळी कोट्यवधींचा मालक होता 'हा' खेळाडू; आज काढतोय एक हजार रुपयांमध्ये दिवस!
अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतीय क्रिकेट विश्वात सुवर्ण अक्षरांनी स्वतःचे नाव कोरले आहे. त्यातील काही खेळाडू अचानक क्रिकेटच्या मैदानावरून गायब झाले आहेत. त्यात विनोद कांबळी हे नाव पण एक आहे. सचिन तेंडूलकर सोबतच स्फोटक फलंदाज म्हणून, तो ओळखल्या जात असे. 18 जानेवारी 1972 रोजी विनोदचा मुंबईत जन्म झाला. क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर हे त्याला मास्टर ब्लास्टरपेक्षा अधिक गुणवंत मानत असत. क्रिकेट जगतातील कमी कालावधीत त्याने अनेक अविस्मरणीय खेळी खेळली आहेत. पण क्रिकेटमधील हाच राजा आता रंक झाला आहे.
1 हजारात काढतोय दिवस
रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या कार्यक्रमात विनोद कांबळी दिसल्यावर अनेकांच्या तोंडून वेदनाच बाहेर पडली आहे. एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) त्याला 30 हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. त्यावरच त्याची गुजारण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरात ही कमाई तोकडी पडते. रोजच्या हिशोबाने त्याला 1 हजार रुपयांवर दिवस काढावा लागत असल्याचे दिसत आहे.
एसबीआय कार्डने फोर्स मार्कमध्ये 2 कोटी कार्ड्सचा टप्पा ओलांडला; डिजिटल इंडियाला बळ!
कधी किक्रेटच्या मैदानावर गोलंदाजांना चोपून काढणाऱ्या विनोद कांबळीची एकूण संपत्ती 1 ते 1.5 लाख डॉलर दरम्यान असल्याचे सांगण्यात येते. पण सध्या त्याची वार्षिक कमाई 4 लाख रुपयांच्या जवळपास आहे. कांबळीकडे मुंबईत स्वत:चे घर आहे. त्याच्याकडे एक रेंज रोवर कार सुद्धा आहे. पण या कारचा खर्च कसा सोसावा ही चिंता त्याला पडली आहे.
यापूर्वी कशी होत होती कमाई?
क्रिकेट जगताला रामराम ठोकल्यानंतर कांबळी याने कॉमेंट्री, जाहिराती आणि चित्रपटात अभिनय करण्याचा पर्याय निवडला आहे. त्यातून त्यांची चांगली कमाई होत होती. पण काळ बदलला, तसे त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत आटले. कोविड-19 महामारीत तर त्याची आर्थिक परिस्थिती अजून खालावली आहे.
मोफत योजनांपेक्षा रोजगाराच्या संधी निर्माण करा; सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!
मित्र शिखरावर, कांबळी जमिनीवर
आपला अत्यंत जवळचा मित्र विनोद कांबळीची ही अवस्था सचिन तेंडूलकर याला सुद्धा वेदना देणारी आहे. दोघांचा क्रिकेटमधील प्रवास सोबतच सुरू झाला. दिग्गज कोच रमाकांत आचरेकर सरांनी दोघांना तावून-सलाखून तयार केले. दोघांनी तडाखेबंद करिअर सुरु केले. पण पुढे कांबळीच्या करिअरला घरघर लागली आहे. तर सचिन हा क्रिकेटमधील देव झाला आहे. या दोघांची अशी तुलना करणे अनेकांना आवडत नाहीत. त्यामागील कारणे आणि टीका सुद्धा अनेकांना आवडत नाही. पण गेल्या आठवड्यातील विनोद कांबळीची अवस्था अनेकांना धक्का देणारी ठरली आहे. हा दिग्गज खेळाडू लवकरच त्याच्या अडचणीवर मात करेल, अशी आशा अनेकांना वाटत आहे.