
Stock Market Today: शेअर मार्केट ओपनिंगकडे गुंतवणूककारांचे लक्ष! कोणते स्टॉक्स देणार नफा? वाचा तज्ञ काय सांगतात
Todays Gold-Silver Price: सोन्याचे दर गगनाला भिडले, चांदीही चमकली! वाचा तुमच्या शहरातील आजचे भाव
सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होता. शुक्रवारी, शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला, बेंचमार्क निफ्टी ५० २५,००० च्या पातळीजवळ बंद झाला. सेन्सेक्स ७६९.६७ अंकांनी किंवा ०.९४% ने घसरून ८१,५३७.७० वर बंद झाला, तर निफ्टी ५० २४१.२५ अंकांनी किंवा ०.९५% ने घसरून २५,०४८.६५ वर बंद झाला. मात्र आज या घसरणीला ब्रेक लागू शकतो, असा अंदाज भारतीय शेअर बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज मंगळवारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी ब्रेकआउट स्टॉक्सची शिफारस केली आहे. सुमित बगडिया यांनी शिफारस केलेल्या पाच शेअर्समध्ये इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, एसीआय, एचसीएल टेक, चेन्नई पेट्रोलियम आणि बजाज कंझ्युमर यांचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार व्होडाफोन आयडिया, एशियन पेंट्स, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, मॅरिको, मोतीलाल ओसवाल, विशाल मेगा मार्ट, एचसीएल टेक्नॉलॉजीज, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पीव्हीआर आयनॉक्स, मॅरिको, टोरेंट फार्मा, एमसीएक्स, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज, पाइन लॅब्स, हिंदुस्तान कॉपर या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
India Russia oil trade: अमेरिकेचा दबाव फेल; रशियन तेल खरेदीत इंडियन ऑइल आघाडीवर
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये नाल्को, अशोक लेलँड, जेएसडब्ल्यू स्टील, इंडस टॉवर्स, यूपीएल, जीएनएफसी, व्होल्टास आणि स्वान कॉर्प यांचा समावेश आहे.