India's Pharmaceutical Industry 'औषधनिर्माण' उद्योगात भारताचा जगभरात बोलबाला; जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकावर
India’s Pharmaceutical Industry: भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचे आता जागतिक स्तरावर मजबूत स्थान आहे. उत्पादन संख्येनुसार हा उद्योग जगात तिसऱ्या आणि मूल्यानुसार ११ व्या क्रमांकावर आहे. या उद्योगात ३,००० हून अधिक कंपन्या आणि १०,५०० हून अधिक उत्पादन युनिट्स आहेत. भारताच्या देशांतर्गत औषध बाजारपेठेचे सध्याचे मूल्य ६० अब्ज डॉलर्स असून, २०३० पर्यंत ते १३० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ नुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात या क्षेत्राची एकूण उलाढाल ४.७२ लाख कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या १० वर्षांत औषधनिर्माण निर्यातीत सरासरी वार्षिक ७टक्के दराने वाढ झाली आहे.
India’s Coal Production: एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचे ओलांडले लक्ष्य; वीज प्रकल्पांसाठी ‘बफर’ स्टॉक
भारत हा जगातील जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. जागतिक पुरवठ्यात त्याचा वाटा अंदाजे २० टक्के आहे. हा देश ६० वेगवेगळ्या उपचार श्रेणींमध्ये अंदाजे ६०,००० जेनेरिक औषधांचे उत्पादन करतो. मजबूत उत्पादन क्षमता, वाढती निर्यात, परकीय गुंतवणूक आणि सरकारी उपक्रम या सर्वांमुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळाली आहे, आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. जागतिक बाजारपेठेत भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. याशिवाय, परविडणाऱ्या दरात औषधांची उपलब्धता, नवनवीन शोध, गुणवत्ता नियंत्रण आणि कडक नियमांमुळे आरोग्यसेवा सुधारल्या आहेत आणि भारताची जागतिक विश्वासार्हता वाढली आहे.
देशात अंदाजे ५०० सक्रिय औषध कच्चा माल (एपीआय) उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्यांचा जागतिक एपीआय उद्योगात अंदाजे ८ टक्के वाटा आहे. डिप्थेरिया, टिटॅनस आणि पटुंसिस (डीपीटी), बीसीजी आणि गोवर यांसारख्या लसींव्या पुरवठ्यातही भारत जगात आघाडीवर आहे. भारतीय कंपन्या संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधीला (युएनआयसीईएफ) अंदाजे ६० टक्के लसींचा पुरवठा करतात, तर भारत डीपीटी आणि बीसीजी लसीची ४०-७० टक्के जागतिक मागणी आणि जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) गोवर लसीची ९० टक्के मागणी पूर्ण करतो, यावरून भारताची भक्कम औषधनिर्माण निर्यात आणि जागतिक आरोग्य प्रणालीचा एक महत्वाचा घटक म्हणून तिची भूमिका दिसून येते.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






