सुरक्षित खातेपुस्तकामुळे मालमत्ता पुस्तकामध्ये वाढ; एनआयएममध्ये 9.2 टक्के वाढ - उज्जीवन बँक
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ही भारतातील आघाडीची स्मॉल फायनान्स बँक आहे. जी आर्थिकदृष्ट्या सेवा न मिळालेल्या आणि सेवा न मिळालेल्या विभागांना सेवा पुरवते. या बँकेने आपल्या मुदती ठेवीवर ९ महिन्यांच्या मुदतीसाठी ७.५ टक्यांपर्यंत व्याजदर वाढवला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना नियमित मुदत ठेवी दरांवर अतिरिक्त ०.५० टक्के व्याजदर बॅंकेकडून मिळणार आहे. त्यामुळे आता बॅंकेच्या खातेधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
हे देखील वाचा – उत्पादन क्षेत्रातील रोजगारात 7.4 टक्क्यांनी वाढ, ठरलीये दशकभरातील सर्वाधिक वाढ
१२ महिन्यांच्या मुदतीसाठी मिळणार ८.२५ टक्क्यांचा सर्वोच्च व्याजदर
याशिवाय उज्जीवन बँक सामान्य ग्राहकांना १२ महिन्यांच्या मुदतीसाठी ८.२५ टक्क्यांचा सर्वोच्च व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना याच मुदतीसाठी ८.७५ टक्क्यांचे आकर्षक व्याजदर बॅंकेकडून दिले जाते. वैयक्तिक व नॉन-इंडिव्हिज्युअल ग्राहकांसह एनआर ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या प्लॅटिना मुदत ठेवींवर अतिरिक्त ०.२० टक्के व्याजदर मिळते. त्यामुळे बॅंकेच्या खातेधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
सर्वोच्च व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये स्थान
उज्जीवन एसएफबीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीव नौटियाल यांनी सांगितले आहे की, “आम्हाला लघुकालीन मुदतीसाठी उच्च व्याजदरांचा शोध घेत असलेल्या ग्राहकांसाठी मुदत ठेवींवर सुधारित व्याजदर देण्याचा आनंद होत आहे. एफडींवर वाढवण्यात आलेले नवीन व्याजदर उज्जीवन एसएफबीला मुदत ठेवींसाठी सर्वोच्च व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये स्थान देते.”
हे देखील वाचा – वडिलांच्या वारशातून उभारली तब्बल 12 हजार कोटींची कंपनी; देशभरात बनला प्रसिद्ध ब्रँड!
काय आहेत ठळक वैशिष्ट्ये
• सुधारित मुदतीसह ९ महिन्यांसाठी व्याजदर पूर्वीच्या ७.०० टक्क्यांवरून ७.५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
• नियमित व ज्येष्ठ नागरिकांसाठी १२ महिन्यांच्या मुदतीकरिता अनुक्रमे ८.२५ टक्के आणि ८.७५ टक्क्यांचे सर्वोच्च व्याजदर कायम आहे.
• प्लॅटिना एफडीवर अतिरिक्त ०.२० टक्के व्याजदर मिळणार आहे.