वडिलांच्या वारशातून उभारली तब्बल 12 हजार कोटींची कंपनी; देशभरात बनला प्रसिद्ध ब्रँड!
आजकाल अनेक जण नोकरी सोडून उद्योग व्यवसायामध्ये आपले नशीब आजमावत आहे. विशेष म्हणजे अनेकांना यात मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. मात्र, उद्योगधंद्यामध्ये उतरताना यशस्वी उद्योजकाबद्दल माहिती असल्यास, उद्योग सुरु करण्याचा अनेकांचा मार्ग सोपा होतो. आज आपण उद्योग सुरु करु पाहणाऱ्या अशाच एका यशस्वी उद्योजकाबद्दल जाणून घेणार आहोत… ज्यांनी भारतीय उद्योग विश्वात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
देशातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड
दे्शतील आघाडीचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात श्रीमंतांच्या यादीत कानपूरच्या मुरलीधर ग्यानचंदानी यांचे नाव अग्रस्थानी आहे. हुरुन रिच लिस्टनुसार मुरलीधर ग्यानचंदनी हे यूपीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे ते कोणत्याही सॉफ्टवेअर किंवा फायनान्शियल फर्मचे मालक नाही. तर सर्फ आणि साबण व्यवसायातून त्यांनी इतका मोठा पल्ला गाठला आहे. त्यांची उत्पादने आज प्रत्येक घरात वापरली जातात. एवढेच नाही तर त्यांचे हे उत्पादन आपल्या सेगमेंटमध्ये देशातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड म्हणून कायम आहे.
हे देखील वाचा – तीन महिन्यांत येणार हे 60000 कोटींचे आयपीओ; गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी!
काय आहे ब्रॅंन्डचे नाव
मुरलीधर ग्यानचंदानी यांच्या उत्पादनाचे नाव ‘घडी डिटर्जंट’ आहे. हे ऐकताच आता तुमच्या डोळ्यांसमोर ‘घडी डिटर्जंट’ची जाहिरात आली असेल? कानपूरचे रहिवासी असलेल्या मुरलीधर ग्यानचंदानी यांनी या डिटर्जंटने देशभरात आपला ठसा उमटवला आहे. मुरलीधर हे रोहित सरफॅक्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड (आरएसपीएल) ग्रुपचे मालक आहेत.
घडी डिटर्जंट ब्रॅंन्ड देशभर प्रसिद्ध
मुरलीधर ग्यानचंदानी यांचे वडील दयालदास ग्यानचंदानी यांच्याकडून त्यांना साबण व्यवसायाचा वारसा मिळाला. ते ग्लिसरीन वापरून साबणाची निर्मिती करत होते. मग मुरलीधर यांनी वडिलांचा व्यवसाय पुढे नेला. २२ जून १९८८ रोजी त्यांनी आरएसपीएलची स्थापना केली. यापूर्वी त्यांच्या फर्मचे नाव श्री महादेव सोप इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड होते. मुरलीधर ग्यानचंदानी यांनी या ब्रँड अंतर्गत अनेक उत्पादने बनवली. यात ‘घडी डिटर्जंट पावडर’ हे त्यांचे उत्पादन घराघरात पोहचले. या उत्पादनातून त्यांनी नाव आणि पैसा दोन्ही कमावले. ज्यामुळे त्यांचा ‘घडी डिटर्जंट’ हा ब्रॅंन्ड देशभर प्रसिद्ध झाला आहे.
किती आहे त्यांची एकूण संपत्ती
हुरुन रिच लिस्टनुसार, मुरलीधर ग्यानचंदानी यांच्याकडे जवळपास १२००० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते उत्तर प्रदेशचे सर्वात श्रीमंत उद्योगपती असण्यासोबत देशातील १४९ वे अब्जाधीश व्यापारी आहेत.