Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRDAI Changes Rules : विमा क्षेत्रात मोठी खळबळ! IRDAI ने बदलले सर्व नियम; पॉलिसीधारकांवर कसा होणार परिणाम?

IRDAI Changes Rules : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण IRDAI ने इन्शुरन्स सेक्टरमधील फी आणि शुल्काच्या संदर्भातील सर्व जुने नियम बदलत नवीन नियमावली जाहीर केली आहे. या बदलांमुळे विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 03, 2026 | 04:57 PM
विमा क्षेत्रात मोठी खळबळ! ( सौजन्य - सोशल मीडिया )

विमा क्षेत्रात मोठी खळबळ! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • विमा क्षेत्रात मोठी खळबळ!
  • IRDAI ने बदलले सर्व नियम
  • पॉलिसीधारकांवर कसा होणार परिणाम?
IRDAI Changes Rules : विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या कंपनींसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. विमा नियामक IRDAI ने शेअर हस्तांतरण मंजुरीशी संबंधित शुल्कात ८०% कपात केली आहे. पूर्वी कंपन्यांना या मंजुरीसाठी ५० लाख रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागत होते, परंतु आता ते १० लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे. ( IRDAI Changes Rules ) 

Indigo Airlines : पायलट बनण्याचे स्वप्न होईल पूर्ण! इंडिगो काढणार मोठी भरती; एका वर्षात तब्बल 1000 नवे पायलट नियुक्त करणार

विमा कंपनीचे आयपीओ, कर्मचारी शेअर वाटप आणि कॉर्पोरेट विलीनीकरण यांसंदर्भातही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. नेमके काय आणि कोणते नियम बदलण्यात आलेत ?

किती कपात करण्यात आली आहे?

IRDA ने २ नोव्हेंबर २०२६ रोजी एक मास्टर सर्क्युलर जारी केले. त्यात त्यांनी स्पष्ट केलं आहे की, शेअर हस्तांतरण मंजुरीसाठीचे प्रक्रिया शुल्क ५० लाख रुपयांवरून १० लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे. याचा अर्थ कंपन्यांना आता ४० लाख रुपये कमी भरावे लागणार आहेत. मात्र, ज्या कंपन्यांनी नवीन नियम लागू होण्यापूर्वी शुल्क भरले होते, त्यांना मात्र ते रिटर्न मिळणार नाही. पण, काही जुन्या NOC अर्जांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

IRDAI च्या अटी नेमक्या काय आहेत?

IRDA ने शेअर बाजारात लिस्टिंग होण्याच्या तयारीत असलेल्या विमा कंपन्यांवरही अटी लादल्या आहेत. अशा कंपन्यांना IPO च्या आधी आणि नंतर त्यांच्या शेअरहोल्डिंगची माहिती देणे आवश्यक असणार आहे. कंपनीच्या पेड-अप इक्विटीच्या १% पेक्षा जास्त शेअरधारकांसाठी स्वतंत्र माहिती देणे देखील आवश्यक असेल. कंपनीला IPO चे कारण आणि त्याचा आकार देखील जाहीर करावा लागेल. यामध्ये, नवीन शेअर्स जारी करणे आणि विद्यमान शेअरधारकांकडून शेअर्सची विक्री म्हणजेच विक्रीसाठी प्रस्ताव यासंबंधीची माहिती स्वतंत्रपणे द्यावी लागेल.

शेअर्सचा मुद्दाही छाननीखाली?

कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ESOP अंतर्गत शेअर्स खरेदी करण्याची संधी देतात. IRDAI ने या नियमांवरील आपली देखरेख अधिक कडक केली आहे. जर कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या ट्रस्टमार्फत शेअर्स जारी केले जात असतील किंवा कंपनीच्या संचालकांनी मोठ्या संख्येने शेअर्स खरेदी केले असतील, तर IRDAI ची मंजुरी आवश्यक असेल.

Namo Shetkari Yojana : बळीराजासाठी महत्त्वाची बातमी! PM Kisan योजनेनंतर आता नमो शेतकरी हफ्ता कधी मिळणार? 4 नोव्हेंबरला निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: IRDAI ने इन्शुरन्स सेक्टरमध्ये नेमके काय बदल केले आहेत?

    Ans: IRDAI ने विमा पॉलिसींच्या विक्री, व्यवस्थापन आणि इतर सेवांवर आकारल्या जाणाऱ्या फी व शुल्कांच्या नियमांमध्ये सर्वसमावेशक बदल केले आहेत.

  • Que: नवीन नियमांमुळे ग्राहकांवर किंवा पॉलिसीधारकांवर काय परिणाम होईल?

    Ans: या बदलांमुळे विम्याची कागदपत्रे, शुल्क आकारणी आणि शुल्कातील पारदर्शकता वाढून ग्राहकांना अधिक स्पष्टता मिळणार आहे.

  • Que: IRDAI ची मुख्य भूमिका काय असते?

    Ans: भारतातील सर्व प्रकारच्या जीवन आणि सामान्य विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे नियमन करणे आणि पॉलिसीधारकांच्या हिताचे रक्षण करणे हे IRDAI चे मुख्य काम आहे.

Web Title: Irdai changes fee rules insurance sector marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • IPO News

संबंधित बातम्या

Jio IPO Strong Listing : Jio IPO ची बाजारात दणदणीत एन्ट्री! लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी काय करावं? तज्ज्ञ काय सांगतात?
1

Jio IPO Strong Listing : Jio IPO ची बाजारात दणदणीत एन्ट्री! लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी काय करावं? तज्ज्ञ काय सांगतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.