आयटीसी लिमिटेडचा शेअर 4.65 टक्क्यांनी घसरला; तंबाखूजन्य उत्पादनांवरील जीएसटी वाढण्याचा परिणाम!
देशातील आघाडीचा सार्वजनिक उद्योगसमूह असलेल्या आयटीसी लिमिटेडच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण दिसून आली आहे. कंपनीचा शेअर आज तब्बल ४.६५ टक्क्यांनी घसरला आहे. तर कंपनीच्या शेअरची किंमत देखील १ टक्क्यांनी कमी होऊन, ती ४७२.५५ रुपयांपर्यंत खाली आली आहे. प्रामुख्याने आयटीसी व्यतिरिक्त गॉडफ्रे फिलिप्स आणि चारमिनार-निर्मात्या व्हीएसटी इंडस्ट्रीज सारख्या सिगारेट कंपन्यांचे देखील शेअर्स मंगळवारी 3 टक्क्यांपर्यंत घसरले आहे.
‘या’ शेअरमुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची दुप्पट कमाई; लिस्टिंगनंतर शेअर्सला अप्पर सर्किट!
जीएसटी दर तर्कसंगतीकरणावरील समितीने एरेटेड शीतपेये, सिगारेट, तंबाखू आणि संबंधित उत्पादनांसारख्या वस्तूंवर कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व वस्तूंवर सध्या 28 टक्के इतका जीएसटी आकारला जातो. त्यात आता 35 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
आयटीसीचा शेअर्स 3 टक्क्यांवरून घसरून एका दिवसाच्या निच्चांकी 462.80 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर व्हीएसटी इंडस्ट्रीजचे शेअर्स 2.3 टक्क्यांवरून घसरून, 318.30 रुपयांवर आला आहे. तर गॉडफ्रे फिलिप्सचा शेअर मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 3.2 टक्क्यांवरून 5,575.50 वर आला आहे.
ओला इलेक्ट्रिक शेअरमध्ये 16 टक्क्यांहून अधिक वाढ; कंपनी देशभर उभारणार नवीन स्टोअर्स!
काय करते ही कंपनी?
आयटीसी लिमिटेड हा कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत येथे मुख्यालय असलेला सार्वजनिक उद्योगसमूह आहे. हा चार उद्योगक्षेत्रांमध्ये काम करतो. यात प्रामुख्याने जलद खपाच्या ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी), हॉटेल, पुठ्ठ्याचे (कार्ड बोर्ड) व कागदी पॅकेजिंग आणि शेतकी व्यापार या क्षेत्रांचा समावेश होतो. या उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल सुमारे ७ अब्ज अमेरिकन डॉलर आहे.
‘या’ शेअरच्या किंमतीत वर्षभरात 500 टक्क्यांहून अधिक वाढ; आता 10 भागांत स्प्लिट होणार!
तंबाखूजन्य उत्पादनांमध्ये ही भारतातील सर्वांत मोठी कंपनी आहे. त्यामुळे आता तंबाखू उत्पादनांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. परिणामी, त्याचा आयटीसी लिमिटेडच्या शेअरवर मोठा परिणाम दिसून आला आहे. आज कंपनीचा शेअर तब्बल ४.६५ टक्क्यांनी घसरला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)