करारो इंडियाचा आयपीओ खुला; गुंतवणूकदारांना करावी लागणार किमान 'इतकी' गुंतवणूक
जैवइंधन आणि त्याच्या उप उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या राजपुताना बायोडिझेलच्या शेअर्सने आज एनएसई एसएमई अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर दमदार प्रवेश केला. राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज शेअर्स एनएसई, एसएमईवर 247 रुपयांवर लिस्ट झाला आहे. याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदारांना 90 टक्के लिस्टिंग फायदा मिळाला आहे. सूचीबद्ध झाल्यानंतर 259.35 रुपयांच्या अप्पर सर्किटवर गेला आहे. म्हणजे आयपीओ गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट झाले आहेत. दरम्यान, या आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत 130 रुपये हाेती.
718.81 पट सबस्क्राइब
राजपुताना बायोडिझेलचा 24.70 कोटी रुपयांचा आयपीओ 26-28 नोव्हेंबर दरम्यान खुला झाला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ एकूण 718 पट भरला. पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव भाग 177.38 पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी भाग 1,345.96 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा भाग 746.57 पट भरला गेला.
अदानी समूहाच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; दिवसभरात कमावले 20000 कोटी रुपये!
निधीचा वापर
आयपीओमध्ये 19 लाख नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहेत. कंपनी या शेअर्सद्वारे उभारलेल्या निधीचा वापर तिच्या मेरठ-आधारित उपकंपनी निर्वाणराज एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला तिच्या उत्पादन सुविधांचा विस्तार करण्यासाठी, कार्यरत भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी करणार आहे.
राजपुताना बायोडिझेलबद्दल
वर्ष 2016 मध्ये स्थापना झालेली राजपुताना बायोडिझेल जैवइंधन तसेच ग्लिसरीन आणि फॅटी ऍसिडस् यांसारखी उप-उत्पादने तयार करते. कंपनीची उत्पादन सुविधा फुलेरा, राजस्थानच्या जी-24 रिको इंडस्ट्रियल एरियामध्ये आहे. कंपनीची उत्पादन क्षमता सध्या 24 किलोलिटर प्रतिदिन असून 30 किलोलिटरसाठी मंजुरी मिळाली आहे. उत्पादन पोर्टफोलिओमध्ये बायोडिझेल, क्रूड ग्लिसरीन, कॉस्टिक पोटॅश फ्लेक्स, वेस्ट स्लज, वापरलेले स्वयंपाक तेल, लघुग्रह फॅटी ऍसिडस्, मिथेन, सायट्रिक ऍसिड, रिफाइन्ड राइस ऑइल, क्रूड सनफ्लॉवर ऑइल, सोडियम मेथॉक्साइड, आरबीएम पाम स्टीअरिन यांचा समावेश आहे.
वर्षभरात 10 हजाराचे झाले 1 कोटी रुपये; 3 रुपयांवरून 2 लाख 36 हजारांपर्यंत पोहचली शेअरची किंमत!
किती आहे कंपनीचा निव्वळ नफा
कंपनीचा आर्थिक वर्ष 2022 मध्ये, निव्वळ नफा 19.97 लाख रुपये होता. जो पुढील आर्थिक वर्ष 2023 मध्ये 1.69 कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये 4.52 कोटी रुपयांवर गेला. या कालावधीत, कंपनीचा महसूल वार्षिक 75 टक्क्यांहून अधिक चक्रवाढ दराने वाढून 53.68 कोटी रुपये झाला आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एप्रिल-जुलैमध्ये 2.60 कोटी रुपयांचा निव्वळ नफा आणि 27.79 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)