'या' शेअरच्या किंमतीत वर्षभरात ५०० टक्क्यांहून अधिक वाढ; आता १० भागांत स्प्लिट होणार!
देशातील आघाडीची ज्वेलरी कंपनी पीसी ज्वेलर्सचा शेअर सोमवारी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) ५ टक्क्यांनी वधारला आहे. त्यामुळे आता या शेअरची किंंमत तब्बल १७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या पाच दिवसांत ज्वेलरी कंपनीच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी १:१० या प्रमाणात आपले शेअर्स स्प्लिट करत आहे. म्हणजेच कंपनी आपल्या शेअर्सचे १० भागांमध्ये विभाजन करत आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १८६.८० रुपये असून, त्यांचा ५२ आठवड्यांचा निच्चांकी स्तर २७.६६ रुपये इतका आहे.
‘या’ शेअरमुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची दुप्पट कमाई; लिस्टिंगनंतर शेअर्सला अप्पर सर्किट!
कधी आहे रेकॉर्ड डेट
मल्टीबॅगर कंपनी पीसी ज्वेलर्स आपल्या शेअर्सना १० भागांमध्ये स्प्लिट करत आहे. यानंतर ज्वेलरी कंपनी १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची फेस व्हॅल्यू १ रुपया होईल. कंपनीने शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट १६ डिसेंबर २०२४ निश्चित केली आहे. पीसी ज्वेलर्सने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देखील भेट दिले आहेत. कंपनीने जुलै २०१७ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. म्हणजेच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक १ शेअर मागे १ बोनस शेअर दिला आहे.
अदानी समूहाच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; दिवसभरात कमावले 20000 कोटी रुपये!
वर्षभरात ५०० टक्क्यांहून अधिक वाढ
पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी ज्वेलरी कंपनीचा शेअर २८.५० रुपयांवर होता. पीसी ज्वेलर्सचा शेअर २ डिसेंबर २०२४ रोजी १७१.५० रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये सुमारे २४१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
अनिल अंबानींसाठी आणखी एक संकट; सेबीने ‘या’ कंपनीवर केली मोठी कारवाई!
दरम्यान, चालू वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी २०२४ रोजी कंपनीचा शेअर ५०.३५ रुपयांवर होता. २ डिसेंबर ०२४ रोजी कंपनीचा शेअर १७० रुपयांच्या वर पोहोचला आहे. गेल्या ६ महिन्यांत पीसी ज्वेलर्सच्या शेअरमध्ये २५२ टक्क्यांची वाढ झाली. तर या काळात कंपनीचा शेअर ४८.७३ रुपयांवरून १७१.५० रुपयांवर पोहोचला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)