देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी कंपनीच्या किरकोळ विक्री नेटवर्कसाठी मोठी विस्तार योजना जाहीर केली आहे. त्यानंतर आता कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या नवीन अपडेटनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दोन सत्रांमध्ये १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
काय म्हटले आहे भाविश अग्रवाल यांनी?
ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी सांगितले आहे की, ओला इलेक्ट्रिक या महिन्याच्या अखेरीस आपल्या स्टोअरची संख्या 800 वरून 4000 पर्यंत वाढवू शकते. ही सर्व दुकाने 20 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यानंतर आता ओला कंपनीच्या शेअरमध्ये ही वाढ पाहायला मिळत आहे.
‘या’ शेअरच्या किंमतीत वर्षभरात 500 टक्क्यांहून अधिक वाढ; आता 10 भागांत स्प्लिट होणार!
नवीन स्टोअर्स उघडले जाणार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये माहिती देताना भाविश अग्रवाल म्हणाले आहे की, या महिन्यात आपण आपली कंपनी ओला इलेक्ट्रिक ला इलेक्ट्रिक क्रांतीच्या पुढील स्तरावर नेले जाणार आहे. सध्या ओलाचे देशभरात जवळपास 800 स्टोअर्स आहेत. ज्यांची संख्या या महिन्यात 4000 पर्यंत वाढली आहे. आमचे ध्येय आमच्या ग्राहकांच्या शक्य तितक्या जवळ जाणे आहे. कंपनीची संपूर्ण भारतभरातील नवीन स्टोअर्स 20 डिसेंबर रोजी एकाच वेळी सुरू होणार आहेत. असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, भावीश अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे वर्णन केले आहे की, ते आतापर्यंतचे सर्वात मोठे एकल स्टोअर डे उद्घाटन आहे. प्रत्येक स्टोअरमध्ये संपूर्ण भारतातील ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सेवा क्षमता समाविष्ट केली जाईल. असेही ते म्हणाले आहे.
‘या’ शेअरमुळे पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची दुप्पट कमाई; लिस्टिंगनंतर शेअर्सला अप्पर सर्किट!
दोन सत्रांमध्ये शेअर १६ टक्क्यांनी वाढला
2 डिसेंबर अर्थात सोमवारी ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स 94.19 रुपयांवर उघडले. थोड्या घसरणीसह 93.26 रुपयांवर बंद झाले. या सत्रादरम्यान, ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स 101.42 रुपयांच्या उच्च पातळीवर आणि 92.50 रुपयांच्या निम्न पातळीवर व्यवहार करत होते. ओला इलेक्ट्रिकचा शेअरही 157.53 रुपयांच्या उच्च पातळीवर आणि 66.60 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर गेला आहे. सोमवारी (ता.२) ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स 6 टक्क्यांहून अधिक वाढले होते आणि ते प्रति शेअर 92.90 रुपयांवर ट्रेडिंग करत होते. तर आज मंगळवारी दुपारपर्यंत दोन सत्रांमध्ये त्यात तब्बल १६ टक्के वाढ दिसून आली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)