Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

99 रुपयांच्या या शेअरच्या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद; 31 वर्ष जुनी आहे कंपनी; वाचा… सविस्तर!

ख्याती ग्लोबल व्हेंचर्स या कंपनीने आपला आयपीओ शुक्रवारी (ता.५) लाँन्च केला आहे. हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला असून, त्यास पहिल्याच दिवशी जवळपास तीन पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी ८ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 05, 2024 | 09:38 PM
99 रुपयांच्या या शेअरच्या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद; 31 वर्ष जुनी आहे कंपनी; वाचा... सविस्तर!

99 रुपयांच्या या शेअरच्या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद; 31 वर्ष जुनी आहे कंपनी; वाचा... सविस्तर!

Follow Us
Follow Us:

सध्या शेअर बाजारात आयपीओंचा पूर आला आहे. एकामागोमाग एक आयपीओ शेअर बाजारात दाखल होत आहे. अशातच आता ख्याती ग्लोबल व्हेंचर्स या आणखी एका कंपनीने आपला आयपीओ लाँन्च केला आहे. शुक्रवारी (ता.५) हा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला करण्यात आला. या आयपीओला पहिल्याच दिवशी जवळपास तीन पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. दरम्यान, यातील रिटेल हिस्सा ४.०१ पट आणि एनआयआय हिस्सा १.६६ पट बुक झाला आहे. हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी ८ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.

९९ रुपये आहे प्राईस बॅंड
ख्याती ग्लोबल व्हेंचर्सच्या आयपीओसाठी प्रति शेअर प्राइस बँड ९९ रुपये आहे, ज्याची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे. एका लॉटमध्ये १२०० शेअर्स आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांनी कमीत कमी एका लॉटसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना १ लाख १८ हजार ८०० रुपयांची व्यवस्था करावी लागणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – ‘या’ कंपनीने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी केलीये मोठी डील; गुंतवणूकदारांकडून शेअर्सची चौफेर खरेदी!

३१ वर्ष जुनी कंपनी

१९९३ मध्ये अस्तित्वात आलेली ख्याती ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड पूर्वी ख्याती अॅडव्हायझरी सर्व्हिसेस लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. अन्न आणि बिगर-खाद्य उत्पादने, घरगुती वस्तूंसह विविध एफएमसीजी वस्तूंची निर्यात आणि रिपॅकेजिंगवर कंपनी लक्ष केंद्रित करते. याव्यतिरिक्त, कंपनी फार्मास्युटिकल उत्पादनांच्या व्यवसायातही गुंतलेली आहे.

कंपनीचे अनेक मोठे ग्राहक

एव्हरेस्ट, पार्ले जी, एमडीएच, फॉर्च्यून, आशीर्वाद, गोवर्धन, बालाजी वेफर्स, हल्दीराम, हिमालय, डव्ह, कोलगेट, युनिलिव्हर, गोदरेज हे ख्याती ग्लोबल व्हेंचर्सचे लोकप्रिय ग्राहक आहेत. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही ख्याती ग्लोबल व्हेंचर्सच्या आयपीओची रजिस्ट्रार आहे. दरम्यान, आर्यमन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर असून आर्यमन कॅपिटल मार्केट्स लिमिटेड ही त्याची मार्केट मेकर आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Khyati global ventures ipo overwhelming response to global ventures share at rs 99 the company is 31 years old

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 09:38 PM

Topics:  

  • IPO
  • share market

संबंधित बातम्या

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा
1

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर
2

Share Market Today: शेअर बाजारात आज कोणते स्टॉक्स चर्चेत? कशी होणार सुरुवात? जाणून घ्या सविस्तर

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
3

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
4

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.