Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत टाटा मोटर्ससह ‘या’ शेअर्सवर असेल नजर

Share Market Update: सेन्सेक्स-निफ्टी आज हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील महिन्यात आरबीआयच्या संभाव्य व्याजदर वाढीबद्दल चिंता वाढल्याने शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह बंद झाले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2026 | 08:43 AM
Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत टाटा मोटर्ससह 'या' शेअर्सवर असेल नजर

Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत टाटा मोटर्ससह 'या' शेअर्सवर असेल नजर

Follow Us
Follow Us:
  • सेन्सेक्स आणि निफ्टी ५० सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता
  • शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराच्या तीन सत्रांच्या तेजीला ब्रेक लागला
  • टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, गोदरेज इंडस्ट्रीज, हीरो मोटर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
India Share Market Update: भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आशियाई बाजारपेठा घसरणीसह उघडल्या आणि प्रमुख प्रादेशिक निर्देशांकांमध्ये जपानचा निक्केई २२५ आघाडीवर होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण! 24, 22 आणि 18 कॅरेटचा भाव किती? जाणून घ्या

शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराच्या तीन सत्रांच्या तेजीला ब्रेक लागला. किरकोळ महागाईत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ झाल्याने आणि त्यामुळे पुढील महिन्यात आरबीआयच्या संभाव्य व्याजदर वाढीबद्दल चिंता वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह बंद झाले. ३०-शेअर सेन्सेक्स ३१८.५६ अंकांनी, म्हणजेच ०.३९ टक्क्यांनी घसरून ८१,५९२.४५ वर बंद झाला. सत्रादरम्यान निर्देशांकावर मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव होता, ज्यामुळे तो ६२२.२६ अंकांनी, म्हणजेच ०.७५ टक्क्यांनी घसरून ८१,२८८.७५ च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला होता. निफ्टी ५० मध्येही १५५.०५ अंकांची, म्हणजेच ०.६१ टक्क्यांची घसरण होऊन तो २५,१४४.३० वर स्थिरावला. शुक्रवारच्या नुकसानीमुळे या महिन्यात आतापर्यंत दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये पहिली लक्षणीय घसरण झाली.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार आजच्या व्यवहारात टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, गोदरेज इंडस्ट्रीज, हीरो मोटर्स, झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसेस, हिंडाल्को इंडस्ट्रीज, रेडिंग्टन इंडिया, फ्यूजन सीएक्स, फिजिक्सवाला, अर्बन कंपनी, एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग स्टॉक्स, या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख, चंदन तापारिया यांनी गुंतवणूकदारांना तीन स्टॉक्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एमसीएक्स, बीएसई आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे.

Vedanta Nand Ghar: बालदिनानिमित्त चिमुकल्यांसाठी खास उपक्रम! वेदांताच्या ‘नंद घर’ आणि चाइल्डफंड इंडियाचा ‘बालसेतू’ सुरू

आनंद राठी येथील इक्विटी रिसर्चचे एव्हीपी, गणेश डोंगरे यांनी गुंतवणूकदारांना रेडिंग्टन, अ‍ॅस्टर डीएम, आणि कॅनरा बँक हे तीन शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी १०० रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी लॉयड्स इंजिनिअरिंग, निवा बुपा, वेदांता पॉवर या तीन शेअर्सची निवड केली आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today at november 16 sensex and nifty likely to open higher stocks to watch today hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Stock Market: FII कडून भारतीय शेअर बाजारात ३३,३४० कोटींची गुंतवणूक; बँक निफ्टीची दमदार कामगिरी
1

Stock Market: FII कडून भारतीय शेअर बाजारात ३३,३४० कोटींची गुंतवणूक; बँक निफ्टीची दमदार कामगिरी

Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला ‘हे’ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला
2

Share Market Today: शेअर बाजारात आज पडझडीचे संकेत! तज्ज्ञांनी दिला ‘हे’ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला

Share Market Closed : शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! 10 नोव्हेंबरला बंद राहणार शेअर बाजार; नेमकं काय आहे कारण?
3

Share Market Closed : शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! 10 नोव्हेंबरला बंद राहणार शेअर बाजार; नेमकं काय आहे कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.