
IPO (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या महानदी कोलफिल्ड्सचा 8,981.2 कोटी रुपयांचा आयपीओ 19 नोव्हेंबर 2026 रोजी खुला होत आहे. शेअर बाजारात पैसा लावणाऱ्यांसाठी परत एक मोठी संधी आलीय. ज्याची सगळे वाट बघत होते, तो महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडचा IPO अखेर आला.
कोल इंडिया लिमिटेडची हीू कोल इंडियाची पूर्ण मालकीची कंपनी आहे. ही देशात सगळ्यात जास्त कोळसा काढणारी कंपनी जी आपल्या 8,981.2 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्रति शेअर 129 ते 136 रुपये इतकी प्राइस बँड निश्चित केली आहे.IPO
एका शेअरची किंमत 129 ते 136 रुपयांच्या मध्ये ठेवलीय. सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 19 नोव्हेंबर 2026 रोजी खुला होणार असून 23 नोव्हेंबर 2026 पर्यंत यामध्ये पैसे गुंतवता येतील. हा IPO 4 दिवस राहिल.
संपूर्ण आयपीओ ‘ऑफर फॉर सेल’ स्वरूपाचा आहे. यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा पूर्ण IPO OFS आहे. ऑफर फॉर सेल.
बुक-बिल्ट पद्धतीने आणल्या जाणाऱ्या या आयपीओअंतर्गत एकूण 66.18 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
एकूण 66 कोटी 18 लाख शेअर विकायला काढलेत. महत्त्वाचं म्हणजे, हे शेअर कंपनी विकत नाहीये, तर आधीपासून असलेले भागधारक विकतायत. त्यामुळे या आयपीओमधून उभा राहणारा सर्व निधी थेट शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना मिळणार असून कंपनीच्या तिजोरीत नवीन भांडवल जमा होणार नाही.
कंपनीला यातून एक रुपयाही मिळणार नाही. जो पैसा येईल, तो शेअर विकणाऱ्याला मिळेल.
आयपीओ बंद झाल्यानंतर 25 नोव्हेंबर 2026 रोजी शेअर्सचे वाटप निश्चित केले जाईल, तर 27 नोव्हेंबर 2026 रोजी बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांवर कंपनीच्या शेअर्सची नोंदणी होण्याची शक्यता आहे.
IPO बंद झाला की 25 तारखेला कोणाला किती शेअर मिळाले, ते ठरेल. तसेच 27 तारखेला BSE आणि NSE वर शेअर लिस्ट होईल. म्हणजे तेव्हापासून तुम्ही विकू-घेऊ शकता.
एका लॉटसाठी किती पैसा लागणार?या आयपीओतील प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) 2 रुपये इतके आहे.
एका शेअरची फेस व्हॅल्यू फक्त 2 रुपये आहे. प्राइस बँडचा किमान दर दर्शनी मूल्याच्या 64.50 पट, तर कमाल दर 68 पट इतका आहे.
गुंतवणूकदारांना अर्ज करताना किमान 110 शेअर्सचा एक लॉट घ्यावा लागेल आणि त्यानंतर 110 च्या पटीत अर्ज करता येईल.तुम्हाला कमीत कमी 110 शेअर घ्यावेच लागतील. 110, 220, 330 असं.
जर तुम्ही वरच्या दराने म्हणजेच 136 रुपये प्रति शेअर या किमतीने एका लॉटसाठी बोली लावली, तर किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,960 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.म्हणजे एका लॉटसाठी 14,960 रुपये लागतील. 136 गुणिले 110 = 14,960.याशिवाय, कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यातून अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 6 रुपयांची विशेष सवलत दिली जाणार आहे.
कंपनीत काम करणाऱ्यांना 6 रुपये सूट मिळणार आहे. त्यांना 130 रुपयाला शेअर मिळेल.
आर्थिक वर्ष 2025-26 च्या कमाईच्या आकडेवारीनुसार, किमान किमतीवर कंपनीचा प्राइस-टू-अर्निंग (P/E) गुणोत्तर 8 पट, तर कमाल किमतीवर 8.43 पट इतका भरतो.
तर कंपनी किती कमवते, त्यामानाने शेअरची किंमत किती आहे. इथे P/E आहे 8 ते 8.43. या क्षेत्रातील इतर स्पर्धक कंपन्यांचा सरासरी पी/ई रेशो 11.57 पट इतका आहे.बाकीच्या कोळसा कंपन्यांचा P/E 11.57 आहे. त्यामानाने MCL चा P/E कमी आहे. म्हणजे हा IPO जरा स्वस्तात मिळतोय, असं म्हणता येईल.
तसेच, गेल्या तीन वर्षांतील कंपनीचा सरासरी ‘रिटर्न ऑन नेट वर्थ’ (RoNW) 61.25 टक्के इतका दमदार राहिला आहे.कंपनी करते काय? किती कमवते?आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 3 टक्क्यांनी वाढून 33,899 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी 33,029 कोटी रुपये इतके होते.
मात्र, याच कालावधीत करानंतरचा निव्वळ नफा (PAT) 1 टक्क्याने किंचित घटून 10,825 कोटी रुपयांवरून 10,698 कोटी रुपयांवर आला आहे.कमाई वाढलीय, पण नफा थोडा कमी झालाय. 10,825 कोटींवरून 10,698 कोटींवर आलाय.एप्रिल 1992 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी ओडिशातील तालचेर आणि इब व्हॅली कोळसा क्षेत्रातून प्रामुख्याने नॉन-कोकिंग कोळशाचे उत्खनन करते.
ही कंपनी 1992 पासून आहे. ओडिशात तालचेर आणि इब व्हॅली इथे तिच्या खाणी आहेत. तिथून कोळसा काढते. वीजनिर्मिती केंद्रांसह सिमेंट, पोलाद, अॅल्युमिनियम, स्पंज आयर्न आणि कागद उद्योगांना ती कोळसा पुरवते.
30 जून 2026 पर्यंत कंपनीच्या एकूण 17 खाणी कार्यरत होत्या, ज्यात 14 खुल्या (ओपनकास्ट) आणि 3 भूमिगत खाणींचा समावेश आहे.एकूण 17 खाणी आहेत. 30 सप्टेंबर 2026 च्या आकडेवारीनुसार कंपनीत 20,526 कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत आहेत.थोडक्यात, कंपनी मजबूत आहे, पण IPO लावायचा की नाही, हे तुम्ही तुमच्या जोखमीवर ठरवा.
Ans: महानदी कोलफिल्ड्सचा IPO 19 नोव्हेंबर 2026 रोजी खुला होणार असून 23 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येईल.
Ans: या IPO ची प्राइस बँड 129 ते 136 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
Ans: एका लॉटमध्ये 110 शेअर्स असतील. त्यानंतर 110 शेअर्सच्या पटीत अर्ज करता येईल.