
Zudio असो की Westside, Tata च्या 'या' क्लोथिंग ब्रँडमधून लोक बॅगा भरभरून शॉपिंग करतात
भारतात बदलत्या काळानुसार भारतीयांच्या फॅशन सेन्समध्ये सुद्धा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत टाटाने एक नव्हे तर अनेक क्लोथिंग ब्रँड्स उघडले, जिथे ग्राहकांना उत्तम क्वालिटीचे कपडे मिळेल.
जर तुम्ही कपडे खरेदी करत असाल तर तुम्ही वेस्टसाइड आणि झुडिओ बद्दल नक्कीच ऐकले असेल. टाटा ग्रुपच्या या दोन्ही रिटेल कंपन्या ट्रेंट लिमिटेडमध्ये काम करतात. टाटा ट्रेंटने FY26 च्या दुसऱ्या तिमाहीत 451 कोटींचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला. चला आज आपण टाटाच्या क्लोथिंग ब्रँड्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
वेस्टसाइड, झुडिओ, तानेरा आणि टाटा सीएलआयक्यू लक्झरी सारख्या लोकप्रिय ब्रँडसह, टाटा ग्रुप प्रीमियम फॅशनपासून ते परवडणाऱ्या दैनंदिन कपड्यांपर्यंत विविध प्रकारच्या कपड्यांचे ऑप्शन्स ऑफर करतात. मग ते एथनिक कपडे असो, ट्रेंडी फॅशन असो किंवा लक्झरी लेबल्स असो, टाटा ग्रुपने सर्व कॅटेगरीमध्ये एक प्रमुख ब्रँड म्हणून स्वतःची ओळख केली आहे.
Lenskart IPO Listing Price बद्दल गुंतवणूकदारांना मोठी भीती? सोमवारी नुकसान होणार की फायदा?
वेस्टसाइड हा टाटा समूहातील प्रमुख फॅशन रिटेल ब्रँड असून पुरुष, महिला आणि मुलांसाठी कपडे, पादत्राणे आणि ॲक्सेसरीजची विस्तृत ऑप्शन्स प्रदान करतो. हा ब्रँड ज़ुबा, LOV, Nuon, Wardrobe, Utsa, WES आणि Zudio यांसारखी खासगी लेबल्सही संचलित करतो.
झुडिओ हा टाटाचा परवडणारा फास्ट-फॅशन ब्रँड असून बजेट-जागरूक ग्राहकांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आला आहे. स्पर्धात्मक दरांत ट्रेंडी कपडे उपलब्ध करून देणे हे याचे मुख्य वैशिष्ट्य असून त्यामुळे हा ब्रँड विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
टाटा क्लिक हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून प्रीमियम आणि लक्झरी फॅशन ब्रँड्समध्ये त्याची विशेषता आहे. अरमानी, ह्यूगो बॉस आणि सत्य पॉल यांसारखे जागतिक तसेच भारतीय डिझायनर ब्रँड्स येथे उपलब्ध असून उच्च वर्गीय ग्राहकांसाठी उत्कृष्ट खरेदी अनुभव प्रदान केला जातो.
तनेरा हा टाटाचा एथनिक वेअर ब्रँड असून हस्तनिर्मित साड्या आणि पारंपरिक भारतीय परिधानांसाठी प्रसिद्ध आहे. बनारसी, कांचीवरम आणि चंदेरी यांसारख्या उत्कृष्ट साड्यांमध्ये तनेराची खास ओळख आहे. येथे शिल्पकौशल्य आणि भारतीय वारसा यांना विशेष महत्त्व दिले जाते.
लँडमार्क समूहासोबतच्या संयुक्त उपक्रमातून टाटा भारतात टाटा-व्यवस्थापित स्टोअर्सच्या माध्यमातून यूनायटेड कलर्स ऑफ बेनेटन (UCB), GAP आणि इतर जागतिक ब्रँड्सचे संचालन व विक्री करते.