(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वास्तविक पाहता, घोटाळेबाज लोकांच्या नकळत किंवा संमतीशिवाय त्यांच्या नावावर कर्ज मिळवण्यासाठी चोरलेल्या पॅन तपशिलाचा वापर करतात. डिजिटल कर्जपुरवठा आणि त्वरित कर्ज मंजुरीच्या वाढत्या ट्रेंडमुळे घोटाळेबाजांना वेरिफिकेशन सिस्टमचा गैरफायदा घेता येतो. परिणामी, या सगळ्याला बळी पडलेल्या व्यक्तींचा क्रेडिट स्कोअर खराब होत आहे. त्यांना सतत वसुलीसाठी फोन येतात.
फसवणूक करणारे केवळ पॅन डिटेल्सवर अवलंबून राहत नाहीत; त्याऐवजी, ते ही माहिती आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि जन्मतारीख यांसारख्या इतर तपशिलांसह एकत्र करून एक बनावट ओळख तयार करतात. ते अनेकदा डेटा लीक, फिशिंग लिंक्स किंवा कायदेशीर सेवांची नक्कल करणाऱ्या बनावट ॲप्लिकेशन्सद्वारे ही माहिती गोळा करतात. अशा बनावट ओळखीचा वापर करून, घोटाळेबाज मूळ व्यक्तीला याची किंचितही कल्पना न होऊ देता सहजपणे कर्जासाठी अर्ज करतात आणि कर्ज मंजूर करुनही घेतात.
‘द इकॉनॉमिक टाइम्स’च्या एका अहवालानुसार, जर तुमच्या Pan Card चा गैरवापर झाला आहे असा तुम्हाला संशय आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा नेहमी क्रेडिट रिपोर्ट तपासा. TransUnion CIBIL, Experian, Equifax आणि CRIF High Mark यांसारख्या क्रेडिट ब्युरोद्वारे तुम्हाला तुमचा रिपोर्ट पाहणे आणि त्यातील कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य होतं आणि ती सुविधा तुम्हाला दिली जाते.
जर तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये एखादे अनोळखी कर्ज, एखाद्या अज्ञात कर्जदात्याकडून आलेली चौकशी किंवा तुम्हाला ओळखता न येणारे एखादे खाते दिसून आले, तर ते तुमच्या PAN कार्डचा गैरवापर होत असल्याचा सुरुवातीचा अलर्ट आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही त्वरित हालचाली करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एखाद्या fraudulent loan बाबत समोर आलं तर तुम्ही सगळ्या पहिलं त्या कर्जदात्याला संपर्क करा आणि फसवणुकीसंबंधित तक्रार दाखल करा त्यानंतर KYC रिलेटे त्यांच्याकडे असलेल्या सगळ्या कागदपत्रांची मागणी करुन ती सगळी कागदपत्र तपासून पाहा.
त्यानंतर, ‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल’वर तक्रार दाखल करा आणि स्थानिक पोलीस किंवा ‘सायबर सेल’कडे FIR नोंदवा. याव्यतिरिक्त, संबंधित खात्याला ‘फसवणुकीचे खाते’ म्हणजेच fraudulent account म्हणून flag करण्यासाठी TransUnion CIBIL सारख्या क्रेडिट ब्युरोंना हे सुचित करा. शिवाय, तुमची बँक खाती आणि पासवर्ड सुरक्षित करा, तसंच पुढील कोणताही गैरवापर रोखण्यासाठी ‘अलर्ट्स’ चालू करा. जर वेळेवर तक्रार केली गेली, तर कायदा देखील ग्राहकाच्या बाजूने नेहमी उभा राहतो.






