Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Subsidy हवी असेल तर 1 ऑक्टोबरपूर्वी ‘हे’ काम उरका; नाहीतर होऊ शकते अडचण!

LPG Subsidy: घरगुती LPG ग्राहकांसाठी आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची प्रक्रिया सरकारकडून राबवली जात आहे. यामागचा उद्देश पात्र लाभार्थ्यांपर्यंत सबसिडीचा लाभ पोहोचवणे आणि डुप्लिकेट किंवा अपात्र कनेक्शन कमी करणे हा आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 20, 2026 | 12:07 PM
LPG Subsidy हवी असेल तर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

LPG Subsidy हवी असेल तर (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • LPG ग्राहकांसाठी Aadhaar-based biometric e-KYC प्रक्रिया सुरू
  • डिलिव्हरीवेळी, LPG वितरकाकडे किंवा OMC अॅप
  • 1 ऑक्टोबरची सक्ती आणि सबसिडीच्या रकमेबाबतचे दावे
 

घरात गॅस सिलिंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. सरकारने घरगुती गॅस सिलिंडरसाठी एक नवीन नियम काढला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून तुम्हाला जर सबसिडी वाला सिलिंडर हवा असेल तर बायोमेट्रिक आधार व्हेरिफिकेशन करावंच लागेल. अंगठा लावल्याशिवाय स्वस्तात गॅस मिळणार नाही. सरकारने शनिवारीच याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की सगळ्या ग्राहकांनी वेळेत आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यावं. नाहीतर नंतर त्रास होईल. LPG Subsidy

हा नियम का आणलाय?

सरकारचं म्हणणं आहे की हा नियम कोणाला त्रास देण्यासाठी नाहीये. तर सबसिडीचा पैसा खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा नियम आहे. अनेक ठिकाणी असं होतं की एकाच नावावर दोन दोन कनेक्शन असतात, किंवा जे लोक पात्र नाहीत ते पण सबसिडी घेतात. काही लोक घरगुती सिलिंडर घेऊन बाहेर हॉटेलमध्ये जास्त पैशात विकतात. हा सगळा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने आता प्रत्येक कनेक्शन आधारला आणि अंगठ्याला जोडायचं ठरवलं आहे. एकदा अंगठा लावला की डुप्लिकेट कनेक्शन आपोआप बंद होतील आणि सिस्टीम एकदम पारदर्शक होईल.

जवळपास 90% लोकांचं काम झालंय

ज्यांनी आधीच आपलं बायोमेट्रिक करून घेतलं आहे त्यांना काहीच करायची गरज नाही. त्यांचा गॅस पूर्वीसारखाच येत राहील. सरकारने सांगितलं की 19 सप्टेंबर 2026 पर्यंत देशात 27.43 कोटी लोकांनी म्हणजे 89.8% लोकांनी आपलं बायोमेट्रिक पूर्ण केलं आहे. म्हणजे अजून पण 10% लोक बाकी आहेत. त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावं.

व्हेरिफिकेशन कसं करायचं?

ज्यांचं अजून बाकी आहे त्यांच्यासाठी सरकारने खूप सोपे पर्याय दिले आहेत.जेव्हा तुमचा गॅस वाला घरी सिलिंडर द्यायला येईल, तेव्हाच तो त्याच्या मोबाईल मधल्या OMC App वर तुमचा अंगठा घेऊन व्हेरिफिकेशन करू शकतो. तुम्हाला कुठे जायची गरज नाही.

Petrol Pump UPI MDR Charges: चालकांचा मोठा इशारा! पेट्रोल भरायला निघताय? UPIवर अवलंबून राहू नका…

तुम्ही थेट तुमच्या गॅस एजन्सीच्या दुकानात जाऊन पण हे करू शकता.

घरी बसून पण e-KYC करता येते. जर तुमचा इंडेन गॅस असेल तर Indian Oil One App वापरा. भारत गॅस असेल तर Hello BPCL App आणि HP गॅस असेल तर HP Pay App वरून तुम्ही घरबसल्या KYC करू शकता. PMUY पोर्टलवर याचे व्हिडिओ पण आहेत, ते पाहून तुम्ही करू शकता. आधी याची शेवटची तारीख 30 जून 2026 होती, पण लोकांची सोय व्हावी म्हणून सरकारने ती अनेक वेळा वाढवली. 31 जुलै, 7 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि शेवटी 14 सप्टेंबर अशी तारीख वाढवत नेली. पण आता 1 ऑक्टोबरपासून हा नियम सक्तीचा होणार आहे.

अंगठा नाही लावला तर काय होईल?

जर तुम्हाला बायोमेट्रिक करायचं नसेल किंवा तुम्ही करू शकत नसाल, तर तुम्हाला गॅस मिळणार नाही असं नाही. गॅस मिळेल पण तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. तुम्हाला बाजार भावाने पूर्ण पैसे द्यावे लागतील.

अशा लोकांना फक्त 5 किलो किंवा 10 किलोचाच सिलिंडर मिळेल, 14.2 किलोचा मोठा सिलिंडर मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला OMC च्या वेबसाईटवर किंवा WhatsApp, Chatbot वर जाऊन तुमची इच्छा सांगावी लागेल.

Business Success Rules : व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘हे’ नियोजन आवश्यक! वर्किंग कॅपिटल आणि नेटवर्क बिल्डींग कसे कराल?

सबसिडी किती मिळते?

सध्या सरकार घरगुती सिलिंडरवर सबसिडी देतच आहे. सप्टेंबर 2026 मध्ये 14.2 किलोच्या सिलिंडरवर 210 रुपयांची सबसिडी मिळत आहे. सरकार म्हणतंय की पुढच्या वर्षी जून पर्यंत ही सबसिडी 721 रुपयांपर्यंत जाईल. त्यामुळे जर तुम्हाला स्वस्तात गॅस हवा असेल तर लवकरात लवकर आपला अंगठा लावून व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या.

Web Title: Lpg subsidy 2026 biometric aadhaar ekyc new rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Commercial LPG
  • lpg cylinder
  • LPG Subsidy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.