Petrol Pump UPI MDR Charges: चालकांचा मोठा इशारा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Petrol Pump Operators on UPI MDR Charges: पेट्रोल भरायला जाताय? मग जरा थांबा आणि ही बातमी पूर्ण वाचा. कारण आता पेट्रोल पंपावर UPI ने पैसे दिले तर कदाचित तुमचा पेमेंट घेतला जाणार नाही. मुंबईतल्या पेट्रोल पंप मालकांनी थेट इशारा दिला आहे की आम्ही UPI बंद करणार. फक्त मुंबईतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात हाच विषय तापला आहे.
तर सरकारने एक नवीन नियम आणलाय. 2000 रुपयापेक्षा जास्त UPI पेमेंट केलं तर दुकानदाराला किंवा ज्याने पैसे घेतले त्याला जवळपास 5 रुपये MDR म्हणजे Merchant Discount Rate द्यावा लागणार आहे. म्हणजे प्रत्येक 2000 च्या वरच्या व्यवहारामागे 5 रुपये कट होणार. 5 रुपये कमी वाटतील, पण पेट्रोल पंपावर दिवसभरात शेकडो लोक पेट्रोल भरतात. प्रत्येकाकडून 5 रुपये गेले तर दिवसाचा हिशोब हजारो रुपयात जातो. महिन्याचा हिशोब केला तर खूप मोठा भुर्दंड पडतो. त्यामुळे पेट्रोल पंप डीलर्सनी सरळ सांगितलं आहे, जर हा 5 रुपयाचा चार्ज लागणार असेल तर आम्ही 2000 रुपयाच्या वर UPI घेणारच नाही. तुम्हाला कॅश द्यावी लागेल. Petrol Pump UPI MDR Charges:
मुंबईतल्या पंप चालकांनी सरकारला सांगितलं आहे की आम्हाला या MDR मधून वगळा. जर आमचं ऐकलं नाही तर 15 ऑक्टोबरपासून आम्ही 2000 रुपयाच्या वरचे सगळे UPI पेमेंट बंद करून टाकू.म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर जर तुम्ही 2500 रुपयाचं पेट्रोल भरलं आणि UPI करायला गेलात तर पंपवाला घेणार नाही. तुम्हाला रोख पैसे द्यावे लागतील. त्यामुळे आता पासूनच खिशात थोडी कॅश ठेवायची सवय लावा.
पंप मालकांचं म्हणणं अगदी साधं आहे. ते म्हणतात की आम्हाला पेट्रोल आणि डिझेल विकून आधीच खूप कमी कमिशन मिळतं. आम्ही कित्येक वेळा सरकारकडे कमिशन वाढवा म्हणून मागणी केली, पण सरकारने काहीच केलं नाही.
आधीच नफा कमी आणि त्यात आता UPI वर पण पैसे कट होणार असतील तर आम्ही जगायचं कसं? आमच्या खिशातूनच हे पैसे जाणार आहेत. त्यामुळे हा चार्ज आम्हाला परवडणारा नाही.फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्सचे प्रवक्ते मोंटी सहगल यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं की, “2000 रुपयाच्या वरच्या पेमेंटवर जर सवलत दिली नाही तर आम्ही UPI घेणारच नाही.” कर्नाटकमधल्या डीलर्सनी पण केंद्र सरकारला पत्र लिहून या चार्जमधून वगळा अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे या निर्णयाला विरोध फक्त पंप मालकच नाही तर सत्तेत असलेल्या पक्षातून पण होतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग सेलने पण या निर्णयाला विरोध केला आहे.
उद्योग सेलचे प्रदेश सरचिटणीस मनीष कोंडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांचा विचार करा. UPI वर चार्ज लावला तर डिजिटल इंडिया कसा होणार? लोकांनी ऑनलाईन पेमेंट करायचं की नाही? व्यापाऱ्यांवर असा भार टाकू नका.
केंद्र सरकारकडे याबद्दल पाठपुरावा करा.खरं तर सरकार एकीकडे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देते आणि दुसरीकडे त्यावरच चार्ज लावते, हे लोकांना पचत नाहीये.त्यामुळे आता बघावं लागेल की सरकार हा निर्णय मागे घेते का? पण तोपर्यंत तुम्ही पेट्रोल भरायला जाताना खिशात रोख पैसे ठेवाच. नाहीतर पंपावर वाद व्हायचा.






