Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI वर MDR आकारल्यास पुन्हा रोख व्यवहार वाढतील? 2000 पेक्षा जास्त रकमेच्या पेमेंट्सबाबत महाराष्ट्र चेंबरचा सरकारला मोठा इशारा!

UPI MDR Charges News : केंद्र शासनाने ₹२,००० पेक्षा अधिक रकमेच्या UPI व्यवहारांवर MDR शुल्क आकारण्याच्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा, असे आग्रही आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरने केले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 21, 2026 | 11:45 AM
UPI शुल्कामुळे व्यापाऱ्यांचे गणित बिघडणार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

UPI शुल्कामुळे व्यापाऱ्यांचे गणित बिघडणार! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • UPI शुल्कामुळे व्यापाऱ्यांचे गणित बिघडणार!
  • केंद्र सरकारने तात्काळ समतोल मार्ग काढावा
  • महाराष्ट्र चेंबरची मागणी
UPI MDR Charges News : डिजिटल व्यवहारांना चालना देतानाच उद्योजक आणि व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जाऊ नये, यासाठी केंद्र शासनाने ₹२,००० पेक्षा अधिक रकमेच्या पात्र युपीआय व्यवहारांवरील MDR Merchant Discount Rate आकारणीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरने केली आहे. या निर्णयामुळे देशभरातील व्यापारी आणि उद्योग जगतात चिंतेचे वातावरण पसरले आहे. ( UPI MDR Charges News )

Festival काळात कमाईची मोठी संधी! भारतात लाखो New Jobs ची होणार निर्मिती; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी?

UPI भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा

गेल्या काही वर्षांत युपीआय हे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनले असून, छोट्या दुकानांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत सर्वत्र डिजिटल व्यवहारांना मोठे प्रोत्साहन मिळाले आहे. मात्र, ₹२,००० पेक्षा जास्त मूल्याच्या व्यवहारांवर एमडीआर लागू झाल्यास, कमी नफ्यावर काम करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आर्थिक गणितावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होईल. विशेषतः किरकोळ व्यापार, सेवा क्षेत्र आणि वितरण व्यवस्थेतील घटकांसाठी हा अतिरिक्त खर्च व्यवसाय चालवणे कठीण करणारा ठरू शकतो.

व्यापाऱ्यांना हा भार ग्राहकांवर टाकावा लागेल

व्यवसायात लॉजिस्टिक्स, भाडे, कर आणि मनुष्यबळाचा आधीच मोठा खर्च असतो. अशा स्थितीत एमडीआरची भर पडल्यास व्यापाऱ्यांना हा भार ग्राहकांवर टाकावा लागेल किंवा डिजिटल पेमेंट ऐवजी रोख व्यवहारांचा पर्याय निवडावा लागेल, ज्यामुळे डिजिटल भारताच्या मूळ उद्देशालाच धक्का बसू शकतो. त्यामुळे शासनाने केवळ महसूल वाढीचा विचार न करता देशातील कोट्यवधी लघु व मध्यम उद्योजकांचा आणि ग्राहकांचा विचार करून धोरण ठरवावे.

समतोल राखणारे धोरण आखण्याची हीच योग्य वेळ

महाराष्ट्र चेंबरने स्पष्ट केले आहे की व्यापारी वर्ग डिजिटल व्यवहारांच्या विरोधी नसून, ते अर्थव्यवस्थेच्या औपचारिकीकरणात योगदान देत आहेत. त्यामुळे सरकार, बँका, पेमेंट क्षेत्रातील घटक आणि व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन यावर समतोल मार्ग काढणे आवश्यक आहे. युपीआयची प्रगती आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक हित यांचा समतोल राखणारे धोरण आखण्याची हीच योग्य वेळ आहे.

UPI ला विरोध नाही पण…

 इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी स्पष्ट केलं की, “UPI ला विरोध नाही; अतिरिक्त आर्थिक भाराचा प्रश्न आहे! डिजिटल व्यवहार वाढले पाहिजेत, UPI अधिक मजबूत झाले पाहिजे आणि भारताची डिजिटल अर्थव्यवस्था पुढे गेली पाहिजे. मात्र, या प्रगतीचा खर्च स्वीकारणाऱ्या व्यापारी आणि उद्योजकांच्या खांद्यावरच पडता कामा नये. शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करून उद्योग, व्यापार आणि डिजिटल अर्थव्यवस्था या तिन्हींच्या हिताचा संतुलित मार्ग निश्चित करावा.”

Business Success Rules : व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ‘हे’ नियोजन आवश्यक! वर्किंग कॅपिटल आणि नेटवर्क बिल्डींग कसे कराल?

Web Title: Maharashtra chamber demands reconsideration of upi mdr charges above 2000 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Digital Transaction
  • UPI

संबंधित बातम्या

UPI Payment Rules : दुकानदारांना बसणार दणका… UPI वर ग्राहकांकडून Extra Charge वसूल केला तर QR कोड होणार थेट ब्लॉक!
1

UPI Payment Rules : दुकानदारांना बसणार दणका… UPI वर ग्राहकांकडून Extra Charge वसूल केला तर QR कोड होणार थेट ब्लॉक!

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
2

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?
3

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नव्या MDR रचनेमुळे पेमेंट सिस्टीममध्ये काय बदलणार?

UPI Payment वर चार्ज लागणार? केंद्र सरकारने केलं स्पष्ट,2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटबाबत काय दिला निर्णय?
4

UPI Payment वर चार्ज लागणार? केंद्र सरकारने केलं स्पष्ट,2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटबाबत काय दिला निर्णय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.