Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धोनीचा ‘ड्रोन’ शॉट, हा आयपीओ येण्याआधीच गुंतवले 4 कोटी रुपये; वाचा… का केलीये माहीने गुंतवणूक!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका ड्रोन बनवणाऱ्या कंपनीत मोठी गुंंतवणूक केली आहे. ही कंपनी लवकरच आपला आयपीओ लाँन्च करण्याच्या तयारीत असून, धोनीने त्यात आपले ४ कोटी रुपये लावले आहेत. त्यामुळे आता मैदानापासून दुर असणारा माही उद्योग जगतात चांगलाच सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 05, 2024 | 05:57 PM
धोनीचा 'ड्रोन' शॉट, हा आयपीओ येण्याआधीच गुंतवले ४ कोटी रुपये; वाचा... का केलीये माहीने गुंतवणूक!

धोनीचा 'ड्रोन' शॉट, हा आयपीओ येण्याआधीच गुंतवले ४ कोटी रुपये; वाचा... का केलीये माहीने गुंतवणूक!

Follow Us
Close
Follow Us:

महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेट जगतात झळकणारे मोठे नाव आहे. मात्र, मैदानापासून दुर असणारा माही सध्या उद्योग जगतात. चांगलाच प्रसिद्ध असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजार आठवडाभरापासून मोठी घसरण दिसून आली आहे. असे असतानाही आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एका ड्रोन बनवणाऱ्या कंपनीत मोठी गुंंतवणूक केली आहे. ही कंपनी लवकरच आपला आयपीओ लाँन्च करण्याच्या तयारीत असून, धोनीने त्यात आपले ४ कोटी रुपये लावले आहेत.

महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या मैदानावरच नव्हे तर व्यावसायिक जगतातही मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. त्याने यापुर्वी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आता धोनीने ड्रोन निर्मिती कंपनी गरुड एरोस्पेसमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. धोनीने ही रक्कम अशा वेळी गुंतवली आहे. जेव्हा कंपनी आपला आयपी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

धोनीने गरुड एरोस्पेसमध्ये किती रक्कम गुंतवली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार ही रक्कम 4 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या गुंतवणुकीनंतर धोनीची या कंपनीतील भागीदारी 1.1 टक्के झाली आहे. धोनीने या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यात त्याने आधीच पैसेही गुंतवले आहेत.

हे देखील वाचा – पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट; पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता वाशिम येथून जारी!

काय म्हणालाय धोनी?

धोनी म्हणाला आहे की, गरुडच्या प्रवासाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे कारण ते जागतिक स्तरावर विस्तारत आहेत. तसेच, कृषी, संरक्षण, उद्योग आणि ग्राहक ड्रोन यांचा या क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत आहे. तर गरुड एरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले आहे की, धोनीने गरुड एरोस्पेसमध्ये आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे. त्याचे प्रोत्साहन आणि अतुलनीय पाठिंबा आम्हा सर्वांना आमचे सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा देतो. धोनीच्या स्टार पॉवरने गरुडला भारताच्या सर्वात दुर्गम कानाकोपऱ्यात पोहोचण्यास सक्षम केले आहे.

अनेक कंपन्यांमध्ये धोनीची गुंतवणूक

धोनीची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. तो सध्या आयपीएलमध्ये खेळतो. अशा परिस्थितीत त्याचे उत्पन्न क्रिकेटबरोबरच व्यवसायातूनही होते. धोनी सुप्रसिद्ध कपडे ब्रँड सेव्हनचाही संस्थापक आहे. तो जाहिरातींमधून पैसेही कमावतो. धोनीकडे रांचीमध्ये माही रेसिडेन्सी आणि बेंगळुरूमध्ये एमएस धोनी ग्लोबल स्कूल नावाचे मध्यम श्रेणीचे हॉटेल देखील आहे. धोनीकडे ‘धोनी स्पोर्ट्सफिट’ नावाची जिमची साखळीही आहे. एका रिपोर्टनुसार धोनीची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Mahendra singh dhoni invested rs 4 crore in garuda aerospace before its ipo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 05:55 PM

Topics:  

  • IPO
  • Mahendra Singh Dhoni

संबंधित बातम्या

फिनटेक कंपनी टर्टलमिंटचा IPO बाजारात येण्याच्या तयारीत, DRHP दाखल
1

फिनटेक कंपनी टर्टलमिंटचा IPO बाजारात येण्याच्या तयारीत, DRHP दाखल

सचिन, सेहवागसह ‘या’ दिग्गजांना बाहेरचा रस्ता! दिनेश कार्तिककडून India All-Time T20 Playing XI जाहीर 
2

सचिन, सेहवागसह ‘या’ दिग्गजांना बाहेरचा रस्ता! दिनेश कार्तिककडून India All-Time T20 Playing XI जाहीर 

‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल.. 
3

‘मी त्यांना पसंत नव्हतो…’, निवृत्ती घेताच अमित मिश्राचा ‘या’ दोन भारतीय माजी कर्णधारांवर केला हल्लाबोल.. 

‘यशासोबत कोणी मित्र नसतो, तुम्ही एकटे…’, युवराज-विराटच्या मैत्रीवर योगराज सिंग यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान
4

‘यशासोबत कोणी मित्र नसतो, तुम्ही एकटे…’, युवराज-विराटच्या मैत्रीवर योगराज सिंग यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.