Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI कर्मचाऱ्यांचा मोठा संप! देशभरातील बँकिंग सेवा दोन दिवस ठप्प होण्याची शक्यता; जाणून घ्या याचे कारण

SBI Bank Strike News: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी २५ आणि २६ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. वेतन विसंगती आणि कर्मचारी भरती यासह १६ मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले असून बँकिंग सेवांवर याचा परिणाम होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 15, 2026 | 05:06 PM
SBI कर्मचाऱ्यांचा मोठा संप! (Photo Credit- X)

SBI कर्मचाऱ्यांचा मोठा संप! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • SBI कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
  • देशभरातील बँकिंग सेवा दोन दिवस ठप्प होण्याची शक्यता
  • जाणून घ्या याचे कारण
मुंबई: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ने (AISBISF) मे महिन्याच्या अखेरीस दोन दिवसीय देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँक प्रशासनासोबत दीर्घकाळ चाललेली चर्चा निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशभरातील बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

२५ आणि २६ मे रोजी देशव्यापी संप

यूनियनने दिलेल्या माहितीनुसार, २५ आणि २६ मे २०२६ रोजी देशभरातील एसबीआय कर्मचारी कामावर बहिष्कार टाकतील. विशेष म्हणजे, या दिवसांना जोडून सार्वजनिक सुट्टी किंवा साप्ताहिक सुट्टी आल्यास हे आंदोलन २७ मे पर्यंत सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हा संप ‘इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट, १९४७’ च्या तरतुदींनुसार पुकारण्यात आला आहे.

संपाचे मुख्य कारण: कर्मचाऱ्यांची कमतरता आणि कामाचा ताण

AISBISF ने प्रशासनासमोर एकूण १६ प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाखांमधील कर्मचाऱ्यांची तीव्र टंचाई. युनियनच्या मते  गेल्या ३० वर्षांपासून ‘मेसेंजर’ या पदावर नवीन भरती झालेली नाही, तर क्लार्क संवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्याही सातत्याने कमी होत आहे. नियमित कामांसाठी बाह्य कर्मचाऱ्यांची (Outsource Staff) मदत घेतली जात आहे, ज्याचा परिणाम बँकिंग सेवेच्या गुणवत्तेवर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर होत असल्याचा आरोप युनियनने केला आहे.

Income Tax Return : ITR भरणं कठीण वाटतंय का? मग सोप्या ‘या’ पद्धतीने भरा इन्कम टॅक्स रिटर्न

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या?

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची यादी मोठी असून त्यातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

  • वेतन विसंगती (Salary Disparity): १२ व्या द्विपक्षीय करारात १७% वेतनवाढ निश्चित झाली होती. मात्र, एसबीआयने अधिकाऱ्यांना ‘स्पेशल पे’ देऊन त्यांची वाढ २२% पर्यंत नेली, तर इतर कर्मचारी अजूनही १७% वरच आहेत. ही विषमता दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • NPS मध्ये स्वातंत्र्य: नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत कर्मचाऱ्यांना स्वतःचा ‘पेन्शन फंड मॅनेजर’ निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे.
  • पेंशनमध्ये समानता: सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना ‘पेन्शन पॅरिटी’ मिळावी.
  • भरती प्रक्रिया: रिक्त असलेल्या मेसेंजर आणि क्लार्क पदांवर तात्काळ भरती करण्यात यावी.
  • सेवा अटींमध्ये सुधारणा: पदोन्नती (Promotion) आणि बदली (Transfer) धोरणात पारदर्शकता आणि सुधारणा अपेक्षित आहे.

मे महिनाभर आंदोलनाचे लोण

केवळ दोन दिवसांचा संपच नाही, तर पूर्ण मे महिनाभर युनियनने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याची योजना आखली आहे. यामध्ये खालील उपक्रमांचा समावेश असेल:

१. लंच टाइममध्ये निदर्शने करणे.

२. सोशल मीडियाद्वारे जनजागृती मोहीम राबवणे.SBI

३. शांततापूर्ण मोर्चा आणि धरणे आंदोलन.

४. खासदार आणि सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणे.

ग्राहकांना बसणार फटका?

स्टेट बँकेच्या या संपामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या बँकिंग कामांवर परिणाम होऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून व्यवस्थापनाशी संवाद साधूनही ठोस तोडगा निघाला नसल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आता बँक प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Fuel Price Hike : जगभरात इंधन महागाईचा भडका! UAE मध्ये 52% तर अमेरिकेत 44% वाढ; तर भारतातील इंधन दरवाढ किती?

Web Title: Major strike by sbi employees banking services nationwide likely to come to a standstill for two days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Business News
  • SBI Bank

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.