Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बहुप्रतीक्षित माणदेशी महोत्सव 2025, परळ मध्ये रंगणार; ५ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान महोत्सवाचे आयोजन

दरवर्षी माणदेशी महोत्सवाचे खूपच आकर्षण असते आणि यावेळी हा महोत्सव परळमध्ये ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. यामुळे माणदेशातील महिलांच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळते

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 28, 2025 | 04:15 PM
लवकरच सुरू होणार माणदेशी महोत्सव

लवकरच सुरू होणार माणदेशी महोत्सव

Follow Us
Close
Follow Us:

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित माण देशी फाऊंडेशन आयोजित “माण देशी महोत्सव 2025’’ हा अस्सल मराठमोळ्या मातीचा महोत्सव 5 फेब्रुवारी पासून परळमध्ये रंगणार आहे. ग्रामीण उद्योजकता, पारंपारिक हस्तकला आणि स्थानिक संस्कृतीचे अनोखे मिश्रण असलेल्या या उत्सवाची मुंबईकर मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. 

५ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान,  वेळ – सकाळी १०.३० ते रात्री ९.३० पर्यंत परळच्या नरे पार्क वर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात ग्रामीण महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन आणि कुस्ती सारख्या लाल मातीतल्या खेळाचा आनंद घेता येईल, अशी माहिती माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना गाला सिन्हा यांनी दिले.  

महिलांना सक्षम करण्यासाठी 

१९९६ मध्ये श्रीमती चेतना गाला सिन्हा यांनी माण देशी फाऊंडेशनची स्थापना केली. सातारा जिल्ह्यातील माण परिसरात माणदेशी महिला सहकारी बँक स्थापून चेतना गाला सिन्हा यांनी परिसरातील महिलांना आर्थिक दृष्ट्‍या सक्षम करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले. यांची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली. जागतिक पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्ल्ड इकनॉमिक फोरम मध्ये चेतना सिन्हा यांनी या ग्रामीण महिलांचे प्रतिनिधीत्व केले. 

Budget 2025 : महिला, तरुण, गरीब, शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद? अर्थसंकल्पात काय असेल खास?

स्वयंरोजगाराचे मिळतात धडे 

माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिलांना स्वयं-रोजगाराचे धडे दिले जातात. उद्योजकता विकास कार्यक्रम कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे माण देशी फाऊंडेशनच्या हजारो महिला उद्योजिका म्हणून कार्यरत आहेत. या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी. तसेच ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडावे, खाद्य संस्कृतीचा आनंद घेता यावा या उद्देशाने माणदेशी महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात झाली.

माणदेशी महोत्सव 2025 ची वैशिष्ट्ये:

रुचकर भोजन दालन: महोत्सवाचे एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणून, रुचकर भोजन दालन असतील, जिथे पाहुणे ग्रामीण महाराष्ट्राच्या पारंपारिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकतात. गावरान मटण आणि भाकरी, थालिपीठ, कोल्हापुरी मिसळ, मासवाडी, आणि सिल्वासा येथील दांगी पदार्थ यांसारख्या पदार्थांची चव घेतली जाऊ शकते.

हस्तकला प्रदर्शन व विक्री :महोत्सवात अप्रतिम ग्रामीण कलेचे प्रदर्शन पाहता येईल. जेन आणि घोंघडी (पारंपारिक दागिने बनवणे), कोल्हापुरी चपला तयार करणे. सर्व वयोगटाच्या व्यक्तींना, विशेषत: मुलांना मातीचे मडके बनविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. 

कला कार्यशाळा: महोत्सवात हस्तकला कार्यशाळा भरवण्यात येईल. जिथे पाहुणे माण देशी महिलांकडून पारंपारिक कलेची प्रशिक्षण घेऊ शकतात. या कार्यशाळांमध्ये वारली पेंटिंग आणि लाइव्ह दागिने बनवण्याच्या सत्रांचा समावेश असेल.

सांस्कृतिक कार्यक्रम: ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी महोत्सवात गज्जी नृत्य आणि कुस्तीचे मुकाबले यांचा समावेश असेल. त्याशिवाय, प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हे आपल्या संगीताने महोत्सवात रंग भरतील.

शेतकऱ्यांच्या उत्पादनांचा बाजार: महोत्सवात माण देशीच्या शेतकऱ्यांकडून थेट विक्रीसाठी ताजे उत्पादन विकले जाईल. तूप, मध, गूळ, डाळिंब, आणि ताजे स्ट्रॉबेरी अशी नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादने पाहुण्यांना खरेदी करता येतील.

ग्रामीण संस्कृतीचा अनुभव: महोत्सवात ग्रामीण जीवनशैलीचा परस्पर अनुभव घेता येईल. यामध्ये नंदी बैल, पिंगला नृत्य, यांचा समावेश असेल, ग्रामीण जीवनशैली आणि परंपरेची उत्कृष्ट छायाचित्रे घेण्यासाठी विशेष सेल्फी पॉइंट्स सज्ज असतील.

महिला उद्योजकांचा सन्मान: माणदेशी महोत्सव २०२५ मध्ये माण देशी फाऊंडेशनच्या उपक्रमांच्या माध्यमातून सक्षम  झालेल्या 10 लाख महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात गौरविण्यात येईल. 

Union Budget 2025-26 काय स्वस्त होणार, काय महागणार; केंद्रीय अर्थसंकल्पातून यंदा देशाला काय मिळणार?

माण देशी महोत्सव २०२५ केवळ एक कार्यक्रम नाही, तर ग्रामीण महिलांचे सामर्थ्य, सर्जनशीलता आणि स्थिरतेचा उत्सव आहे. हा महोत्सव मुंबईकरांना ग्रामीण भारताशी जोडून, त्यांना  संस्कृतीचे धडे देऊन, त्या महिला उद्योजकांचे समर्थन करण्यासाठी एक अद्वितीय संधी प्रदान करतो.

Web Title: Mandeshi mahotsav will be celebrated at parel during 5th to 9th february business for mandeshi women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 04:15 PM

Topics:  

  • Business News
  • women employment

संबंधित बातम्या

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!
1

‘या’ ५ चुका तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करू शकतात, ते कसे टाळायचे जाणून घ्या!

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित
2

सामान्य माणसाला मोठा दिलासा, दैनंदिन वस्तूंवरील कराचा बोजा होणार कमी; अर्थ मंत्रालयाने दोन-स्तरीय GST दर रचना केली प्रस्तावित

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये
3

Swiggy ने वाढवली प्लॅटफॉर्म फी, आता कंपनी प्रत्येक ऑर्डरवर आकारणार ‘इतके’ रुपये

केंद्र सरकारने सागरी विकास निधी ७०,००० कोटींपर्यंत वाढवला, देशाला शिपबिल्डिंग हब बनवण्याची तयारी
4

केंद्र सरकारने सागरी विकास निधी ७०,००० कोटींपर्यंत वाढवला, देशाला शिपबिल्डिंग हब बनवण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.