Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅकडोनल्ड्स मोदींच्या मिलेट्स धोरणानुसार व्यवसाय करणार; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा!

मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशनने भारतातील पश्चिम आणि दक्षिण भागात मिलेट्स अर्थात भरडधान्यांपासून बनलेला बन बर्गर तयार करण्याची योजना बनवली आहे. ज्यामुळे आता मॅकडोनल्ड्स ही कंपनी मोदींच्या मिलेट्स धोरणानुसार व्यवसाय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्याचा भारतीय शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 04, 2024 | 07:32 PM
मॅकडोनल्ड्स मोदींच्या मिलेट्स धोरणानुसार व्यवसाय करणार; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा!

मॅकडोनल्ड्स मोदींच्या मिलेट्स धोरणानुसार व्यवसाय करणार; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा!

Follow Us
Close
Follow Us:

बर्गर म्हटले अनेकांना तात्काळ खाण्याची इच्छा होते. मात्र, आता याच मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन या अमेरिकन फास्ट फूड कंपनीने आपल्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या नवीन धोरणामुळे ग्राहकांसोबत, भारतातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशनने भारतातील पश्चिम आणि दक्षिण भागात मिलेट्स अर्थात भरडधान्यांपासून बनलेला बन बर्गर तयार करण्याची योजना बनवली आहे.

फ्रँचायझीद्वारे उपलब्ध होणार नवीन उत्पादन

मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन ही कंपनी CSIR-CFTRI या आघाडीच्या खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या सहकार्याने आपली ही योजना राबवणार आहे. कंपनी आपले हे नवीन उत्पादन वेस्टलाइफ फूडवर्ल्ड फ्रँचायझीद्वारे उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे कंपनी शेतकऱ्यांकडून हे मिलेट्स थेट खरेदी करणार आहे. ज्यामुळे याचा भारतीय शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

हे देखील वाचा – सर्वसामान्यांना दिलासा मिळणार… पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार, वाचा… नेमकं काय आहे कारण!

400 मॅकडोनल्ड्स आउटलेटवर उपलब्ध असणार

मॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन ही कंपनी देशातील जवळपास ५००० शेतकऱ्यांकडून थेट बाजरीची खरेदी करणार आहे. कंपनीची ही योजना फार्म-टू-फोर्क मॉडेलवर आधारित असणार आहे. या खास बर्गरसाठी ग्राहकांना सामान्य बर्गरपेक्षा 10 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. ही नवीन ऑफर सर्व 400 मॅकडोनल्ड्स आउटलेटवर उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या अन्नाची पौष्टिक गुणवत्ता सुधारणे हा यामागील उद्देश असणार आहे. जेणेकरून ग्राहकांना त्याचा दीर्घकाळ लाभ घेता येणार आहे.’ असे मॅकडोनाल्ड्स इंडियाचे कार्यकारी संचालक अक्षय जाटिया यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा – ‘हा’ भन्नाट व्यवसाय सुरु करा… मिळेल तब्बल 2 लाख रुपये महिना कमाई! सरकारही करतंय आर्थिक मदत!

मोदी सरकार देतंय मिलेट्सला प्रोत्साहन

गेल्या काही काळापासून केंद्रातील मोदी सरकारने देशात मिलेट्सचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. भरडधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह एकत्रितपणे 2023 हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. शेतकऱ्यांकडून भरड धान्य खरेदी करण्यावर या धोरणाचा भर आहे. मिलेट्सच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणे, बाजरीचे पौष्टिक मूल्य आणि आरोग्यविषयक फायद्यांविषयी लोकांना जागरुक करणे यामागील मुख्य उद्देश आहे.

Web Title: Mcdonald will do business under naredra modi millets policy indian farmers will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • McDonald
  • Naredra Modi

संबंधित बातम्या

Women’s Chess World Champion : ‘अनेक तरुणींना प्रेरणा..’, बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्याचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
1

Women’s Chess World Champion : ‘अनेक तरुणींना प्रेरणा..’, बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या दिव्याचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

मॅकडोनाल्‍ड्स इंडियाकडून सीएसआयआर-सीएफटीआरआयच्या सहयोगाने अद्वितीय ‘प्रोटीन प्‍लस स्‍लाइस’ लाँच
2

मॅकडोनाल्‍ड्स इंडियाकडून सीएसआयआर-सीएफटीआरआयच्या सहयोगाने अद्वितीय ‘प्रोटीन प्‍लस स्‍लाइस’ लाँच

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या आहारात नियमित करतात ‘या’ हिरव्या भाजीचे सेवन, वयाच्या ७४ व्या वर्षी आहेत कायम फिट
3

पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या आहारात नियमित करतात ‘या’ हिरव्या भाजीचे सेवन, वयाच्या ७४ व्या वर्षी आहेत कायम फिट

Cooking gas price hiked by ₹50 per cylinder गॅस दरवाढीने खवळलाय घराघरातला स्वयंपाक! Modi Government
4

Cooking gas price hiked by ₹50 per cylinder गॅस दरवाढीने खवळलाय घराघरातला स्वयंपाक! Modi Government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.