मॅकडोनाल्ड्स इंडियाकडून सीएसआयआर-सीएफटीआरआयच्या सहयोगाने अद्वितीय 'प्रोटीन प्लस स्लाइस' लाँच (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
वेस्टलाइफ फूडवर्ल्डद्वारे संचालित मॅकडोनाल्ड्स इंडिया (वेस्ट अँड साऊथ)ने स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्याच्या आपल्या प्रवासामध्ये आणखी एक धाडसी पाऊल उचलले आहे, जेथे ग्राहक त्यांच्या प्रथिन सेवनाला वैयक्तिकृत करू शकतात. ब्रँडने आज त्यांच्या नाविन्यपूर्ण ‘प्रोटीन प्लस रेंज’च्या लाँचची घोषणा केली, ज्यामध्ये अद्वितीय १०० टक्के शाकाहारी, वनस्पती-आधारित ‘प्रोटीन स्लाइस’चा समावेश आहे, जे कोणत्याही बर्गरमध्ये ५ ग्रॅम प्रथिनांची भर करते.
क्यूएसआर उद्योगामध्ये पहिल्यांदाच मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट्समध्ये व्यक्तींच्या आस्वाद घेण्याच्या पद्धतींत क्रांती घडवून आणत आहे, जेथे ग्राहक त्यांच्या आवडत्या वर्गर्समध्ये एक, दोन किंवा तीन प्रोटीन प्लस स्लाइस भर करू शकतात. हे स्लाइस ग्राहकांना त्यांच्या आवडत्या चवीबाबत तडजोड न करता पौष्टिकता देते.
लोटस डेव्हलपर्सचा IPO ३० जुलै रोजी उघडणार; किंमत पट्टा १४०-१५० रुपये निश्चित, जाणून घ्या
हे स्लाइस मॅकडोनाल्ड्सच्या विद्यमान वर्गर्समध्ये विनासायासपणे एकीकृत होतात, ज्यामुळे ग्राहकांना अधिक प्रमाणात प्रथिने मिळतात. उदाहरणार्थ, प्रोटीन स्लाइसची भर करण्यासह मॅकस्पाइसी पनीर २५.२९ ग्रॅम प्रथिने देते, मॅकचिकन २०.६६ ग्रॅम प्रथिने देते, मॅकवेजी १५.२४ ग्रॅम प्रथिने देते आणि संतुलित आहार मानले जाणारे आयकॉनिक मॅकआलू टिक्की १३.५ ग्रॅम प्रथिने देते. यासह क्यूएसआर उद्योगामधील शक्यतांना प्रत्यक्षात आणण्यात आले आहे.
प्रोटीन प्लस स्लाइस भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रतिष्ठित सीएसआयआर-सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएफटीआरआय) सोबत सहयोगाने विकसित करण्यात आला आहे. सोया आणि वाटाणा यांसह १०० टक्के शाकाहारी घटकांपासून बनवलेल्या प्रोटीन प्लस स्लाइसमध्ये कोणतेही कृत्रिम रंग किंवा चव नाही आणि त्यामध्ये कांदा व लसणाचा वापर करण्यात आलेला नाही, ज्यामुळे ते विविध प्रकारच्या आहाराच्या पसंतींसाठी योग्य आहे.
वेस्टलाइफ फूडवर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय जाटिया म्हणाले, ”मॅकडोनाल्ड्स इंडियामध्ये, आम्ही नेहमीच ग्राहकांना अधिक पर्याय देण्यावर विश्वास ठेवला आहे आणि यावेळी, आम्ही त्यांना त्यांच्या प्रथिनांच्या सेवनाचे वैयक्तिकरण करण्याची क्षमता देत आहोत. प्रोटीन प्लस रेंज त्यांना त्यांच्या प्रथिनांच्या गरजांशी किंवा चवीशी तडजोड न करता त्यांच्या आवडत्या मॅकडोनाल्ड्स बर्गरचा आस्वाद घेण्याचा आनंद देते. यामधून आमच्या ‘रिअल फूड, रिअल गूड’ तत्त्वाप्रती आमची सातत्यपूर्ण कटिबद्धता दिसून येते, जे चव, पोषण आणि अन्न विज्ञान एकत्र आणते. हे दूरगामी उत्पादन प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्यासोबत सहयोग केल्याबद्दल आम्ही सीएसआयआर-सीएफटीआरआयचे आभारी आहोत. सहयोगाने, आम्ही स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या घटकांचे संयोजन करून पौष्टिक आणि स्वादिष्ट मेनू तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्यामधून उत्तम चव आणि पोषणाची खात्री मिळते.”
सीएसआयआर-सीएफटीआरआयची वैज्ञानिक कौशल्ये आणि प्रथिन संशोधनाची सखोल समज यामुळे हे स्लाइस डिझाइन करण्यास मदत झाली, जे मॅकडोनाल्ड्स ज्या खास चव, पोत आणि गुणवत्तेसाठी ओळखले जाते ते राखून अधिक पौष्टिकता देते. गेल्या वर्षी मल्टी-मिलेट बनच्या यशस्वी लाँचनंतर मॅकडोनाल्ड्सची सीएसआयआर-सीएफटीआरआयसोबतची ही दुसरी धोरणात्मक भागीदारी आहे.
सीएसआयआर-सीएफटीआरआयच्या संचालिका डॉ. श्रीदेवी अन्नपूर्णा सिंग म्हणाल्या, ”आमच्या मल्टी-मिलेट बनला मिळालेल्या यशानंतर आम्ही क्यूएसआर क्षेत्रात पौष्टिक नाविन्यतेला पुढे नेण्यासाठी मॅकडोनाल्ड्स इंडियासोबतचा आमचा सहयोग सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत. प्रोटीन प्लस स्लाइस हे विज्ञान-आधारित फॉर्म्युलेशन व समान दृष्टिकोनामधून डिझाइन करण्यात आले आहे, जे दैनंदिन आहारामध्ये अधिक पोषणाची भर करते. या सहयोगामधून निदर्शनास येते की, उद्योग आणि वैज्ञानिक संस्था एकत्र येऊन मुख्य आहारामध्ये अधिक पौष्टिकतेची भर करू शकतात.”
प्रोटीन प्लस मील्स शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असतील. शाकाहारी प्रोटीन प्लस मीलमध्ये प्रोटीन स्लाइस असलेला बर्गर, प्रोटीनयुक्त कॉर्न कप आणि कोक झिरोचा समावेश आहे. मांसाहारी पर्यायात प्रोटीन स्लाइससह मॅकक्रिस्पी चिकन, ४-पीस चिकन मॅकनगेट्स आणि कोक झिरो यांचा समावेश आहे, ज्यामधून पौष्टिक, प्रोटीनयुक्त मीलचा आस्वाद मिळतो.
सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या ‘रिअल फूड, रिअल गुड’ या प्रवासात हे लाँच महत्त्वाचा टप्पा आहे. या तत्त्वाशी बांधील राहत ब्रँड गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करतो, तसेच मेनू कृत्रिम रंग, कृत्रिम चव व कृत्रिम संरक्षकांपासून मुक्त आहेत आणि चिकनच्या ऑफरिंगमध्ये कोणतेही एमएसजी समाविष्ट नाही याची खात्री घेतो. मॅकडोनाल्ड्स इंडिया आधारित जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून ताज्या, स्थानिक पातळीवर मिळवलेल्या घटकांचा वापर करत आहे, ज्यासह जवळपास तीन दशकांपासून ग्राहकांच्या असलेल्या विश्वासाला अधिक दृढ करत आहे.
या नाविन्यतेमधून ब्रँडला भारतीय ग्राहकांमध्ये प्रथिनांबद्दल वाढती जागरूकता आणि मागणी याबद्दलची सखोल माहिती असल्याचे दिसून येते. नवीन प्रोटीन प्लस रेंज आता पश्चिम आणि दक्षिण भारतातील मॅकडोनाल्ड्स रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध आहे. डायनिंग इन करायचे असो, ड्राइव्ह-थ्रूच्या माध्यमातून पिक अप करायचे असो किंवा मॅकडिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून घरामधून ऑर्डर करायची असो ग्राहक आता त्यांच्या आवडत्या बर्गरचा आस्वाद घेऊ शकतात, ज्यामध्ये प्रथिनांची अतिरिक्त पौष्टिकता समाविष्ट आहे.