Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DA Hike: आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3% वाढ, सणापूर्वी सरकारची कमालीची भेट

मार्चमध्ये गुढीपाडवा, होळी आणि ईद हे सण येतात. याआधी महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे आणि कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 25, 2026 | 08:44 PM
महागाई भत्त्यात वाढ (फोटो सौजन्य - iStock)

महागाई भत्त्यात वाढ (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ 
  • सणापूर्वी सरकारने दिली भेट 
  • महाराष्ट्र सरकारचा निर्णय 
मार्च महिन्यात महाराष्ट्रात होळी, गुढीपाडवा आणि ईद हे तिन्ही सण साजरे होणार आहेत आणि आता गुढी पाडवा आणि होळीच्या सणाआधीच महाराष्ट्राने राज्य कर्मचारी आणि इतर पात्र कामगारांच्या महागाई भत्त्यात (DA) ३% वाढ जाहीर केली आहे. महागाई भत्ता जुलै २०२५ पासून दिला जाईल असे सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्राचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ही घोषणा केली. गुढी पाडवा १९ मार्च रोजी यावर्षी येत आहे आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठी जनतेसाठी हा खूपच मोठा सोहळा असतो. हिंदूंचे हे नवीन वर्ष आहे तर ४ मार्च रोजी देशभरात होळी साजरी केली जाईल. मार्चमध्ये ईदचा सण देखील साजरा केला जातो. या सर्व सणांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा मोठी मानली जात आहे. 

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात ३ टक्के, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?

‘या’ महिन्यापासून रोखीने पैसे दिले जाणार

बुधवारी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घोषणा केली की फेब्रुवारीपासून रोखीने पैसे दिले जातील. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीची थकबाकी मार्च २०२६ मध्ये गुढी पाडव्याला दिली जाईल, तर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीची थकबाकी स्वतंत्रपणे दिली जाईल. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५.१६ लाख कर्मचारी आणि ८.७२ लाख पेन्शनधारकांना होईल असेही सांगण्यात आले आहे. 

गेल्या वर्षी १२% वाढ 

दरम्यान गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे प्रभारी होते. महागाई भत्त्यात १२% वाढ करण्यात आली होती. त्या तुलनेने यावर्षी करण्यात आलेली वाढ ही खूपच कमी आहे. मात्र तरीही राज्य कर्मचाऱ्यांंना याचा नक्कीच फायदा होणार आहे. 

या वर्षी सरासरी पगारवाढ अपेक्षित: सर्वेक्षण

देशातील विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या वर्षी सरासरी ९.१% पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे, जी गेल्या वर्षीच्या ८.९% वाढीपेक्षा थोडी जास्त आहे. मंगळवारी एका सर्वेक्षण अहवालात हा अंदाज मांडण्यात आला आहे. “वार्षिक वेतन वाढ आणि व्यवसाय सर्वेक्षण २०२५-२६” असा हवाला देत, जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी एओएनने म्हटले आहे की या वर्षी ९.१% ची अंदाजित पगार वाढ २०२५ मध्ये नोंदवलेल्या ८.९% च्या वास्तविक वाढीपेक्षा थोडी जास्त आहे. एओएनच्या सर्वेक्षणाची ३२ वी आवृत्ती देशभरातील ४५ उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या १,४०० हून अधिक संस्थांमधील डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे. 

DA Hike: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी भेट! राज्य सरकारने DA-DR मध्ये वाढ

Web Title: Maharashtra government gift for employees before gudi padwa da hike by 3 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • Business News
  • Government
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Bank Fraud: खरंच, आपला पैसा सुरक्षित आहे? 5 वर्षांत 1.42 लाख कोटी बुडाले, संसदेत बँक फ्रॉडचे भीतीदायक वास्तव उघड!
1

Bank Fraud: खरंच, आपला पैसा सुरक्षित आहे? 5 वर्षांत 1.42 लाख कोटी बुडाले, संसदेत बँक फ्रॉडचे भीतीदायक वास्तव उघड!

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?
2

पुन्हा पसरली झोळी! पाकिस्तानने अमेरिकेकडे केली 96000 कोटी रुपयांची मोठी मागणी; काय आहे आता नवा प्लॅन?

भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी! EbixCash World Money ला RBI चा कायमस्वरूपी परवाना; MSME आणि नागरिकांना मोठा दिलासा
3

भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी! EbixCash World Money ला RBI चा कायमस्वरूपी परवाना; MSME आणि नागरिकांना मोठा दिलासा

वाढतं वय कळूनच येणार नाही, कोरियन ग्लास स्किनचे रहस्य भारतात! ईशा अंबानींचा नवा ब्यूटी स्ट्रोक; कुठे आणि कसा खरेदी कराल?
4

वाढतं वय कळूनच येणार नाही, कोरियन ग्लास स्किनचे रहस्य भारतात! ईशा अंबानींचा नवा ब्यूटी स्ट्रोक; कुठे आणि कसा खरेदी कराल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.