Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेडट्रॉनिक आणि फिलिप्समध्ये सामंजस्य करार; मिळणार आरोग्य प्रशिक्षण

मेडट्रॉनिक आणि फिलिप्स यांनी प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ESRD आणि हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी निदान व उपचार अधिक अचूक करण्यासाठी भागीदारी केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 28, 2025 | 04:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेडट्रॉनिक आणि आरोग्य तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी फिलिप्स यांनी कार्डिओलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट्ससाठी प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देण्यासाठी भारतामध्ये सामंजस्य करार (MOU) केला आहे. या भागीदारीअंतर्गत ३०० हून अधिक क्लिनिशियनना स्ट्रक्चरल हृदयविकारांसाठी एकोकार्डिओग्राफी (ECHO) आणि मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) यांसारख्या मल्टि-मोडॅलिटी इमेजिंग तंत्रज्ञानावर कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सखोल सत्रे आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. १५ प्रमुख वैद्यकीय संस्थांची निवड करून तेथे ही शैक्षणिक कार्यशाळा राबवली जाणार आहे. यामुळे टीएव्हीआर (Transcatheter Aortic Valve Implantation – TAVI) प्रक्रियेची अचूकता वाढवण्यास मदत होणार आहे.

तेजी-मंदीचा खेळ.., PI Network कॉईन 11 टक्क्यांनी घसरला

मेडट्रॉनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनदीप सिंग कुमार म्हणाले, “ही भागीदारी रुग्णांना विशेषतः क्रॉनिक किडनी डिजिज (CKD) आणि अंतिम टप्प्यावरील मूत्रपिंडाच्या आजारांवर (ESRD) अधिक प्रभावी उपचार देण्याच्या आमच्या बांधिलकीचा एक भाग आहे. प्रशिक्षित डॉक्टर आणि प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान यांचा मेळ घालून उपचारांचे निकाल सुधारण्याचे आमचे लक्ष्य आहे.” फिलिप्सचे भारतीय उपखंड प्रमुख भारत शाह यांनी सांगितले, “स्ट्रक्चरल हार्ट इमेजिंगमध्ये शिक्षण आणि नवसंकल्पनांना चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे क्लिनिशियन्सना प्रगत निदानात्मक तंत्रज्ञानाने सक्षम करणे गरजेचे आहे.”

भारतात दरवर्षी सुमारे २.२ लाख नवीन अंतिम टप्प्यावरील मूत्रपिंडाच्या आजाराचे (ESRD) रुग्ण आढळतात, आणि त्यापैकी मोठ्या संख्येतील रुग्णांना आर्टिक स्टेनोसिस होण्याचा धोका असतो. ही स्थिती हृदयाच्या झडपांमध्ये अरुंदपणा निर्माण करते, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करताना अधिक मेहनत घ्यावी लागते. अशा रुग्णांसाठी Transcatheter Aortic Valve Implantation (TAVI) ही अत्याधुनिक प्रक्रिया अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तथापि, TAVI प्रक्रियेदरम्यान अचूक निदान व सर्जरीची यशस्वीता वाढवण्यासाठी प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असते. मेडट्रॉनिकने २००४ मध्ये पहिली TAVI प्रक्रिया केली होती आणि गेल्या दोन दशकांत या तंत्रज्ञानात महत्‍त्‍वपूर्ण सुधारणा आणि नवसंकल्पना झाल्या आहेत.

फिलिप्सचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानावर आधारित सॉफ्टवेअर हे 3D ट्रान्सइसोफेगल एकोकार्डिओग्राफी आणि MRI डेटाचा उपयोग करून हृदयाच्या महाधमनीचे अचूक विश्लेषण करण्यास सक्षम आहे. पारंपरिक निदान पद्धतींमध्ये कॉन्ट्रास्ट एजंट्स वापरले जातात, जे मूत्रपिंडांसाठी विषारी (नेफ्रोटॉक्सिक) ठरू शकतात आणि ESRD रुग्णांच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करू शकतात. मात्र, या नव्या AI-आधारित तंत्रज्ञानामुळे अशा विषारी रंगद्रव्यांचा वापर न करता निदान करता येते, त्यामुळे मूत्रपिंडाच्या आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. याचा थेट फायदा ESRD रुग्णांच्या आयुष्याचा दर्जा आणि आयुर्मान सुधारण्यात होतो.

16 रुपयांच्या शेअरने दिला जबरदस्त परतावा, गुंतवणूकदार मालामाल, १३ वर्षांत एका लाखाचे झाले १.७८ कोटी

ही भागीदारी भारतातील आरोग्यसेवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक नवे युग उघडणार असून, हृदयविकारग्रस्त आणि मूत्रपिंडाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक आणि सुरक्षित उपाययोजना उपलब्ध करून देणार आहे. मल्टि-मोडॅलिटी इमेजिंग तंत्रज्ञान, क्लिनिशियन्ससाठी विशेष प्रशिक्षण, आणि AI-आधारित निदान प्रणाली यांचा मेळ घालून, ही भागीदारी भारतातील रुग्णसेवेत लक्षणीय सुधारणा घडवून आणणार आहे.

Web Title: Medtronic and philips sign mou

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?
1

High Court on Aashirvaad Atta : तुम्हीही ‘आशीर्वाद’ आटा वापरता? दिल्ली हायकोर्टाकडून मोठी बातमी; दिला मोठा निर्णय?

PepsiCo Pune Plant : पेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटचे रौप्य महोत्सवी वर्ष! 25 वर्षांचा यशस्वी प्रवास, शेकडो शेतकऱ्यांना बळ!
2

PepsiCo Pune Plant : पेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटचे रौप्य महोत्सवी वर्ष! 25 वर्षांचा यशस्वी प्रवास, शेकडो शेतकऱ्यांना बळ!

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक;  FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?
3

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक; FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?
4

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.