Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon India Investment: अॅमेझॉन भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रात ७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

Amazon India Investment: अॅमेझॉनने 2030 पर्यंत भारतातील अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये अतिरिक्त 7 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीच्या 4 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह कंपनीची एकूण नियोजित गुंतवणूक 11 अब्ज डॉलर्स होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 17, 2026 | 05:52 PM
Amazon India Investment: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Amazon India Investment: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अॅमेझॉन भारतात 7 अब्ज डॉलरची अतिरिक्त गुंतवणूक करणार.
  • कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 4 नवीन ऊर्जा प्रकल्प उभारणार.
  • 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीला बळ मिळणार.

अॅमेझॉनने आज घोषणा केली आहे की कंपनी २०३० पर्यंत भारतातील अक्षय ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्पांमध्ये ७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यापूर्वी करारबद्ध केलेल्या ४ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त ही नवीन गुंतवणूक असून, यामुळे भारताच्या शाश्वत आणि लवचिक ऊर्जा भविष्याला मोठे पाठबळ मिळणार आहे. यासोबतच कंपनीने कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये एकूण ९३४ मेगावॅट क्षमतेच्या चार नवीन पवन आणि सौरऊर्जा प्रकल्पांची घोषणा केली आहे. Amazon India Investment:

मध्य प्रदेशातील ३०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प

या नवीन प्रकल्पांमध्ये कर्नाटकातील २३४ मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प (जो अॅमेझॉनचा आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे) आणि २०० मेगावॅटचा सौर-पवन एकत्रित प्रकल्प, मध्य प्रदेशातील ३०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प व राजस्थानातील २०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. विद्यमान ४ अब्ज डॉलर्सच्या करारांतर्गत असलेले हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्यांची एकत्रित क्षमता २ गिगावॅटपेक्षा अधिक होईल, जी भारतातील ३५ लाखांहून अधिक कुटुंबांच्या वार्षिक विजेच्या गरजेइतकी वीज निर्माण करण्यास सक्षम असेल. सध्या भारतात कंपनीचे एकूण ५७ अक्षय ऊर्जा प्रकल्प आहेत.

Wholesale Inflation October 2026: महागाईचा भडका कायम!; ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई दर १२.२९ टक्क्यांवर

अॅमेझॉनच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे स्वागत

या गुंतवणुकीचे स्वागत करताना केंद्रीय नवीन व अक्षय ऊर्जा मंत्री श्री. प्रल्हाद जोशी म्हणाले, “भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील अॅमेझॉनच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो. अशा गुंतवणुका भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यात, ऊर्जा सुरक्षा प्रबळ करण्यात आणि शाश्वत आर्थिक विकासाला पाठबळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यातून भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रावरील जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास दिसून येतो.”

अॅमेझॉनच्या चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर कारा हर्स्ट म्हणाल्या, “७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची ही अतिरिक्त गुंतवणूक भारताप्रती आमची दीर्घकालीन कटिबद्धता अधोरेखित करते. मोठ्या प्रमाणावर अक्षय ऊर्जेची उपलब्धता वाढवून भारताची वाढती विजेची मागणी पूर्ण करणे, ऊर्जा सुरक्षा दृढ करणे आणि २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात योगदान देणे हे आमचे ध्येय आहे.”

अॅमेझॉनचे उद्दिष्ट अधिक बळकट होणार

या गुंतवणुकीमुळे २०३० पर्यंत आपल्या कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेची कार्बन तीव्रता (२०१९ च्या तुलनेत) ६५ टक्क्यांनी कमी करण्याचे आणि ‘द क्लायमेट प्लेज’ अंतर्गत २०४० पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन साध्य करण्याचे अॅमेझॉनचे उद्दिष्ट अधिक बळकट होणार आहे.

Diesel Tax Hike: डिझेलवरील करात वाढ; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार की आणखी काही बदलणार?

ऊर्जा क्षेत्रासोबतच अॅमेझॉनने ५०० हून अधिक शहरांमध्ये १५,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने तैनात केली असून ३,००० इलेक्ट्रिक ट्रकसाठी टाटा मोटर्ससोबत भागीदारी केली आहे. कंपनीने २०२७ च्या लक्ष्यापूर्वीच २०२५ मध्ये भारतात ‘वॉटर-पॉझिटिव्ह’ दर्जा प्राप्त केला असून जल पुनर्भरण प्रकल्पांमध्ये ६२ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. तसेच, ५० टक्क्यांहून अधिक ऑर्डर्स कमी किंवा मूळ पॅकेजिंगमध्ये पाठवल्या जातात आणि कृषी अवशेषांपासून पर्यायी पॅकेजिंग विकसित करण्यासाठी कंपनी आयआयटी रुरकीसोबत कार्यरत आहे.

Web Title: Amazon 7 billion dollar renewable energy investment india 2030 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • amazon
  • Business News
  • renewable energy
  • solar power

संबंधित बातम्या

Wholesale Inflation October 2026: महागाईचा भडका कायम!; ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई दर १२.२९ टक्क्यांवर
1

Wholesale Inflation October 2026: महागाईचा भडका कायम!; ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई दर १२.२९ टक्क्यांवर

जेवणानंतर वाढणाऱ्या ग्लुकोजची चिंता मिटणार? ModiCare ने लॉन्च केले ‘ShiftLife Anti-Spike Daily’, ब्रिटिश पोषण विज्ञान आता भारतात
2

जेवणानंतर वाढणाऱ्या ग्लुकोजची चिंता मिटणार? ModiCare ने लॉन्च केले ‘ShiftLife Anti-Spike Daily’, ब्रिटिश पोषण विज्ञान आता भारतात

E-Waste Recycling India: कॉर्पोरेट कंपन्यांच्या जुन्या लॅपटॉपमध्ये दडलीय सोन्याची खाण! ई-कचऱ्यातून मिळू शकतात महत्त्वपूर्ण खनिजे
3

E-Waste Recycling India: कॉर्पोरेट कंपन्यांच्या जुन्या लॅपटॉपमध्ये दडलीय सोन्याची खाण! ई-कचऱ्यातून मिळू शकतात महत्त्वपूर्ण खनिजे

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?
4

Post Office Savings Account Rules: पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी! एकापेक्षा जास्त खाती उघडण्याबाबत काय सांगतात नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.