
Wholesale Inflation October 2026, WPI Inflation India 12.29 Percent,
ऑक्टोबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई वाढून ८.२६ टक्क्यांवर पोहोचली. सप्टेंबरमध्ये ती ८.१४ टक्के होती. बिगर-खाद्य वस्तूंची महागाई ११.६९ टक्के नोंदविण्यात आली, तर सप्टेंबरमध्ये ती १०.२८ टक्के होती, खनिजांच्या किमती वाढण्याचा दरही सप्टेंबरमधील ९.५१ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये १२.६४ टक्क्यांवर गेला, परिणामी, प्राथमिक वस्तूंच्या श्रेणीतील पाऊक महागाई ८.६७ टक्क्यांवरून १.२४ टक्क्यांवर पोहोचली.
१२ टक्क्यांच्या पार घाऊक महागाईचा दर
६.०९ ट्रक्क्यांवर किरकोळ महागाई
३६ महिन्यांनी गाढ़ला उचांक
८.२६टक्क्यांनी महागल्या खाद्यपदार्थाच्या किंमती
इंधन आणि विजेच्या महागाईत मोठी वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर ३२.८४ टक्क्यांवर गेला, तर सप्टेंचरमध्ये तो २५.८५ टक्के होता. दुसरीकडे, उत्पादित वस्तूंची महागाई सप्टेंबरमधील ९.७६ टक्क्यांवरून किचित घसरून ९.५४ टक्क्यावर आली.
ऑगस्टपासून घाऊक महागाईचा दर वेगाने वाढत असून तो सलग दुहेरी आकडचात कायम आहे. मात्र, घाऊक किमतीचा किरकोळ बाजारातील किमतीवर होणारा परिणाम मर्यादित असल्याचे बार्कलेजने म्हटले आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार, ऑक्टोबरमधील घाऊक महागाई वाढण्यामागे यानिज तेल, पेट्रोलियम उत्पादने, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, वीज, खाद्यपदार्थ आणि मूलभूत धातूच्या किमतीतील वाढ ही प्रमुख कारणे आहेत. याशिवाय रसायने, रासायनिक उत्पादने, खाद्यपदार्थाचे उत्पादन, कापड उद्योग तसेच रबर आणि प्लास्टिक उत्पादनांच्या किमतीनीही महागाईत भर घातली.
इंडिया रेटिंग्ज अॅड रिसर्वचे मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्र पंत यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई नव्या मालिकेतील उच्चाकी स्तरावर पोहोचली, यामागे आधारभूत परिणामासोचतच प्राथमिक वस्तू आणि इंधन व वीज क्षेत्रातील व्यापक दरवाढ कारणीभूत आहे. पश्चिम आशियातील दीर्घकाळ सुरू असलेल्या संकटामुळे इंधन आणि विजेची महागाई वाढत असून, या संकटावर तोडगा निघेपर्यंत महागाईचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.
Ans: इंधन, वीज आणि बिगर-खाद्य वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे ऑक्टोबर २०२६ मध्ये भारताचा घाऊक महागाई दर (WPI) १२.२९ टक्क्यांवर पोहोचला असून, हा ३६ महिन्यांतील उच्चांक आहे.
Ans: ऑक्टोबरमध्ये इंधन आणि विजेच्या महागाईचा दर ३२.८४ टक्क्यांवर पोहोचला, तसेच बिगर-खाद्य वस्तू (११.६९%) आणि खनिजांच्या (१२.६४%) किमतीत मोठी वाढ झाल्याने एकूण घाऊक महागाई वाढली आहे.
Ans: जागतिक स्तरावर ऊर्जा किमतींमध्ये नरमाई येत असल्याने नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.