Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझे नाव घेऊ नका…”, हिंडनबर्ग रिसर्चच्या पोस्टनंतर समाजमाध्यमांवर मजेदार मीम्स व्हायरल!

अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने आज (ता.10) सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यात हिंडनबर्गने म्हटले आहे की, ‘भारतात लवकरच काही तरी मोठे घडणार आहे’. त्यानंतर आता याबाबत समाजमाध्यमांवर मीम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे. अनेक युजर्स याबाबत मजेदार मीम्स पोस्ट करत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 10, 2024 | 04:47 PM
"माझे नाव घेऊ नका...", हिंडनबर्ग रिसर्चच्या पोस्टनंतर समाजमाध्यमांवर मजेदार मीम्स व्हायरल!

"माझे नाव घेऊ नका...", हिंडनबर्ग रिसर्चच्या पोस्टनंतर समाजमाध्यमांवर मजेदार मीम्स व्हायरल!

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने आज (ता.10) सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यात हिंडनबर्गने म्हटले आहे की, ‘भारतात लवकरच काही तरी मोठे घडणार आहे’. मात्र, हिंडनबर्ग रिसर्चकडून नेमका कोणता खुलासा केला जाणार आहे, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, अशातच आता समाजमाध्यमांवर लोक सध्या एकमेकांना विचारत आहे की, आता नेमका कोणाचा नंबर लागणार आहे? इतकेच नाही तर हिंडनबर्ग रिसर्चच्या ‘एक्स’ पोस्टनंतर वेगवेगळे मीम्‍स देखील व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

समाजमाध्यमांवर मीम्स व्हायरल

परिणामी, सध्या समाजमाध्यमांवर #Hendenburg टॅग टॉप ट्रेंडिंगवर आला आहे. एका युजर्सने सोशल मीडियावर लिहिले आहे की, “भारतातील अब्जाधीश तयार राहा, जे काही पुढे होणार असेल त्यासाठी” तर अन्य एका युजरने पंचायत 3 चा मीम्‍स शेअर करत म्हटले आहे की, भारतीय अब्जाधीश सध्या विचार करत असतील की, “माझे नाव नका घेऊ’.

 

Who do you think is next 🤔In India#Hindenburg pic.twitter.com/IcwLwzQdar — Ruksar Khan (@Ruksar_Khan7) August 10, 2024
Indian Billionaires get ready. Who will be the Next Opponent. #Hindenburg pic.twitter.com/xgRTmNPsvV — Rajeshwari Iyer (@RajeshwariRW) August 10, 2024

#Hendenburg हॅशटॅग टॉप ट्रेंडिंगवर

तर एका शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका युजरने म्हटले आहे की, आधीच शेअर बाजार लाल निशाणीवर व्यवहार करत आहे. आता तुम्हाला काय हवंय भाऊ. तर शेअर बाजारातील अन्य एका युजरने म्हटले आहे की, “भाऊ माझे पैसे अर्धे करू नका”. दरम्यान, या मीम्समुळे समाजमाध्यमांवर #Hendenburg हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिंगवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

#Hindenburg: Something big soon India Indian stock market to Hindenburg: pic.twitter.com/ysra7jG91B — Sir-kid (@ooobhaishab) August 10, 2024
मेरे पैसे आधे मत कर देना 😭#Hindenburg pic.twitter.com/t2a56BHyEx — Raja Babu (@GaurangBhardwa1) August 10, 2024

हेही वाचा : भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार? हिंडेनबर्ग रिसर्चची एक पोस्ट, अन् चर्चांना उधाण!

काय आहे संपूर्ण प्रकरण?

24 जानेवारी 2023 रोजी अर्थात मागील वर्षी उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील कंपन्यांविषयी अमेरिकी शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने १०६ पानी अहवाल सादर करत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये प्रामुख्याने कंपनीने क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले असून, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने शेअर्सचे मूल्य फुगवून दाखवले, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता. याशिवाय अन्य आरोप देखील करण्यात आले होते.

ज्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांची भांडवली बाजारात पडझड सुरू झाली होती. एकंदर १२५ अब्ज डॉलरच्या आसपास बाजारमूल्याचा फटका समूहाला बसला होता. त्यानंतर आता ‘भारतात लवकरच काही तरी मोठे घडणार आहे’ असे ‘एक्स’प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हिंडनबर्ग रिसर्चने म्हटले आहे. ज्यामुळे सध्या आता नेमका कोणाचा नंबर लागणार आहे? अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली आहे.

Web Title: Memes are going viral on social media after the post of hindenburg research

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 04:43 PM

Topics:  

  • memes

संबंधित बातम्या

ट्रॉफी चोर! आशिया कप पळवून नेताच युजर्सने उडवली मोहसीन नक्वीची खिल्ली; सोशल मीडियावर मजेदार Memes Viral
1

ट्रॉफी चोर! आशिया कप पळवून नेताच युजर्सने उडवली मोहसीन नक्वीची खिल्ली; सोशल मीडियावर मजेदार Memes Viral

पांचट Jokes : अप्सरेने रावणाला घातली लग्नाची मागणी, ‘हो’ बोलणार तितक्यताच 10 शिरांनी घातला घोळ; वाचाल तर हसतच सुटाल
2

पांचट Jokes : अप्सरेने रावणाला घातली लग्नाची मागणी, ‘हो’ बोलणार तितक्यताच 10 शिरांनी घातला घोळ; वाचाल तर हसतच सुटाल

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस
3

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट
4

GST Memes : दैनंदिन वस्तूंचा दर कमी झाला तर पानमसाल्याचा दर वाढला… इंटरनेटवर मिम्सचा महापूर; युजर्स हास्याने झाले लोटपोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.