
मिरे अॅसेटचे २ नवीन हेल्थकेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर ETF लाँच (Photo Credit- X)
मिरे अॅसेट निफ्टी ५०० हेल्थकेअर ईटीएफ योजना फार्मा, हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक्स, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा तंत्रज्ञानामधील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते. मिरे अॅसेट निफ्टी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर अँड लॉजिस्टिक्स ईटीएफ योजना भारतात पायाभूत सुविधा क्षमता विकसित करण्यामध्ये सामील असलेल्या विविध क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देते.
या ईटीएफ योजनांसाठी न्यू फंड ऑफर्स (एनएफओ) गुंतवणूकीकरिता २७ जानेवारी २०२६ रोजी खुल्या होतील. मिरे अॅसेट निफ्टी ५०० हेल्थकेअर ईटीएफसाठी एनएफओ ६ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल, तर मिरे अॅसेट निफ्टी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर अँड लॉजिस्टिक्स ईटीएफसाठी एनएफओ ९ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल. दोन्ही योजना अनुक्रमे ११ फेब्रुवारी २०२६ आणि १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा खुल्या होतील.
”भारतातील आरोग्यसेवा बाजारपेठेला कमी सेवा उपलब्धता, निर्यात क्षमता, विकसित होत असलेली देशांतर्गत बाजारपेठ आणि सरकारकडून धोरण पाठिंबा अशा विविध दीर्घकालीन घटकांमुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मिरे अॅसेट निफ्टी५०० हेल्थकेअर ईटीएफच्या माध्यमातून विविध गुंतवणूक दृष्टिकोन आरोग्यसेवा यंत्रणेसह फार्मास्युटिकल्स, हॉस्पिटल्स आणि आरोग्यसेवा प्रदातांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रबळ, पारदर्शक आणि किफायतशीर मार्ग देतो,” असे मिरे अॅसेट इन्वेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया)च्या ईटीएफ प्रॉडक्ट्सचे प्रमुख व फंड मॅनेजर सिद्धार्थ श्रीवास्तव म्हणाले. ”दुसरीकडे, मिरे अॅसेट निफ्टी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर अँड लॉजिस्टिक्स ईटीएफ योजना पायाभूत सुविधा व लॉजिस्टिक्समध्ये गुंतवणूक करण्याची वैविध्यपूर्ण संधी देते, जेथे सरकार या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करत आहे आणि प्रबळ सरंचनात्मक स्थितींमधून फायदा होत आहे. ऊर्जा, भांडवली वस्तू, दूरसंचार, बांधकाम, परिवहन व लॉजिस्टिक्स सेवा आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये या थीम्सची व्याप्ती पाहता वैविध्यपूर्ण फंड संरचना गुंतवणूकदारांना भारतातील दीर्घकालीन पायाभूत सुविधा विकासगाथेशी संलग्न राहण्यास मदत करते.”
नागपूरची गृहिणी बनली अॅक्टिव्ह क्रिप्टो ट्रेडर… भारतातील बदलत्या आर्थिक विचारसरणीचे प्रतिबिंब
एनएफओ कालावधीत दोन्ही फंड्समधील किमान गुंतवणूक ५,००० रुपये असेल आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल. मिरे अॅसेट निफ्टी ५०० हेल्थकेअर ईटीएफचे व्यवस्थापन कुमारी एकता गाला आणि श्री. रितेश पटेल यांच्याद्वारे केले जाईल, तर मिरे अॅसट निफ्टी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर अँड लॉजिस्टिक ईटीएफचे व्यवस्थापन कुमारी एकता गाला आणि श्री. अक्षय उदेशी यांच्याद्वारे केले जाईल.
ही ईटीएफ योजना निफ्टी ५०० हेल्थकेअर टोटल रिटर्न इंडेक्सवर देखरेख ठेवेल. हा इंडेक्स आरोग्य सेवा क्षेत्रातील अशा विविध उद्योगांमध्ये गुंतवणूक करतो, ज्यांच्याकडे उत्पादने आणि सेवांच्या कमी उपलब्धतेमुळे भविष्यात वाढीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. हा इंडेक्स फार्मा व्यतिरिक्त हॉस्पिटल, डायग्नोस्टिक्स, वैद्यकीय तंत्रज्ञान व आरोग्यसेवा तंत्रज्ञान क्षेत्रांमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो.
भारतात जागतिक स्तरावरील इतर देशांच्या तुलनेत आरोग्यसेवेवर कमी खर्च आणि कमी प्रमाणात सेवा उपलब्धता दिसून येते, ज्यामुळे भविष्यात या क्षेत्रात मोठ्या वाढीची संधी आहे. गुंतवणूकीसाठी साह्यभूत इतर घटक आहेत वाढती वृद्ध लोकसंख्या, सरकारकडून आरोग्यसेवेवर वाढता खर्च, मेडिकल टूरिझम, ज्यामुळे जागतिक स्तरावर लस पुरवठ्यामध्ये भारताचा हिस्सा जवळपास ६० टक्के आहे.
प्रामुख्याने लार्ज-कॅप कंपन्यांचा प्रभाव दिसून येणाऱ्या सध्याच्या निफ्टी हेल्थकेअर इंडेक्सच्या तुलनेत निफ्टी ५०० हेल्थकेअर इंडेक्समध्ये आरोग्यसेवेमध्ये सामील असलेल्या सर्व मार्केट कॅप विभगांमधील कंपन्यांचा समावेश आहे, ज्यामुळे ही योजना इंडेक्सच्या माध्यमातून भारतातील फार्मा व आरोग्यसेवेमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी उत्तम वैविध्यपूर्ण सोल्यूशन आहे.
मिरे इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर अँड लॉजिस्टिक्स इंडेक्स हा निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्स आणि बीएसई इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर इंडेक्सच्या तुलनेत अधिक परिपूर्ण गुंतवणूकीची संधी देतो, ज्यामध्ये मुलभूत पायाभूत सुविधेसह लॉजिस्टिक्स, परिवहन आणि पुरवठा साखळी सक्षम करणाऱ्या क्षेत्रांमधील कंपन्यांचा समावेश आहे. हा इंडेक्स मालमत्ता निर्मितीसह भारतातील पायाभूत सुविधा चक्रामधून संपूर्ण उत्पन्न फायदा देखील मिळवून देतो.
भारतातील विविध क्षेत्रे व चक्रांमध्ये पायाभूत सुविधांच्या संधी आहेत, ज्यामुळे हा वैविध्यपूर्ण इंडेक्स दृष्टिकोन अधिक अनुकूल आहे. या इंडेक्समध्ये १०० शेअर्स समाविष्ट आहेत, जेथे तिमाही इंडेक्स व्यवस्थापनासाठी एका शेअरकरिता ५ टक्के आणि उद्योगासाठी २० टक्के गुंतवणूकीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सातत्यपूर्ण सार्वजनिक भांडवली खर्च आणि पायाभूत सुविधांच्या विविध विभागांमधील वाढती खासगी गुंतवणूक यामुळे अनेक वर्षांच्या फायद्यामध्ये वाढ होत आहे, जो व्यापक बास्केटद्वारे उत्तम प्रकारे मिळवता येतो. तसेच सरकारी धोरण, अंमलबजावणी, निधी आणि कालावधी यांवर पायाभूत सुविधांचे यश अवलंबून असते. हा इंडेक्स बांधकाम, रस्ते, ऊर्जा, बंदरे, लॉजिस्टिक्स, दूरसंचार आणि रिअल इस्टेट यांसारख्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून या संभाव्य जोखीम कमी करतो.
ही नियम-आधारित ईटीएफ योजना भारतातील पायाभूत सुविधेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याप्रती कमी-खर्चिक, पारदर्शक व व्यापक संधी देईल, जेथे मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूकीमुळे जोखीम शेअर्स व क्षेत्रांमध्ये विभागली जाईल.