
Moneyview IPO Listing:(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Moneyview IPO Listing: फिनटेक कंपनी Moneyview ने आज शेअर बाजारात जोरदार एंट्री केली. ज्या लोकांनी या IPO मध्ये पैसे लावले होते त्यांंना जणूकाही लॉटरीच लागली आहे. पहिल्याच दिवशी त्यांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळाला असल्याने आज BSE वर Moneyview चा शेअर 55.61 रुपयांवर लिस्ट झाला आणि NSE वर 55 रुपयांवर लिस्ट झाला. कंपनीने IPO मध्ये शेअर 34 रुपयांना दिला होता. म्हणजे लिस्ट होताच 63% नफा झाला. लिस्ट झाल्यावर पण शेअर थांबला नाही. तो BSE वर 56.58 रुपयांपर्यंत गेला. त्याचा अर्थ आता गुंतवणूकदार 66% नफ्यात आहेत.
Moneyview चा 1092 कोटींचा IPO 24 ते 28 सप्टेंबरला उघडला होता. लोकांनी त्यावर अक्षरशः उड्या मारल्या होत्या. हा IPO 101.87 पट जास्त भरला गेला. मोठ्या कंपन्यांनी म्हणजे QIB ने 230 पट जास्त पैसे लावले होते. श्रीमंत गुंतवणूकदारांनी NII ने 120 पट भरला होता आणि छोट्या गुंतवणूकदारांनी रिटेलमध्ये 20.41 पट जास्त भरला होता. यावरूनच कळतं की लोकांना या कंपनीवर किती विश्वास होता.
या IPO मध्ये 750 कोटींचे नवीन शेअर्स कंपनीने काढले होते. सोबतच जुन्या शेअर होल्डर्सनी 342 कोटींचे 10 कोटी शेअर्स विकले. हे पैसे त्यांना मिळाले.
नवीन शेअर विकून जे 750 कोटी आले असून त्याचा वापर कंपनी कसा करणार हे त्यांनी सांगितला आहे. 325 कोटी रुपये कर्ज वाटप वाढवण्यासाठी वापरले जातील. 250 कोटी रुपये तिच्या मुख्य कंपनी WFBL चं भांडवल वाढवण्यासाठी जातील. 111 कोटी रुपये इतर कामांसाठी आणि 90 कोटी रुपये IPO च्या खर्चासाठी वापरले जातील.
Moneyview ही एक फिनटेक कंपनी असून मोबाईलवरून पैसे देण्याचं काम करते. वैयक्तिक कर्ज, क्रेडिट स्कोअर चेक करणे, पैसे मॅनेज करणे या सर्विस देतात. जून 2026 पर्यंत तिचे 14 कोटी यूजर्स झाले होते. 48 बँका आणि फायनान्स कंपन्यांसोबत त्यांनी टायअप केलं आहे. आता ती विमा, क्रेडिट कार्ड, डिजिटल सोनं, पेमेंट्स या सगळ्यात पण काम करते.
कंपनीची कमाई पण जोरात वाढत आहे. 2024 ते 2026 मध्ये तिचा नफा दरवर्षी 19% ने वाढून 242 कोटी झाला तसेच एकूण उत्पन्न 57% ने वाढून 3404 कोटी झालं आहे. या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात म्हणजे एप्रिल ते जून 2026 मध्ये तिला 173 कोटी नफा झाला दरम्यान 1065 कोटी उत्पन्न मिळालं आहे. जून 2026 पर्यंत कंपनीवर 5484 कोटींचं कर्ज होतं आणि तिच्याकडे 2374 कोटींचा राखीव निधी आहे. एकूणच काय तर Moneyview ने बाजारात येताच धमाका केला आहे. फिनटेक कंपन्यांना अजून पण मागणी आहे हे यातून दिसतंय.