Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुकेश अंबानींची बादशाहत थांबणार, ‘हा’ भारतीय होणार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!

भारतासह आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या श्रीमंतांच्या यादीतील पहिल्या स्थानाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय असलेले अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे लवकरच आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर येऊ शकतात. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत केवळ तीन अब्ज डॉलर्सचा फरक शिल्लक राहिला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 02, 2024 | 07:31 PM
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, वाचा... मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, वाचा... मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?

Follow Us
Close
Follow Us:

भारतासह आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मात्र, आता आशियातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील त्यांचे स्थान धोक्यात आले आहे. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी 114 अब्ज डॉलर संपत्तीसह आशियामध्ये प्रथम स्थानी तर जगात 11व्या क्रमांकावर आहे. मात्र, आता आशियातील त्यांचे पहिले स्थान लवकरच दुसरा व्यक्ती काबीज करू शकतो.

गौतम अदानींची संपत्तीत 2.90 अब्जने वाढ

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत केवळ तीन अब्ज डॉलर्सचा फरक शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता केव्हाही गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनू शकतात. गौतम अदानी हे १११ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील श्रीमंतांमध्ये दुसऱ्या आणि जगात १२ व्या क्रमांकावर आहे. यावर्षी अंबानींच्या एकूण संपत्तीत 17.7 अब्जने वाढ झाली आहे. तर अदानींची एकूण संपत्ती 26.9 अब्जने वाढली आहे. गुरुवारी, अंबानींची संपत्ती 687 दशलक्षने वाढली याउलट गौतम अदानींची संपत्ती 2.90 अब्जने वाढली. त्यामुळे आता दोघांच्या संपत्तीत केवळ तीन अब्ज डॉलर्सचा फरक आहे.

हेही वाचा : मुकेश अंबानींची बादशाहत थांबणार, ‘हा’ भारतीय होणार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!

अमेरिकी शेअर बाजार घसरणीचा परिणाम

गुरुवारी (ता.१) अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे बहुतांश श्रीमंतांच्या संपत्तीत घट झाली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यांची एकूण संपत्ती 10.9 अब्ज डॉलरने घसरून, 241 अब्ज डॉलरवर खाली आली आहे. जेफ बेझोस 2.48 अब्ज डॉलर आणि बर्नार्ड अर्नॉल्ट 3.40 डॉलर अब्ज गमावले. या यादीत बेझोस 207 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या तर अर्नॉल्ट तिसऱ्या स्थानावर आहेत.

मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत ७.९९ अब्ज डॉलरने वाढ

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत गुरुवारी ७.९९ अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. ते 177 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 157 अब्ज डॉलरसह पाचव्या स्थानावर आहेत. गुरुवारी, त्यांची एकूण संपत्ती 390 दशलक्ष डॉलरने वाढली आहे.

हेही वाचा : ‘ही’ तरुणी सांभाळणार टाटा समूहाची धुरा; वाचा… काय आहे रतन टाटांसोबत तिचे नाते!

अनेक श्रीमंतांच्या संपत्तीत घट

जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत सहाव्या ते दहाव्या क्रमांकावर असलेल्या सर्व अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. सहाव्या क्रमांकावर असलेल्या लॅरी पेजने 277 दशलक्ष डॉलर गमावले असून, त्याची एकूण संपत्ती 153 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे. लॅरी एलिसनने 1.87 अब्ज डॉलर गमावले, स्टीव्ह बाल्मरने 321 दशलक्ष डॉलर गमावले, सेर्गे ब्रिनने 238 दशलक्ष डॉलर गमावले आणि वॉरन बफेने 2.28 अब्ज डॉलर गमावले. त्याच प्रमाणे मायकेल डेल यांना 4.49 अब्ज डॉलर आणि एनव्हीडियाचे संस्थापक जेन्सन हुआंग यांना 6.83 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

Web Title: Mukesh ambani first position list of rich gautam adani will be the next richest person in asia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 07:28 PM

Topics:  

  • Gautam Adani
  • Mukesh Ambani

संबंधित बातम्या

Indian Billionaires 2025: भारतातील श्रीमंतांचे नशीब बदलणारे ठरले हे वर्ष! अंबानी ते अदानी, २०२५ मध्ये कोण किती पुढे? 
1

Indian Billionaires 2025: भारतातील श्रीमंतांचे नशीब बदलणारे ठरले हे वर्ष! अंबानी ते अदानी, २०२५ मध्ये कोण किती पुढे? 

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक
2

गौतम अदानी माझ्यासाठी भाऊच; मी हक्काने त्यांना…; खासदार सुळेंकडून तोंडभरून कौतुक

Sanjay Raut News: ‘शरद पवारांचा पक्ष गौतम अदानींच्या भावाने फोडला…’; संजय राऊतांचा  गौप्यस्फोट
3

Sanjay Raut News: ‘शरद पवारांचा पक्ष गौतम अदानींच्या भावाने फोडला…’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Reliance Industries : मुकेश अंबानींची मोठी झेप! रशियन तेलासाठी अमेरिकन सरकारकडून मिळाली विशेष सवलत
4

Reliance Industries : मुकेश अंबानींची मोठी झेप! रशियन तेलासाठी अमेरिकन सरकारकडून मिळाली विशेष सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.