फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना झटका मिळला आहे. जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये रिलायंस इडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची घसरण झाली आहे. 11 व्या क्रमांकावर असलेल्या अंबानी यांची एका क्रमांकाने घसरण होत ते 12 व्या क्रमांकावर गेले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स लिस्टनुसार अंबानी यांची संपत्ती ही 112 कोटी आहे. ज्यांनी अंबानी यांना मागे टाकत 11 वे स्थान मिळविले आहे ते उद्योगपती नेमक कोण आहेत? ते जाणून घेऊया
मुकेश अंबानी यांना मागे टाकणारे उद्योगपती आहेत स्पेनचे अमानशियो ऑर्टेगा. गेल्या काही दिवसातच अमानशियो यांच्या संपत्तीमद्ये 2 अब्ज डॉलरची वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.
अमानशियो कोण आहेत?
डिलिव्हरी बॉय म्हणून करियरची सुरवात करणारे अमानशियो हे स्पेनचे व्यावसायिक आहेत. ते सध्या 88 वर्षांचे आहेत. त्यांना किरकोळ व्यापार क्षेत्राचा राजा म्हटले जाते. जगातील सर्वात मोठी कपड्याची रिटेल कंपनी Inditex चे ते मालक आहे. Inditex ही कंपनी Zara सह सात मोठ्या कपड्यांच्या रिटेल ब्रँडची मूळ कंपनी आहे. या सर्व कंपन्यांचे जगभरात तब्बल 7400 हून अधिक स्टोअर्स आहेत. या कंपनीचा महसूल हा 34 बिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. Inditex या कंपनीचे लक्झरी रिटेल ब्रँड्सव्यतिरिक्त, कंपनीकडे प्रीमियम ऑफिस आणि रिटेल प्रोपर्टीज आहेत. अमानशियो यांचा व्यवसाय आणि गुंतवणूक केवळ स्पेनपूर्ती मर्यादित नसून अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये त्यांनी बरीच गुंतवणूक केली आहे.
जे काम गरज म्हणून करावे लागले त्याच कामात सुरु केला सर्वात मोठा व्यवसाय
अमानशियो हे आज जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत मात्र त्यांचे सुरवातीचे जीवन संघर्षमय होते. त्यांचे वडील रेल्वेत मजूर होते. अमानशियो एका दुकानामुध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करायचे. त्यांनी कपड्याच्या दुकानातही काम केले तसेच टेलरिंगचे कामही केले आहे. या कामामुळे त्यांना कपड्यांबद्दल अधिक माहिती मिळाली त्यातील बारकावे कळाले. त्यामुळे त्यांनी कपड्याच्या व्यवसायात उतरण्याचे ठरविले आणि स्वत:चे दुकान सुरु केले. त्यानंतर त्या दुकांनांचा विस्तार केला. 1963 साली लक्झरी वस्तूंचा व्यवसाय सुरु केला आणि 1975 साली त्यांनी त्यांचे सर्वात लोकप्रिय ब्रॅंड ZARA चे पहिले आऊटलेट सुरु केले. 1985 मध्ये त्यांनी त्यांची आताची कंपनी Inditex ची स्थापना केली. 2011 पासून त्यांनी आपला व्यवसाय मुलीकडे सोपवला आहे.
श्रीमंतांच्या यादीतील क्रमवारी
श्रीमंतांच्या यादीमध्ये टेस्लाचे इलॉन मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती २४९ अब्ज डॉलर्स आहे. त्यांनतर दुसऱ्या क्रमांकावर ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस असून त्यांची संपत्ती ही 209 अब्ज डॉलर्स आहे. मेटाचे मालक मार्क झुकेरबर्ग हे 190 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताचे दुसरे मोठे उद्योगपती गौतम अदानी हे तिसऱ्या स्थानावर आहेत.