Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

आयुष आर्ट अँड बुलियन लिमिटेड या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना अल्पावधीतच श्रीमंत केले आहे. अलीकडच्या काळात शेअर बाजारात घसरण झाली असली तरी सुमारे दोन महिन्यांपासून तो अप्पर सर्किटला व्यवहार करत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 20, 2024 | 05:14 PM
एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

Follow Us
Close
Follow Us:

शेअर मार्केटमधील अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून देत आहे. त्यांच्यापैकी अनेक स्टॉक्सने तर गुंतवणूकदारांना अल्पावधीत गुंतवणूकदारांच्या पैशांचे रूपांतर कोट्यवधींमध्ये केले आहे. या शेअर्समध्ये सतत अपर सर्किट होत आहे. शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम त्यांच्यावर अजिबात दिसून येत नाहीये. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक सध्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून देत आहे.

दोन महिन्यांपासून अप्पर सर्किटला

आयुष आर्ट अँड बुलियन लिमिटेड असे या शेअर्सचे नाव आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना अल्पावधीतच श्रीमंत केले आहे. अलीकडच्या काळात शेअर बाजारात घसरण झाली असली तरी सुमारे दोन महिन्यांपासून तो अप्पर सर्किटला व्यवहार करत आहे. शुक्रवारी (ता.२०) देखील तो दोन टक्क्यांच्या वरती सर्किटला व्यवहार करत होता. त्यानंतर जेव्हा बाजार घसरला. तेव्हा या शेअरची किंमत 616.85 रुपयांपर्यंत घसरली आहे.

दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत दुप्पट परतावा

आयुष आर्ट अँड बुलियन लिमिटेड या शेअर्सने दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 29 ऑक्टोबर रोजी या शेअरची किंमत 312.25 रुपये होती. जी आता 616.85 रुपयांपर्यंत वधारली आहे. अशा परिस्थितीत, दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्याचा परतावा 100 टक्क्यांहून अधिक राहिला आहे. म्हणजेच 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर 2 लाखांमध्ये झाले आहे.

6 महिन्यांत भरली गुंतवणूकदारांची झोळी

आयुष आर्ट अँड बुलियन लिमिटेड या शेअरने ६ महिन्यांत गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत. या शेअर्सने 6 महिन्यांत 400 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 6 महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 112.75 रुपये होती. अशा परिस्थितीत कंपनीने आतापर्यंत सुमारे ४४७ टक्के परतावा दिला आहे. म्हणजे अवघ्या 6 महिन्यांत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे रूपांतर सुमारे 5.5 लाख रुपयांमध्ये झाले आहे.

एक वर्षाबद्दल बोलायचे झाले या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. एका वर्षात त्याचा परतावा 1010 टक्के आहे. जर तुम्ही वर्षभरापूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज हे 1 लाख रुपये 11 लाखात रूपांतरित झाले असते. अशा परिस्थितीत तुम्हाला एका वर्षात 10 लाख रुपये नफा झाला असता. त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झालेले पाहायला मिळत आहे.

आयुष आर्ट अँड बुलियन लिमिटेड या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. 5 वर्षात त्याचा परतावा 4875 टक्के इतका आहे. त्यामुळे 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर गुंतवणूकदारांना त्यापासून सुमारे 49.75 लाख रुपये म्हणजेच जवळपास 50 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 2 लाख रुपये गुंतवले असते. तर आज त्यापासून सुमारे 1 कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळाला असता. म्हणजेच तुम्ही ५ वर्षात करोडपती झालेले असतात.

किती आहे कंपनीचे मार्केट कॅप?

बीएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या कंपनीचे मार्केट कॅप 802.66 कोटी रुपये इतके आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 26.58 कोटी रुपये होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत हा महसूल ७.१६ कोटी रुपये होता. या काळात कंपनीच्या निव्वळ नफ्यातही वाढ झाली आहे.

Web Title: Multibagger stock aayush art and bullion ltd return more than double in 2 month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 05:14 PM

Topics:  

  • Multibagger Stock
  • share market

संबंधित बातम्या

Indian Market Update: ट्रम्पचे टॅरिफ, इराण तणाव; पुढील आठवडा बाजारासाठी कसोटीचा! तेजी की घसरण?
1

Indian Market Update: ट्रम्पचे टॅरिफ, इराण तणाव; पुढील आठवडा बाजारासाठी कसोटीचा! तेजी की घसरण?

IPO Alert: ग्रे मार्केटमध्ये भाव पडले, मात्र TATA ग्रुपने लावला मोठा डाव; ‘या’ आयपीओकडे सर्वांचे लक्ष!
2

IPO Alert: ग्रे मार्केटमध्ये भाव पडले, मात्र TATA ग्रुपने लावला मोठा डाव; ‘या’ आयपीओकडे सर्वांचे लक्ष!

शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा
3

शेअर्समध्ये होणार मोठी घसरण?, हा शेअर विकून टाका अन्यथा…, ब्रोकरेजचा मोठा इशारा

गुंतवणूकदार सावधान!  ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?
4

गुंतवणूकदार सावधान! ट्रम्प टॅरिफबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, शेअर बाजारात ‘भूकंप’ येणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.