Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

Multibagger Stocks : शेअर बाजारात सध्या सतत होणाऱ्या घसरणीमुळे आणि पडझडीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशा वेळेला काही शेअर्सनी मात्र बाजाराच्या विरुद्ध दिशेने कामगिरी करत आहेत. बाजारातील या तणावाच्या वातावरणातही 'या' ५ शेअर्सनी ६२ टक्क्यांपर्यंत बंपर रिटर्न देत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 23, 2026 | 07:01 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली!
  • दिला 65 % पर्यंतचा बंपर रिटर्न
  • तुमच्याकडे आहेत का हे 5 स्टॉक्स?
Multibagger Stocks : गेल्या आठवड्यातील शेअर बाजारात पडझड झाली. या सगळ्या घसरणीच्या परिस्थितीत BSE सेन्सेक्स 468.42 अंकांनी म्हणजेच 0.60 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे 77540.83 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 50114 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी घसरुन 24252 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील एकूण घसरणीचा विचार करता असे काही शेअर्स होते ज्यांनी या घसरणीच्या परिस्थितीतही तगडा रिटर्न दिला आहे. अशा ५ शेअर्सबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी या घसरणीच्या परिस्थितीतही तब्बल ६२ टक्क्यांपर्यंतचा रिटर्न दिला आहे. ( Multibagger Stocks )

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

व्हिक्टोरिया मिल्स

बाजारातील पडझडीच्या परिस्थितीतही व्हिक्टोरिया मिल्सचा हा शेअर गेल्या आठवड्यात सर्वाधिक वाढलेला शेअर राहिला. ज्याने तब्बल ६२.२०% इतका रिटर्न दिला. गेल्या आठवड्यात त्याचा शेअर ₹५,२९० वरून थेट ₹८,५८०.४५ पर्यंत पोहोचला. शुक्रवारी, बीएसईवर त्याचा शेअर १६.३७% वाढीसह ₹८,५८०.४५ वर बंद झाला. या किमतीनुसार, कंपनीचे बाजार भांडवल ₹८४.५७ कोटी इतकं आहे.

क्रेसंडा रेल्वे

गेल्या आठवड्यात क्रेसंडा रेल्वेच्या शेअरमध्ये थेट ५६.९४% ची वाढ झाली आहे. या शेअर्सची किमत ₹२.१६ वरून थेट ₹३.३९ वर पोहोचला. शुक्रवारी, बीएसईवर त्याचा शेअर ९.७१% वाढीसह ₹३.३९ वर बंद झाला. या किमतीनुसार, कंपनीचे बाजार भांडवल ₹१४३.४५ कोटी इतकी आहे.

मिनल इंडस्ट्रीज

या ५ शेअर्सपैकी आणखी एक मिनल इंडस्ट्रीजचा शेअर आहे ज्याने गेल्या आठवड्यात ५२.६६% पर्यंत वाढ नोंदवली आहे. कंपनीचा शेअर ₹२.०७ वरून ₹३.१६ पर्यंत पोहोचला. शुक्रवारी, बीएसईवर त्याचा शेअर १९.७०% च्या वाढीसह ₹३.१६ वर बंद झाला. या वाढलेल्या किमतीनुसार, कंपनीचे बाजार भांडवल ₹३९.८३ कोटी इतकं आहे.

म्हैसूर पेट्रो केमिकल्स

म्हैसूर पेट्रो केमिकल्सचा शेअर गेल्या आठवड्यात ५१.५०% नी वाढला. आठवड्याभरात, कंपनीचा शेअर ₹१०६.२७ वरून ₹१६१ पर्यंत वाढला. शुक्रवारी, BSE वर शेअर २.९९% च्या तोट्यासह ₹१६१ वर बंद झाला. या किमतीनुसार, कंपनीचे बाजार भांडवल ₹७०.१५ कोटी इतकं आहे.

केजेएमसी फायनान्शियल सर्व्हिसेस

केजेएमसी फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर गेल्या आठवड्यात ४८.७७% नी वाढला. आठवड्याभरात कंपनीचा शेअर ₹५७ वरून ₹८४.८० पर्यंत वाढ नोंदवली. शुक्रवारी, बीएसईवर शेअर १८.१६% नी वाढून ₹८४.८० वर बंद झाला. या किमतीनुसार, कंपनीचे बाजार भांडवल ₹२७.३५ कोटी आहे.

(Desclaimer: येथे दिलेली माहिती शेअर बाजाराची माहिती आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. Navrashtra.com गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

Web Title: Multibagger stocks top 5 gave up to 62 percent returns despite market crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • bse
  • Business News
  • Multibagger Stock
  • share market

संबंधित बातम्या

YouTube Income Tax : डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही! 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
1

YouTube Income Tax : डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही! 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
2

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?
3

Analogue Paneer Ban : हिमाचल पाठोपाठ ‘या’ राज्यातही ‘ॲनालॉग पनीर’वर बंदी! तुमच्या ताटात तर नाही ना हे बनावट पनीर? कसं ओळखायचं?

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?
4

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.