Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनएआर-इंडियाचा मॅजिकब्रिक्सवर बहिष्काराचा इशारा; दलालांविरोधातील दिशाभूल मोहिमांवरून गैर-सहकार्याचे निर्देश जारी

एनएआर-इंडियाने मॅजिकब्रिक्स विरोधात गैर-सहकार्याचे निर्देश जारी करत दलालांविरोधातील दिशाभूल मोहिमांचा निषेध केला आहे. एनएआरने त्यांच्याशी सर्व व्यावसायिक संबंध तोडण्याचे आवाहन केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2025 | 04:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतभरातील रेरा-नोंदणीकृत व परवानाधारक स्थावर मालमत्ता व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल असोसिएशन ऑफ रिअलटर्स-इंडिया (एनएआर-इंडिया) या सर्वोच्च संस्थेने मॅजिकब्रिक्स रिअल्टी सर्व्हिसेस लिमिटेड विरोधात गैर-सहकार्याचे आदेश जाहीर करत एक निर्णायक भूमिका घेतली आहे. मॅजिकब्रिक्सने नुकतेच प्रकाशित केलेल्या व्हिडिओंमध्ये दलालांची प्रतिमा मलिन करण्यात आली असून, यावरून एनएआर-इंडिया आणि मालमत्ता क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

इंडसइंड बँकेच्या सीईओंचा राजीनामा, 1,960 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण, शेअर्स क्रॅश

मॅजिकब्रिक्सच्या या मोहिमांमध्ये स्थावर मालमत्ता दलालांना चुकीचे दर्शवले गेले असून, त्यांची भूमिका गौण समजून दुर्लक्षित केली गेली आहे. विशेष म्हणजे, याच दलालांच्या माध्यमातून मॅजिकब्रिक्सने व्यवसाय उभारला असूनही त्यांचाच अनादर होत असल्याचे एनएआरने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर एनएआर-इंडियाने आपले सर्व सदस्य, एजंट्स आणि व्यावसायिकांना मॅजिकब्रिक्ससह व्यावसायिक व्यवहार, जाहिराती, लिस्टिंग तत्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या संस्थेशी कोणतेही संबंध ठेवू नयेत, जोपर्यंत मॅजिकब्रिक्सने सार्वजनिक माफीनामा आणि लेखी वचनबद्धता दिलेली नाही, असे ठाम सांगण्यात आले आहे.

एनएआरचे अध्यक्ष सुमंत रेड्डी यांनी म्हटले की, “ही केवळ एका मोहिमेविरुद्धची प्रतिक्रिया नाही, तर दलालांच्या भूमिकेचा वर्षानुवर्षांपासून चालत आलेला अपमान संपवण्याची वेळ आली आहे. दलाल हे केवळ सहायक नाहीत, तर स्थावर मालमत्ता क्षेत्राचा कणा आहेत.” एनएआरचे माजी अध्यक्ष अमित चोप्रा यांनीही स्पष्ट केले की, “तांत्रिक प्रगतीचे स्वागत आम्ही करतो, मात्र दलालांबद्दल अपप्रचार, अनादर आणि चुकीची माहिती हे सहन केले जाणार नाही.”

बजाज हाउसिंग फायनान्सला धक्का; शेअर्स 17 टक्क्यांनी घसरले

एनएआर-इंडियाने आता ग्राहक संरक्षण संस्था व नियामकांकडे अपील करत मॅजिकब्रिक्सच्या मोहिमांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर, डिजिटल जाहिरात व स्थावर मालमत्ता क्षेत्रात नैतिक मानकांची अंमलबजावणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 2008 मध्ये स्थापन झालेली एनएआर-इंडिया ही एक ना-नफा संस्था असून, 30,000 हून अधिक सदस्यांना मार्गदर्शन करते आणि उद्योगात उच्च नैतिकतेचे पालन करण्यास प्रोत्साहित करते.

Web Title: Nar india warns of boycott on magicbricks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा
1

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र
2

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या
3

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?
4

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.