निटकोची कमालीची वाढ (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
निटको लिमिटेड या टाइल्स, मार्बल आणि मोझाइक क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आर्थिक वर्ष २५- २६ च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. अलीबाग जमिनीच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त विकास करारामुळे (जेडीए) कंपनीने चांगले उत्पन्न मिळवले असून टाइल व्यवसायातही विकास साध्य केला आहे.
३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने कामकाजातून मिळवलेले एकत्रित उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ७०.२२ कोटी रुपयांवरून १५०.२२ कोटी रुपयांवर गेले असून त्यात ११४ टक्क्यांची दमदार वाढ झाली आहे. एकत्रित करोत्तर नफा ४७.४६ कोटी रुपयांवर गेला असून आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीतील ४३.५२ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
BSE च्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण, ‘या’ विक्रीच्या वर्चस्वाने बाजारात भूकंप
काय आहे धोरण
उत्पन्नातील वाढ प्रामुख्याने अलिबाग जमीन विकास व्यवहारामुळे झाली असून या व्यवहारातून तिमाहीत ५८.४२ कोटी रुपयांचा व्याजमुक्त अॅडजस्टेबल अॅडव्हान्स कंपनीला मिळाला आहे. हा करार कंपनीच्या अॅसेट मोनेटायझेशन धोरणातील लक्षणीय टप्पा असून त्याद्वारे रियल इस्टेट होल्डिंगमधील मूल्य मिळवण्याचे ध्येय आहे.
रियल इस्टेटमधून मिळणाऱ्या लाभांबरोबरच टाइल्स आणि संबंधित उत्पादन क्षेत्रांनीही स्थिर कामगिरी केली आहे. त्यातून मिळालेले उत्पन्न ६९.६६ कोटी रुपयांवर गेले असून गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यावरून निटकोच्या डिझाइनयुक्त पृष्ठभागांना असलेली मागणी आणि कामकाजातील कार्यक्षमता यावर सातत्याने दिला जात असलेला भर दिसून आला आहे.
अध्यक्षांचे म्हणणे
या निकालांविषयी निटकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक तलवार म्हणाले, ‘पहिल्या तिमाहीने आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. अलीबाग डेव्हलपमेंट व्यवहारामुळे जमीन व्यवहारांतून मूल्य निर्मिती करण्याची आमची बांधिलकी दिसून आली असून, आमचा टाइल्स व्यवसायही सातत्यपूर्ण प्रगती करत आहे. येत्या तिमाहींमध्येही विकासाचा हा वेग कायम राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’
Stocks Market: Nazara Tech, SBI Life सह शेअरमध्ये धमाका, चढउताराचे काय आहे कारण?
निटको लिमिटेड नक्की कोणत्या व्यवसायात?
गेल्या ७० वर्षांपासून निटको सरफेस क्षेत्रात आघाडीवर असून नाविन्य, दर्जा आणि शाश्वततेसाठी प्रसिद्ध आहे. टाइल्स, मार्बल्स आणि मोझाइक उपलब्ध करून देणारी एकमेव जागतिक कंपनी या नात्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान व निसर्गापासून प्रेरित डिझाइन्सचा मेळ घालण्यात येत आहे. पर्यायाने निटकोची उत्पादने आर्किटेक्ट्स, बिल्डर्स आणि चोखंदळ ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत.
प्रेस्टिज समूहासारख्या आघाडीच्या डेव्हलपरसह करण्यात आलेले सहकार्य आमच्या प्रतिष्ठित आणि मोठ्या ऑर्डर्स, नामवंत प्रकल्पांसाठी प्रीमियम सरफेस डिलिव्हर करण्याची आमची क्षमता दर्शवतात. निटकोचा समृद्ध वारसा आणि दर्जातून भारतातील सर्वात प्रसिद्ध इमारती, टाउनशीप्सना आकार दिला आहे आणि रियल इस्टेटचा विकास केला आहे. आमच्या महत्त्वपूर्ण रियल इस्टेट उपक्रमांमधील लँडमार्क अलिबाग संयुक्त विकास करार, टोटल एन्व्हॉरन्मेंटसह आणि प्रस्तावित कांजुरमार्ग प्रॉपर्टी व्यवहार दीर्घकालीन मूल्य मिळवून देत आहेत तसेच विकासाच्या पुढच्या टप्प्यासाठी योगदान देत आहेत. कारागिरी व दर्जासाठी जगभरात ओळखले जात असलेले निटको या क्षेत्रात मापदंड प्रस्थापित करत असून ५५ देशांत कार्यरत आहे.
६५० पेक्षा जास्त वितरकांचे नेटवर्क, ९ एक्सक्लुसिव्ह ला स्टुडिओ एक्सपिरीयन्स सेंटर्स आणि भारत व नेपाळमध्ये ७० पेक्षा जास्त फ्रँचाईझी स्टोअर्ससह निटको आपली उत्पादने सर्वत्र उपलब्ध करून देत आहे. कंपनीने आपल्या कामकाजात शाश्वततेप्रती बांधिलकी जपली असून त्यासाठी पर्यावरणपूरक उत्पादन, रिसायकलिंग उपक्रमांवर भर दिला जातो. सौंदर्य आणि जबाबदारी यांचा मेळ घालण्यास आमचे प्राधान्य असते. निटकोच्या माध्यमातून केवळ जागा विकसित करत नाहीत, तर अजरामर निर्मिती करत असल्याचे सांगण्यात येत आहे