अॅप, निधी, तंत्रज्ञान नाही, तरीही 'हा' रिक्षा चालक महिन्याला कमावतो आठ लाखाहून अधिक रुपये (फोटो सौजन्य - Instagram, just Indian things)
भारतात, ऑटो चालकांचे उत्पन्न ते ज्या शहरात काम करतात तसेच त्यांच्याकडे वाहने आहेत किंवा भाड्याने आहेत त्यानुसार बदलते. दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरात एक ऑटो चालक दररोज सरासरी १००० ते १५०० रुपये कमवू शकतो. पण मुंबईत असा एक ऑटो चालक आहे जो ऑटो न चालवता महिन्याला ५ लाख ते ८ लाख रुपये कमवतो. तेही कोणत्याही आधुनिक अॅपची मदत न घेता किंवा कोणत्याही तांत्रिक कौशल्याशिवाय.
एखाद्या व्यावसायिक पदवीधारकाला चांगली नोकरी मिळणे कठीण असणाऱ्या काळात केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर हा ऑटोचालक महिन्याला लाखो रुपये कमावतो आहे, त्याचीच ही रंजक कहाणी. लेन्सकार्टचे उत्पादन प्रमुख राहुल रुपाणी यांनी लिंक्डइनवर ही स्टोरी शेअर केली होती, जी आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
रुपाणी यांनी लिहिले, “हा ऑटो ड्रायव्हर महिन्याला ५-८ लाख रुपये कमावतो, ऑटो न चालवता. अॅप नाही, कुठला निधी नाही, तंत्रज्ञान नाही, फक्त दररोज योग्य वेळी योग्य ठिकाणी ऑटो पार्क करून!”
या ऑटो चालकाने प्रत्यक्षात वाहन न चालवताही यशस्वी व्यवसाय उभारला आहे. हा व्यवसाय अनेकदा दुर्लक्षित केलेल्या परंतु सामान्य समस्येचे निराकरण करतो. जेव्हा अमेरिकन वाणिज्य दूतावासात बॅगा ठेवण्यास सक्त मनाई असते आणि जवळपास कोणतीही अधिकृत साठवणूक सुविधा उपलब्ध नसते तेव्हा व्हिसा अर्जदारांना त्यांचे सामान ठेवण्यासाठीची सोय हा ऑटो चालक उपलब्ध करून देतो.
रूपानी यांनी लिंक्डइनवर त्यांच्या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे . “मी या आठवड्यात माझ्या व्हिसाच्या अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन कॉन्सुलेटच्या बाहेर होतो तेव्हा सुरक्षा रक्षकांनी मला सांगितले की मी माझी बॅग आत घेऊन जाऊ शकत नाही. लॉकर नाहीत. कोणतेही सूचना नाहीत. मी फुटपाथवर गोंधळलेला असताना, एका ऑटोरिक्षा चालकाने मला हात हलवत म्हटले, “सर, बॅग दे दो. सेफ राखुंगा, मेरा रोज का है, एक बॅग का १,००० रूपय चार्ज है”. मी संकोच केलाम, ग हार मानली. आणि तेव्हाच मला या माणसाचा हुशार व्यवसाय कळला.”
– तो त्याची ऑटो कॉन्सुलेटच्या बाहेर पार्क करतो.
– प्रति ग्राहक १,००० रुपयांना बॅग ठेवण्याची सेवा देतो.
– दिवसाला २०-३० ग्राहक मिळतात.
– म्हणजे दिवसाला २० हजार-३० हजार रुपये, किंवा महिन्याला ५-८ लाख रुपये!
तो कायदेशीररित्या त्याच्या ऑटोमध्ये ३० बॅगा ठेवू शकत नसल्यामुळे, त्याने एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्याशी भागीदारी केली आहे ज्याच्याकडे जवळच एक लहान लॉकर जागा आहे. बॅगा तिथे जातात. कायदेशीर, सुरक्षित आणि कुठल्याही त्रासाशिवाय. ऑटो फक्त रूपांतरण फनेल म्हणून काम करते.
या ऑटो चालकाने पूर्णपणे विश्वासावर आधारित एक मॉडेल तयार केले आहे, कोणतेही अॅप, ऑफिस आणि एमबीए पदवी नसतानाही, ते फक्त त्यांच्या रस्त्यावरील हुशारी आणि लोकांबद्दलच्या सखोल समजुतीने कमाई करतो.