Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता 10 मिनिटांत रुग्णवाहिकेची सुविधा मिळणार; ‘ही’ कंपनी देशभरात पुरवणार सुविधा!

देशभरातील क्विस कॉमर्स कंपन्या केवळ 10 मिनिटांत तुमच्या घरी किराणा सामान पोहोचवत होत्या. परंतु, कोणतीही अनुचित घटना घडल्यास १० मिनिटांत तुमच्या घरी रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jan 03, 2025 | 03:12 PM
आता 10 मिनिटांत रुग्णवाहिकेची सुविधा मिळणार; 'ही' कंपनी देशभरात पुरवणार सुविधा!

आता 10 मिनिटांत रुग्णवाहिकेची सुविधा मिळणार; 'ही' कंपनी देशभरात पुरवणार सुविधा!

Follow Us
Close
Follow Us:

आतापर्यंत देशभरातील क्विस कॉमर्स कंपन्या केवळ 10 मिनिटांत तुमच्या घरी किराणा सामान पोहोचवत होत्या. परंतु, कोणतीही अनुचित घटना घडल्यास १० मिनिटांत तुमच्या घरी रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. झोमॅटोची क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिटने 10 मिनिटांत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. ब्लिंकिटने ही सेवा सर्वप्रथम सायबर सिटी गुरुग्राम येथून सुरू केली आहे. तसेच आता देशभरातील रुग्णांना देखील लवकरच याचा मोठा फायदा होणार आहे.

अलबिंदर धिंडसा यांची समाजमाध्यमांवर माहिती

ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या सेवेच्या लॉन्चिंगची माहिती शेअर करताना सांगितले आहे की, रुग्णांना अडचणीच्या काळात 10 मिनिटांत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, या उद्देशाने तत्पर आणि विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवा देण्यासाठी आम्ही पहिले पाऊल उचलणार आहोत. त्या दृष्टीने आजपासून पहिल्या पाच रुग्णवाहिका गुरुग्रामच्या रस्त्यांवर सुरु करण्यात येणार आहे. आम्ही ही सेवा इतर क्षेत्रांमध्ये विस्तारित करणार आहोत. हीच बाब लक्षात घेऊन देशभरात लवकरच ब्लिंकिटच्या ॲपवर बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) रुग्णवाहिका बुक करण्याचा पर्याय दिसू लागणार आहे.

Union Budget 2025 : मध्यमवर्गाला मिळणार दिलासा! जुन्या कर प्रणालीमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही

 

Ambulance in 10 minutes.

We are taking our first step towards solving the problem of providing quick and reliable ambulance service in our cities. The first five ambulances will be on the road in Gurugram starting today. As we expand the service to more areas, you will start… pic.twitter.com/N8i9KJfq4z

— Albinder Dhindsa (@albinder) January 2, 2025

रुग्णवाहिका सर्व सुविधांनी सज्ज असणार

अल्बिंदर धिंडसा यांनी आपल्या पोस्टमध्ये रुग्णवाहिकेबद्दल माहिती देताना सांगितले आहे की, आमची रुग्णवाहिका आवश्यक जीवनरक्षक उपकरणांनी सुसज्ज आहे. ज्यात ऑक्सिजन सिलेंडर, एईडी (ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर), स्ट्रेचर, मॉनिटर, सक्शन मशीन आणि आवश्यक आपत्कालीन औषधे आणि इंजेक्शन यांचा समावेश आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेत एक पॅरामेडिक, एक सहाय्यक आणि एक प्रशिक्षित ड्रायव्हर असेल. जेणे करून आम्ही गरजेच्या वेळी उच्च दर्जाची सेवा देऊ शकतो.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

आयकरदात्यांसाठी नवीन वर्षात खुशखबर; रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढली!

इतर शहरांमध्ये होणार सेवेचा विस्तार

अल्बिंदर धिंडसा पुढे बोलताना म्हणाले आहे की, आमचा उद्देश नफा कमावणे नाही. आम्ही ग्राहकांना ही सेवा अतिशय वाजवी दरात देऊ केली आहे. तात्काळ आरोग्य सुविधा या दीर्घकालीन गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी कंपनी गुंतवणूक करणार आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही ही सेवा काळजीपूर्वक पुढे नेत आहोत. कारण ती आमच्यासाठी महत्त्वाची आणि नवीन आहे. अल्बिंदर धिंडसा म्हणाले आहे की, येत्या दोन वर्षांत सर्व प्रमुख शहरांमध्ये त्याचा विस्तार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. नागरिकांना रुग्णवाहिकेला रस्ता देण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, तुम्ही कधी कुणाचा जीव वाचवू शकतात, हे कळत नाही.

Web Title: Now you will get an ambulance service in 10 minutes blinkit will provide the facility across the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • ambulance service

संबंधित बातम्या

रुग्णवाहिका चालकांचे पोट भरणार कसे? मागील 26 महिन्यांपासून पगार रखडला, आरोग्य मंत्र्यांनी घेतली भेट
1

रुग्णवाहिका चालकांचे पोट भरणार कसे? मागील 26 महिन्यांपासून पगार रखडला, आरोग्य मंत्र्यांनी घेतली भेट

Ambulance Fraud : १,७५६ अॅम्ब्युलन्स करार; १०,००० कोटींवर खर्च, निविदा प्रक्रिया संशयास्पद
2

Ambulance Fraud : १,७५६ अॅम्ब्युलन्स करार; १०,००० कोटींवर खर्च, निविदा प्रक्रिया संशयास्पद

Kalyan :पाच तास ॲम्बुलन्सची प्रतीक्षा, महिलेचा मृत्यू, महेश गायकवाड संतप्त
3

Kalyan :पाच तास ॲम्बुलन्सची प्रतीक्षा, महिलेचा मृत्यू, महेश गायकवाड संतप्त

धक्कादायक ! महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे केवळ एक सरकारी रुग्णवाहिका; 13 कोटी लोकसंख्येसाठी अवघ्या…
4

धक्कादायक ! महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे केवळ एक सरकारी रुग्णवाहिका; 13 कोटी लोकसंख्येसाठी अवघ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.