Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paytm Payments Service: Paytm चा मोठा बदल! ऑफलाइन पेमेंट व्यवसाय PPSL कडे हस्तांतरित..; 2,250 कोटींची केली गुंतवणूक

आरबीआयच्या मंजूरीनंतर वन ९७ कम्युनिकेशन्सने त्यांचा ऑफलाइन मर्चंट पेमेंट व्यवसाय पीपीएसएलकडे हस्तांतरित केला. तर चीनच्या अलिबाबा ग्रुपने पेटीएममधील संपूर्ण हिस्सा विकला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 14, 2025 | 11:36 AM
Paytm Payments Service: Paytm चा मोठा बदल! ऑफलाइन पेमेंट व्यवसाय PPSL कडे हस्तांतरित..; 2,250 कोटींची केली गुंतवणूक

Paytm Payments Service: Paytm चा मोठा बदल! ऑफलाइन पेमेंट व्यवसाय PPSL कडे हस्तांतरित..; 2,250 कोटींची केली गुंतवणूक

Follow Us
Close
Follow Us:
  • वन ९७ ने ऑफलाइन पेमेंट व्यवसाय केला PPSL कडे हस्तांतरित
  • चीनच्या अलिबाबा ग्रुपने पेटीएममधील विकला संपूर्ण हिस्सा
  • PPSL ला RBI मंजुरी, 2,250 कोटी रुपयांची गुंतवणूक
 

Paytm Payments Service: पेटीएमची मुख्य कंपनी असलेली वन९७ कम्युनिकेशन्सने पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड (पीपीएसएल) मध्ये २,२५० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक पूर्ण केली आहे. आरबीआयच्या मंजूरीनंतर ही गुंतवणूक पीपीएसएलच्या इक्विटी शेअर्सच्या राइट्स इश्यूमध्ये सबस्क्राइब करून करण्यात आली. याबद्दल सविस्तर माहिती पेटीएमने दिली आहे. पेमेंट अ‍ॅग्रीगेटर म्हणून पीपीएसएल काम करणार आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये या कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतिम मंजुरी मिळाली. पीपीएसएल ही वन९७ कम्युनिकेशन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

पेमेंट अ‍ॅग्रीगेटर परवाना मिळाल्याने, व्यापाऱ्यांना पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस ऑनबोर्ड करू शकतील. त्याच बरोबर ऑनलाइन व्यवहार सुलभ करू शकतील. मार्च २०२० मध्ये कंपनीने पेमेंट अ‍ॅग्रीगेटर परवान्यासाठी पहिल्यांदा अर्ज दाखल केला होता परंतु आरबीआयने नोव्हेंबर २०२२ मध्ये हा अर्ज फेटाळला. एफडीआयच्या मानकांचे पालन केल्यानंतर कंपनीला पुन्हा अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यावेळी पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेसना नवीन व्यापाऱ्यांना ऑनबोर्डिंग करण्यासही मनाई करण्यात आली होती. ऑगस्ट २०२५ मध्ये ही बंदी उठवण्यात आली. चीनच्या अलिबाबा ग्रुपने पेटीएममधील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे.

हेही वाचा : Salary PF: नव्या लेबर कोडनुसार जास्त PF कपात होणार कमी होणार वेतन? सरकारने भीती मिटवली; चिंता केली दूर

आपला ऑफलाइन व्यापारी पेमेंट व्यवसाय वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पीपीएसएलकडे हस्तांतरित केला. या बदल्यात वन९७ कम्युनिकेशन्सना रोख रक्कम मिळाली. हे हस्तांतरण होल्डिंग कंपनी आणि तिच्या १००% मालकीच्या उपकंपनीमध्ये आहे, त्यामुळे मालकी किंवा नियंत्रणात कोणताही बदल होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

पेटीएमकडे साउंडबॉक्स, पॉइंट-ऑफ-सेल मशीन आणि ऑनलाइन पेमेंट गेटवेसह अंदाजे १४ दशलक्ष ऑफलाइन व्यापारी विविध पेमेंट सबस्क्रिप्शन डिव्हाइसेस वापरतात. हस्तांतरणासह, पीपीएसएलकडे वन९७ कम्युनिकेशन्सने दोन वरिष्ठ व्यवस्थापन अधिकाऱ्यांना देखील पाठवले आहेत. यामध्ये रिपुंजय गौर, सीओओ (ऑफलाइन पेमेंट्स) आणि दीपेंद्र सिंग राठोड, सीटीओ (पेमेंट्स) यांचा समावेश आहे.

हेही वाचा : IPO Market 2025: आयपीओ फंडरेझिंगमध्ये हाँगकाँग दुसऱ्या क्रमांकावर, भारताची देखील विक्रमी कामगिरी

वन९७ कम्युनिकेशन्सचा जुलै-सप्टेंबर २०२५ या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल वार्षिक आधारावर २४ टक्क्यांनी वाढून २,०६१ कोटी रुपये झाला असून यात निव्वळ नफा २११ कोटी रुपये होता. सलग दुसऱ्या तिमाहीत कंपनीला नफा झाला. ईबीआयटीडीए वाढून १४२ कोटी रुपये झाला आणि ईबीआयटीडीए मार्जिन ७% होता. पेटीएमचा पेमेंट सर्व्हिसेस महसूल वर्षानुवर्षे २५ टक्क्यांनी वाढून १,२२३ कोटी रुपये झाला.

बीएसईवर वन ९७ कम्युनिकेशन्सच्या शेअरची किंमत सध्या १३०५.८५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ८३,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ६ महिन्यांत या शेअरमध्ये जवळपास ४६ टक्के वाढ झाली आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने स्टॉकसाठीची लक्ष्य किंमत १,२४० रुपयांवरून १,४५० रुपये प्रति शेअर केली आहे. वाढलेली देयके आणि कर्ज वितरण, उत्पादन अपग्रेडमधून सुधारित मार्जिन आणि चांगले UPI मिश्रण यामुळे कमाईत चांगली वाढ होण्याची अपेक्षा ब्रोकरेजचे म्हणणे आहे. FY28 पर्यंत Paytm ला 12,523 कोटी रुपयांचा निव्वळ महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Paytms major change offline payments business transferred to ppsl invested 2250 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • FDI
  • Paytm
  • share market

संबंधित बातम्या

Union Budget 2026: गुंतवणूकदारांनोsss लक्ष द्या! जर बजेट सादर होताना ‘या’ तीन घोषणा झाल्या तर Share Market होईल सुसाट
1

Union Budget 2026: गुंतवणूकदारांनोsss लक्ष द्या! जर बजेट सादर होताना ‘या’ तीन घोषणा झाल्या तर Share Market होईल सुसाट

Stock Market Today: आज बाजारात तेजी की मंदी? ट्रेडर्ससाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज
2

Stock Market Today: आज बाजारात तेजी की मंदी? ट्रेडर्ससाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाज

Today’s Share market: अर्थसंकल्पापूर्वी बाजार डगमगला! गुंतवणूकदार टाकतायंत सावध पावले; जाणून घ्या आजचे बाजारभाव 
3

Today’s Share market: अर्थसंकल्पापूर्वी बाजार डगमगला! गुंतवणूकदार टाकतायंत सावध पावले; जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Stock Market Today: हिरव्या रंगात उघडणार शेअर बाजार! गुंतवणूकदारांना होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर
4

Stock Market Today: हिरव्या रंगात उघडणार शेअर बाजार! गुंतवणूकदारांना होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.