मोठ्या भागिदारीनंतर शेअर्समध्ये तुफान तेजी; गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना केले मालामाल
प्रवेग लिमिटेडच्या शेअर्समध्ये शुक्रवारी, 20 डिसेंबर रोजी तुफानी वाढ दिसून आली. त्याचे कारण म्हणजे, कंपनीने महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड सोबत धोरणात्मक इन्व्हेंटरी करारावर स्वाक्षरी केली आहे. तीन वर्षांच्या भागीदारीमध्ये दमण, दीव आणि अयोध्या यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असणार आहे. या करारानुसार, महिंद्रा हॉलिडेज निवडक मालमत्तांमध्ये एकूण 70 खोल्या आरक्षित करेल, ज्यामध्ये 35 स्थिर आणि 35 तरंगत्या खोल्या असणार आहे.
सर्वसामान्यांना झटका! जीएसटी परिषदेने ‘तो’ निर्णय घेण्याचे टाळले; महागाईचा फटका बसणार
धोरणात्मक कराराचा फायदा
महिंद्रा हॉलिडेजसोबत झालेल्या धोरणात्मक कराराबाबत प्रवेग लिमिटेडने सांगितले आहे की, हा करार दोन्ही पक्षांच्या ऑपरेशनल पोर्टफोलिओमध्ये वाढ करेल. तसेच महिंद्रा हॉलिडेज सारख्या प्रस्थापित ब्रँड्सच्या सहकार्याने प्रवेगची बाजारपेठेतील उपस्थिती मजबूत करेल. वारंवार रूम बुकिंगद्वारे वाढीव कमाईची संधी उपलब्ध करून देईल.
45 दिवसांपेक्षा कमी एक्सपायरी डेट असलेल्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी; FSSAI चे आदेश जारी
कंपनीच्या शेअर्सची कामगिरी
शुक्रवारी व्यवहारादरम्यान, शेअर 2 टक्क्यांनी वाढला आणि किंमत 745 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. व्यवहाराच्या शेवटी शेअर 1.31 टक्क्यांनी वाढून 739.75 रुपयांवर बंद झाला. डिसेंबर 2023 मध्ये शेअरची किंमत 639 रुपयांपर्यंत घसरली. हा शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक आहे. जानेवारी 2024 मध्ये शेअरची किंमत 1,300 रुपयांवर गेली. हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. गेल्या पाच वर्षांत शेअर 17,000 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
पाकिस्तानातही मुकेश अंबानींच्या नावाचा जलवा; गुगल 2024 च्या पाकिस्तानी सर्चच्या डेटामधून माहिती समोर
शेअर बाजाराची घसरण
शुक्रवारी बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 1,176.46 अंक किंवा 1.49 टक्क्यांनी घसरला आणि 78,041.59 वर बंद झाला. व्यवहारादरम्यान एका क्षणी तो 1,343.46 अंकांनी घसरून 77,874.59 वर आला. त्याचप्रमाणे एनएसईचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 364.20 अंकांनी किंवा 1.52 टक्क्यांनी घसरला आणि 23,587.50 वर बंद झाला.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)