पाकिस्तानातही मुकेश अंबानींच्या नावाचा जलवा; गुगल 2024 च्या पाकिस्तानी सर्चच्या डेटामधून माहिती समोर
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे नाव समोर येताच, आपल्याला आशियातील तसेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. मात्र, आता याच मुकेश अंबानी यांचा शेजारील देश असलेल्या पाकिस्तानात देखील जलवा असल्याचे पाहायला मिळत आहे. ही माहिती पाकिस्तानी नागरिकांच्या गुगल सर्च लिस्टमधून समोर आली आहे. गुगलने 2024 पाकिस्तानी सर्चचा डेटा जाहीर केला असून, यामध्ये मुकेश अंबानी या भारतीय व्यक्तीला त्या ठिकाणी ‘सर्वाधिक सर्च केलेल्या नागरिकांच्या’ श्रेणीत स्थान मिळाले आहे.
मुकेश अंबानींबद्दल पाकिस्तानी नागरिकांनी काय शोधले?
मुकेश अंबानी पाकिस्तानमध्ये गुगल सर्चच्या यादीत पुढे राहिले आहे. खास गोष्ट म्हणजे हे सर्च केवळ आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थबद्दलच नाही तर त्यांच्या कुटुंबाबद्दलही असल्याचे दिसून आले आहे. या बिझनेस टायकूनबद्दल लोकांनी काय शोधले ते पाहिल्यास, ‘मुकेश अंबानीची मालमत्ता’ आणि ‘मुकेश अंबानींची नेट वर्थ’ हे सर्वाधिक शोधले गेलेले परिणाम समोर आले आहेत.
‘या’ आयपीओच्या जीएमपीची कमाल; लिस्टिंगच्या दिवशीच होणार तुमचे पैसे दुप्पट!
याशिवाय ‘मुकेश अंबानींचा मुलगा’, ‘मुकेश अंबानींच्या मुलाचे लग्न’ आणि ‘मुकेश अंबानींचे घर’ सोबतच ‘अंबानीची नेट वर्थ रुपयात’ यासारखे कीवर्ड देखील इतर काही प्रश्नांसह गुगल शोध सूचीमध्ये त्या ठिकाणी शीर्षस्थानी पाहायला मिळाले आहेत. फोर्ब्सच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांची एकूण संपत्ती 94.3 अब्ज डॉलर इतकी आहे. मुकेश अंबानी 120 अब्ज रुपयांच्या कमाईसह रिलायन्स इंडस्ट्रीज चालवतात. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स, दूरसंचार, तेल आणि वायू, मीडिया, वित्तीय सेवा आणि रिटेल यासह अनेक विविध उद्योगांमध्ये व्यवसाय करते.
पीएम आवास योजना 2.0 चे अर्ज सुरु, नवीन घराच्या आर्थिक मदतीसाठी तयार ठेवा ‘ही’ डॉक्यूमेंट्स
मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल माहिती
मुकेश अंबानी यांचे लग्न नीता अंबानी यांच्याशी झाले असून, त्यांना तीन मुले आहेत. मुकेश अंबानी यांना आकाश आणि ईशा अंबानी अशी जुळी मुले असून, त्यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी आहे. मुकेश अंबानी यांची तीन मुलेही रिलायन्सच्या संचालक मंडळात आहेत. आकाश अंबानी जिओचे प्रमुख आहेत आणि ईशा रिटेल आणि वित्तीय सेवांचे व्यवस्थापन करतात. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी ऊर्जा व्यवसायाबाबतची देखरेख करतो आहे.